Page #1
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान कथित
मृत्यूवेळी
आधी आणि नंतर
कुठल्याही वस्तुचा जन्म झाला, म्हणजे त्याचा मृत्यू अवश्य होतो. हे जन्म-मरण आत्म्याचे नाही, आत्मा परमनन्ट वस्तू आहे.
Marathi
Page #2
--------------------------------------------------------------------------
________________
HNODY
VICA
दादा भगवान कथित
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
मूळ गुजराती संकलन : डो. नीरूबहन अमीन
अनुवाद : महात्मागण
Page #3
--------------------------------------------------------------------------
________________
प्रकाशक
: श्री अजित सी. पटेल
दादा भगवान आराधना ट्रस्ट, दादा दर्शन, 5, ममतापार्क सोसायटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे, उस्मानपुरा, अहमदाबाद - 380014, गुजरात. फोन - (079 ) 39830100
All Rights reserved - Shri Deepakbhai Desai Trimandir, Simandhar City, Ahmedabad-Kalol Highway, Adalaj, Dist.-Gandhinagar-382421, Gujarat, India. No part of this book may be used or reproduced in any manner whatsoever without written permission from the holder of the copyrights.
प्रथम आवृत्ति : 3000
ऑक्टोबर 2016
भाव मूल्य : 'परम विनय' आणि
'मी काहीच जाणत नाही', हा भाव!
द्रव्य मूल्य : 10 रुपये
मुद्रक
: अंबा ऑफसेट
B-99, इलेक्ट्रोनीक्स GIDC, क-6 रोड, सेक्टर-25, गांधीनगर-382044 फोन : (079) 39830341
Page #4
--------------------------------------------------------------------------
________________
त्रिमंत्र
વર્તમાનતીચંકર દ... શ્રી સીમંધરવામાં नमो अरिहंताणं
नमो सिद्धाणं नमो आयरियाणं नमो उवाझावाणं नमो लोए सब्बसाहूर्ण एसो पंच नमुकारो, सव्व पावप्पणासणी मंगलाणं च सव्वेसि,
पडर्म हवाइ मंगलम् १ ॐ नमो भगवते वासुदेवाय २
ॐ नमः शिवाय ३ जब सच्चिदानंद
Page #5
--------------------------------------------------------------------------
________________
*
दादा भगवान फाउन्डेशनची प्रकाशित पुस्तके
मराठी १. भोगतो त्याची चूक
११. पाप-पुण्य २. एडजेस्ट एव्हरीव्हेअर १२. आई-वडील आणि मुलांचा व्यवहार ३. जे घडले तोच न्याय
१३. पति-पत्नीचा दिव्य व्यवहार ४. संघर्ष टाळा
१४. समजपूर्वक प्राप्त ब्रह्मचर्य ५. मी कोण आहे ?
१५. मानव धर्म ६. क्रोध
१६. मृत्युवेळी, आधी आणि नंतर ७. चिंता
१७. सेवा-परोपकार ८. प्रतिक्रमण
१८. दान ९. भावना सुधारे जन्मोजन्म १९. त्रिमंत्र १०. कर्माचे विज्ञान
२०. वर्तमान तीर्थंकर श्री सीमंधर स्वामी
हिन्दी १. ज्ञानी पुरुष की पहचान २०. प्रेम २. सर्व दुःखों से मुक्ति
२१. माता-पिता और बच्चों का व्यवहार ३. कर्म का सिद्धांत
२२. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य आत्मबोध
२३. दान मैं कौन हूँ?
२४. मानव धर्म ६. वर्तमान तीर्थकर श्री सीमंधर... २५. सेवा-परोपकार ७. भुगते उसी की भूल
२६. मृत्यु समय, पहले और पश्चात ८. एडजस्ट एवरीव्हेयर
२७. निजदोष दर्शन से... निर्दोष ९. टकराव टालिए
२८. पति-पत्नी का दिव्य व्यवहार १०. हुआ सो न्याय
२९. क्लेश रहित जीवन ११. चिंता
३०. गुरु-शिष्य १२. क्रोध
३१. अहिंसा १३. प्रतिक्रमण
सत्य-असत्य के रहस्य १४. दादा भगवान कौन ?
३३. चमत्कार १५. पैसों का व्यवहार
३४. पाप-पुण्य १६. अंत:करण का स्वरूप ३५. वाणी, व्यवहार में... १७. जगत कर्ता कौन ?
३६. कर्म का विज्ञान १८. त्रिमंत्र
३७. आप्तवाणी - १ से ८ और १३ (पूर्वार्ध) १९. भावना से सुधरे जन्मोजन्म ३८. समझ से प्राप्त ब्रह्मचर्य (पूर्वार्ध-उत्तरार्ध) * दादा भगवान फाउन्डेशन द्वारे गुजराती, हिन्दी आणि इंग्रजी भाषेत सुद्धा बरीच पुस्तके
प्रकाशित झाली आहे. * प्रत्येक महिन्यात हिन्दी, गुजराती आणि इंग्रजी भाषेत दादावाणी मेगेझीन प्रकाशित होत आहे.
3
WWW
Page #6
--------------------------------------------------------------------------
________________
दादा भगवान कोण? जून १९५८ संध्याकाळची अंदाजे सहाची वेळ, सुरत स्टेशनवर अलोट गर्दी होती. प्लेटफार्म नंबर तीनच्या रेल्वेच्या बाकावर बसलेले श्री. अंबालाल मुळजीभाई पटेल रुपी देहमंदिरात नैसर्गिक स्वरूपात कित्येक जन्मांपासून व्यक्त होण्यासाठी आतूर असलेले 'दादा भगवान' संपूर्णपणे प्रगट झाले आणि निसर्गाने सर्जन केले अध्यात्माचे अद्भूत आश्चर्य! एका तासात विश्वदर्शन लाभले! मी कोण? भगवंत कोण? जग कोण चालवत आहे ? कर्म म्हणजे काय? मुक्ती कशाला म्हणतात? इत्यादी जगातील सर्व आध्यात्मिक प्रश्नांची रहस्ये संपूर्णपणे प्रकट झाली. अशा प्रकारे निसर्गाने विश्वाला प्रदान केले एक अद्वितीय, संपूर्ण दर्शन आणि ह्याचे माध्यम बनले अंबालाल मूळजीभाई| पटेल, जे होते गुजरातचे चरोतर जिल्ह्यातील भादरण गावचे पाटील, कंट्राक्टचा व्यवसाय करणारे आणि तरीही पूर्ण वीतराग पुरुष.
त्यांना ज्ञान प्राप्ति झाली तशी ते फक्त दोन तासात इतर मुमुक्षुनां सुद्धा आत्मज्ञान प्राप्ति करवीत असत, त्यांच्या सिद्ध झालेल्या अद्भूत ज्ञान प्रयोगाद्वारे. त्याला अक्रम (क्रमविरहीत) मार्ग म्हटले जाते. अक्रम म्हणजे क्रमाशिवायचा आणि क्रम म्हणजे पायरी पायरीने, क्रमाक्रमाने वर चढणे! अक्रम म्हणजे लिफ्ट मार्ग! शॉर्ट कट !!
ते स्वतः प्रत्येकाला 'दादा भगवान कोण?' ह्याबद्दलची फोड करून देताना म्हणायचे की, "हे दिसतात ते 'दादा भगवान' नाहीत. हे तर ए.एम. पटेल आहेत. आम्ही ज्ञानीपुरुष आहोत आणि आत प्रगट झाले ते दादा भगवान आहेत. दादा भगवान तर चौदालोकाचे नाथ आहेत, ते तुमच्यात पण आहेत, सर्वांमध्ये आहेत! तुमच्यात अव्यक्त रुपात आहेत आणि 'येथे' माझ्या आत संपूर्णपणे व्यक्त झालेले आहेत! माझ्या आत प्रगट झालेले 'दादा भगवान' यांना मी पण नमस्कार करतो."
व्यापारात धर्म असावा परंतु धर्मात व्यापार नसावा.या सिद्धांताने त्यांनी आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले. संपूर्ण जीवनात त्यांनी कधीही कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत, उलट स्वत:च्या व्यवसायातून झालेल्या फायद्यातून भक्तांना यात्रा करवीत असत.
Page #7
--------------------------------------------------------------------------
________________
आत्मज्ञान प्राप्तिची प्रत्यक्ष लींक मी तर, काही लोकांना माझ्या हातून सिद्धि प्रदान करणार आहे. नंतर कोणीतरी हवा की नको! नंतर लोकांना मार्ग तर हवाच ना?
- दादाश्री परम पूज्य दादाश्री गावो-गावी, देश-विदेशी परिभ्रमण करुन मुमुक्षूना सत्संग आणि आत्मज्ञान प्राप्ती करवीत होते. दादाश्रींनी आपल्या हयातीतच पूज्य डॉ. नीरुबहन अमीन (नीरुमा) यांना आत्मज्ञान प्राप्त करवून देण्याची ज्ञानसिद्धी प्रदान केली होती. दादाश्रींच्या देहविलयानंतर नीरुमा त्यांच्याप्रमाणेच मुमुक्षूना सत्संग व आत्मज्ञाप्राप्ती निमित्त भावाने करवित असत. पूज्य दीपकभाई देसाई यांना दादाश्रींनी सत्संग करण्याची सिद्धी प्रदान केली होती. पू. नीरुमांच्या उपस्थितीतच त्यांच्याच आशीर्वादाने पूज्य दीपकभाई देश-विदेशात कित्येक ठिकाणी जाऊन मुमुक्षूना आत्मज्ञान प्राप्ती करवन देत होते, हे कार्य नीरुमांच्या देहविलयानंतर आजसुद्धा चालूच आहे. या आत्मज्ञान प्राप्तीनंतर हजारो मुमुक्षु या संसारात राहून, सर्व जबाबदाऱ्या संभाळत असताना सुद्धा मुक्त राहून आत्मरणतेचा अनुभव घेत आहेत.
पुस्तकात मुद्रित वाणी मोक्षार्थीला मार्गदर्शनासाठी अत्यंत उपयोगी सिद्ध होईल, परंतु मोक्षप्रप्तिसाठी आत्मज्ञान प्राप्त करणे गरजेचे आहे. अक्रम मार्गाने आत्मज्ञान प्राप्तीचा मार्ग आजसुद्धा चालू (मोकळा) आहे. जसा प्रज्वलित दिवाच दुसऱ्या दिव्याला प्रज्वलीत करु शकतो, त्याचप्रमाणे प्रत्यक्ष आत्मज्ञानींकडून आत्मज्ञान प्राप्त करुनच स्वत:चा आत्मा जागृत होऊ शकतो.
Page #8
--------------------------------------------------------------------------
________________
निवेदन परम पूज्य ‘दादा भगवान' यांच्या प्रश्नोत्तरी सत्संगात विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना त्यांच्या श्रीमुखातून अध्यात्म आणि व्यवहार ज्ञानासंबंधी जी वाणी निघाली, ती रेकॉर्ड करून, संकलन व संपादन करून पुस्तकांच्या रुपात प्रकाशित केली जात आहे. त्याच साक्षात सरस्वतीचे अद्भूत संकलन ह्या पुस्तकात झाले आहे, जे आम्हा सर्वांसाठी वरदानरुप ठरेल.
प्रस्तुत अनुवादाची वाक्यरचना मराठी व्याकरणाच्या मापदण्डा वर कदाचित खरी ठरणार नाही, परंतु दादाश्रींची गुजराती वाणीचे शब्दशः मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न केलेला आहे, की जेणे करुन वाचकांना असा अनुभव व्हावा की दादाजींचीच वाणी ऐकली जात आहे. पण तरीसुद्धा दादाश्रींच्या आत्मज्ञानाचे अचूक आशय, जसे आहे तसे तर तुम्हाला गुजराती भाषेतच अवगत होईल. ज्यांना ज्ञानाचा गहन अर्थ समजून घ्यायचा असेल, ज्ञानाचा खरा मर्म जाणायचा असेल, त्यांनी या हेतूने गुजराती भाषा शिकावी अशी आमची नम्र विनंती आहे. अनुवादातील त्रुटींसाठी आपली क्षमा प्रार्थीतो.
वाचकांना... * ह्या पुस्तकातील मुद्रित पाठ्यसामग्री मूळत: 'मृत्यु समये, पहेला
अने पछी' या गुजराती पुस्तकाचे मराठी अनुवाद आहे. जिथे जिथे 'चंदूभाऊ' ह्या नावाचा उल्लेख केला आहे, तिथे वाचकांनी स्वतःचे नाव समजून वाचन करावे. पुस्तकातील कोणतीही गोष्ट जर तुम्हाला समजली नाही, तर प्रत्यक्ष सत्संगात येऊन त्याचे समाधान मिळवावे अशी नम्र विनंती. दादाश्रींच्या श्री मुखातूत निघालेले काही गुजराती शब्द जसे च्या तसे 'इटालिक्स' मध्ये ठेवले आहेत, कारण त्या शब्दांसाठी मराठीमध्ये तसेच कोणतेही शब्द उपलब्ध नाहीत की ज्यामुळे त्याचा अर्थ पूर्णपणे समजता येईल. पण तरीही त्या शब्दाचे समानार्थी शब्द () कंसात लिहिलेले आहेत.
Page #9
--------------------------------------------------------------------------
________________
संपादकीय
मृत्यू मनुष्याला अतिशय भयभीत करतो, कितीतरी शोक उत्पन्न करतो आणि केवळ दुःखातच बुडवून ठेवतो. प्रत्येक मनुष्याला जीवनात कोणाच्यातरी मृत्यूचे साक्षी बनावेच लागते. त्यावेळी मृत्यूसंबंधी शेकडो विचार मनात येतात, की मृत्यूच्या स्वरूपाची वास्तविकता काय असेल ? परंतु त्याचे रहस्य न उलगडल्यामुळे तेथेच तो अडकून पडतो. मृत्यूचे रहस्य जाणण्यासाठी प्रत्येक व्यक्ति उत्सुक असतेच. त्या बाबतीत बरेच काही ऐकण्यात किंवा वाचण्यात येते. लोकांकडूनही काही माहिती मिळते परंतु ते मात्र बुद्धीचे तर्कच असतात.
मृत्यू काय असेल ? मृत्यूच्या आधी काय होत असेल ? मृत्यूच्या वेळी काय होत असेल ? मृत्यूनंतर काय होत असेल ? मृत्यूचा अनुभव सांगणारा कोण ? ज्याचा मृत्यू होतो तो आपला अनुभव सांगू शकत नाही. ज्याचा जन्म होतो, तो आपली पूर्वीची अवस्था, स्थिती जाणत नाही. अशाप्रकारे जन्माआधीची आणि मृत्यूनंतरची अवस्था कोणी जाणत नाही. म्हणून मृत्यू आधी, मृत्यूवेळी आणि मृत्यूनंतर कोणत्या दशेतून जावे लागेल, याचे रहस्य, हे रहस्यच राहते. दादाश्रींनी आपल्या ज्ञानात पाहून हे सगळे रहस्य, जसेच्या तसे, यथार्थ रूपाने उघडले आहे, जे येथे संकलित केलेले आहेत.
मृत्यूचे रहस्य समजले की मृत्यूचे भय निघून जाते.
आपल्या प्रिय व्यक्तिच्या मृत्यूसमयी आपण काय करायला पाहिजे ? आपले खरे कर्तव्य काय आहे ? त्याची गती कशाप्रकारे सुधारायला हवी ? प्रिय व्यक्तिच्या मृत्यूनंतर आपण काय करायला हवे ? आपण कशाप्रकारे समता ठेवली पाहिजे ?
आणि ज्या लोकमान्यता आहेत, जसे की श्राद्ध, तेरावं, ब्राह्मण भोजन, दान, गरुड पुराण इत्यादीची सत्यता किती ? मरणाऱ्या व्यक्तिपर्यंत
Page #10
--------------------------------------------------------------------------
________________
काय काय पोहोचते ? हे सगळे करायला हवे की नको? मृत्यूनंतर गतीची स्थिति, इ. सर्व खुलासे इथे स्पष्ट होतात.
अशी भयभीत करणारी मृत्यूची रहस्ये जेव्हा उलगडतात तेव्हा मनुष्याला त्याच्या जीवनकाळातील व्यवहारात येणाऱ्या अशा प्रसंगी निश्चतच सांत्वना प्राप्त होते.
'ज्ञानीपुरुष' म्हणजे जे देहापासून, देहाच्या सर्व अवस्थांपासून, जन्मापासून, मृत्यूपासून वेगळेच राहिले आहेत. त्याचे ते निरंतर ज्ञाता-दृष्टा राहतात, आणि अजन्म-अमर आत्म्याच्या अनुभव दशेत राहतात ते! जीवनाच्या आधी, जीवनानंतर आणि देहाच्या अंतिम अवस्थेत, अजन्म - अमर अशा आत्म्याच्या स्थितीची हकीगत काय आहे, हे ज्ञानीपुरुष ज्ञानदृष्टीने अगदी स्पष्टपणे सांगतात.
आत्मा तर सदैव जन्म - मृत्यूपासून मुक्तच आहे, केवळज्ञान स्वरूपच आहे. केवळ ज्ञाता - दृष्टाच आहे. जन्म - मृत्यू हे आत्म्याला नाहीच. तरीसुद्धा बुद्धीनेच जन्म मृत्यूच्या परंपरेचे सर्जन होत राहते, जी मनुष्याला अनुभवात येते. तेव्हा स्वाभाविकपणे मूळ प्रश्न समोर येतो की जन्म-मृत्यू कोणत्या प्रकारे होत असतात ? त्यावेळेस आत्मा आणि त्या सोबत कोण-कोणत्या वस्तू असतात ? त्या सगळयांचे काय होते ? पुनर्जन्म कोणाचा होतो? कसा होतो ? आवागमन कोणाचे असते ? कार्यामधून कारण आणि कारणांमधून कार्याची परंपरा यांचे सर्जन कसे होते? ते कसे काय थांबू शकेल ? आयुष्याचे बंध कोणात्या प्रकारे पडतात ? आयुष्य कोणत्या आधारावर निश्चित होते ? अशा सनातन प्रश्नांची सचोट-समाधानकारक, वैज्ञानिक समज ज्ञानीपुरुषांशिवाय कोण देऊ शकणार ?
आणि त्याहीपुढे, गतीमध्ये प्रवेश करण्याचे कायदे कोणते असतील ? आत्महत्येचे कारण आणि परिणाम काय ? प्रेतयोनी काय असेल ? भूतयोनी आहे का ? क्षेत्र परिवर्तनाचे नियम कोणते ? भिन्न-भिन्न गतींचा आधार
Page #11
--------------------------------------------------------------------------
________________
काय? गतीमधून मुक्ती कशी मिळते? मोक्षगती प्राप्त करणारा आत्मा कोठे जातो? सिद्धगती काय आहे? या सगळया गोष्टी येथे स्पष्ट होतात.
आत्मस्वरूप आणि अहंकार-स्वरूपाची सूक्ष्म समज ज्ञानींशिवाय कोणीच समजावू शकत नाही!
मृत्यूनंतर परत मरावे लागणार नाही, परत जन्म घ्यावा लागणार नाही, ती दशा प्राप्त करण्यासंबंधी सगळी स्पष्टता, येथे सूक्ष्मरूपाने संकलित झालेली आहे, जी वाचकांसाठी संसार व्यवहार आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी हितकारी ठरेल.
- डो. नीरूबहन अमीन
Page #12
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
मुक्ती, जन्म-मरणापासून प्रश्नकर्ता : जन्म-मरणाच्या झंझटीतून कसे सुटायचे? दादाश्री : खूप छान विचारले. काय नाव आहे तुमचे? प्रश्नकर्ता : चंदूभाऊ. दादाश्री : खरोखर चंदूभाऊ आहात? प्रश्नकर्ता : हो. दादाश्री : चंदूभाऊ तर तुमचे नाव आहे, नाही का? प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : तेव्हा तुम्ही कोण? तुमचे नाव चंदूभाऊ आहे, हे तर आम्हा सगळ्यांना कबूल आहे, परंतु तुम्ही कोण?
प्रश्नकर्ता : म्हणनूच मी आलो आहे.
दादाश्री : ते जाणून घ्याल, तेव्हा जन्म-मरणाच्या झंझटीतून सुटका होईल.
आता तर मूळ त्या चंदूभाऊच्या नावावरच हे सर्व चालले आहे ना? सर्वच चंदूभाऊच्या नावावर?! अरे, हा तर धोका होईल? थोडे तरी तुमच्यावर ठेवायला पाहिजे होते ना?
Page #13
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
प्रेतयात्रा म्हणजे निसर्गाची जप्ती! कशी जप्ती? तेव्हा म्हणे, नावावर जो बँक बॅलन्स होता तो जप्त झाला, मुलं जप्त झाली, बंगला जप्त झाला, हे कपडे जे नावावर होते तेही जप्त झाले. सर्वकाही जप्तीत गेले. तेव्हा म्हणतो, 'साहेब, आता मला तिथे काय सोबत घेऊन जायचे?' तर म्हणे. 'लोकांबरोबर जेवढे गुंते निर्माण केले होते, तेवढेच सोबत घेऊन जा.' अर्थात् या नावावर जे आहे ते सगळे जप्तीमध्ये जाणार आहे, म्हणून आपल्याला स्वतःसाठी काही करायला पाहिजे ना? नको का करायला?
पाठवा, पुढच्या जन्माची गाठोडी जे आमचे नातेवाईक नाहीत, अशा परक्या लोकांना काही सुख दिले असेल, त्यांच्या कामासाठी फेऱ्या मारल्या असतील, त्यांना दुसरी काहीही मदत केली असेल, तर ती 'तिथे' पोहोचते. नातेवाईकांसाठी नाही, परंतु परक्यांसाठी. मग येथे लोकांना औषधासाठी पैसे दिले असतील, औषधदान मग दुसरे आहारदान दिले असेल, नंतर ज्ञानदान दिले असेल आणि अभयदान, हे सगळे दिले असेल तर ते सर्व तिथे सोबत येईल. यातील काही देता की मग असेच आहे सर्व? खाऊन टाकता?
जर सोबत घेऊन जाता आले असते तर हा तर असा आहे की तीन लाखांचे कर्ज करुन जाणार. धन्य आहे ना? हे जग असेच आहे, म्हणून सोबत घेऊन जाता येत नाही हेच चांगले आहे.
मायेची करामत जन्म माया निर्माण करते, लग्न माया निर्माण करते आणि मृत्यू हे सुद्धा मायाच निर्माण करते. पसंत असो वा नसो, पण सुटकाच नाही. परंतु अट एवढीच असते की मायेचे साम्राज्य नाही. मालक तुम्ही आहात. अर्थात तुमच्या इच्छेनुसार होत आहे. मागील जन्मी आपली जी इच्छा होती, त्याचा हिशोब निघाला आणि त्यानुसार माया चालवत आहे. तेव्हा मग आता आरडाओरड करुन चालणार नाही. तुम्हीच मायेला सांगितले होते की हा माझा ताळेबंधी हिशोब (लेखा-जोखा) आहे.
Page #14
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
आयुष्य एक तुरुंग प्रश्नकर्ता : आपल्या हिशोबाने आयुष्य काय आहे?
दादाश्री : माझ्या हिशोबाने आयुष्य, हा एक तुरुंग आहे तुरुंग! ती चार प्रकारची तुरंगे आहेत.
एक नजरकैद आहे. देवलोक नजरकैदेत आहेत. हे मनुष्य साध्या कैदेत आहेत. जनावरे कडक मजूरीवाल्या कैदेत आहेत आणि नरकातील जीव जन्मठेपेच्या कैदेत आहेत.
जन्मापासून चालूच आहे करवत हे शरीर शुद्धा प्रत्येक क्षणी मरत आहे, पण लोकांना काय त्याची जाणीव आहे ? आपले लोक तर, लाकडाचे दोन तुकडे झाले आणि खाली पडले, तेव्हा म्हणतील, 'कापले गेले' अरे, हे तर कापलेच जात होते. करवत चालूच होती.
मृत्यूचे भय हे निरंतर भय वाटेल असे जग आहे. एका क्षणासाठी देखील निर्भयता या जगात नाही, आणि जितकी निर्भयता वाटते, तितका त्याच्या मूर्चीत अवस्थेत आहे तो जीव. उघड्या डोळ्यांनी झोपलेले आहेत, म्हणून हे सगळे चालले आहे.
प्रश्नकर्ता : असे म्हटले जाते की आत्मा मरत नाही, तो तर जिवंतच असतो.
दादाश्री : आत्मा मरतच नाही, परंतु जोपर्यंत तुम्ही आत्मस्वरूप झाले नाहीत, तोपर्यंत तुम्हाला भीती वाटत राहते ना? मरणाची भीती वाटते ना? आता जर शरीरात काही आजारपण आले तर 'जावे लागेल, मरावे लागेल' अशी भीती वाटते. देहदृष्टी नसेल, तर स्वतः मरत नाही. परंतु हे तर 'मीच आहे, हाच मी आहे,' असे तुम्हाला शंभर टक्के पक्के वाटते. तुम्हाला हा चंदूलाल तो मीच आहे, अशी शंभर टक्के खात्री आहे ना?
Page #15
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
यमराज की नियमराज? या हिंदुस्तानातील सर्व गैरसमजा मला काढून टाकायच्या आहेत. संपूर्ण देश बिचारा या संभ्रमातच बेहाल झाला आहे. म्हणूनच यमराज नावाचा कोणीच जंतू नाही, असे मी पूर्ण गॅरंटीने सांगत आहे. तेव्हा कोणी विचारेल, 'पण काय असेल? काहीतरी असेलच ना?' तेव्हा मी सांगितले, 'नियमराज आहे !' हे मी पाहून सांगतो. मी काही वाचलेले बोलत नाही. हे मी माझ्या दर्शनाने पाहून, या डोळ्यांनी नाही, माझे जे दर्शन आहे, त्याने पाहून मी हे सर्व सांगत आहे.
मृत्यूनंतर काय? प्रश्नकर्ता : मृत्यूनंतर कोणती गती होणार?
दादाश्री : संपूर्ण आयुष्यात जी कार्ये केली असतील. आयुष्यभर जे धंदे चालवले असतील, केले असतील, त्याचा ताळेबंदी हिशोब मरणाच्या वेळी निघतो. मरण्याच्या एक तास आधी ताळेबंदी हिशोब समोर येतो. येथे जे जे बिनहक्काचे हिसकावले असेल, पैसे हिसकावले असतील, बायका पळविल्या असतील, सर्वकाही बिनहक्काचे हिसकावतात बुद्धीने, वाटेल त्याप्रकारे बळकावतात. त्या सगळ्यांना जनावर गती प्राप्त होते आणि जर आयुष्यभर सज्जनता ठेवली असेल तर मनुष्यगती प्राप्त होते. मरणोपरांत चार प्रकारच्या गती असतात. जो साऱ्या गावाचे पीक जाळून टाकतो, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, असे असतात ना इथे? त्यांना शेवटी नरकगती मिळते. अपकारा समोर देखील उपकार करतात, असे लोक सुपर ह्युमन असतात. ते मग देवगतीत जातात.
योग उपयोग परोपकाराय मन-वचन-काया आणि आत्म्याचा उपयोग लोकांसाठी कर. तुझ्या स्वतःसाठी करशील तर रायणी(झाडाचे नाव) चा जन्म मिळेल. मग पाचशे वर्ष भोगतच रहा. मग तुझी फळे लोकं खातील. लाकडे जाळतील.
Page #16
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
लोकां द्वारे तुझा कैद्यासारखा उपयोग करुन घेतला जाईल. म्हणून भगवंत म्हणतात की, तुझे मन-वचन-काया आणि आत्म्याचा उपयोग दुसऱ्यांसाठी कर, आणि मग तुला जर कोणतेही दुःख आले तर मला सांग.
आणखी कुठे जाणार ?
प्रश्नकर्ता : देह सुटल्यानंतर परत यावे लागते का ?
5
दादाश्री : दुसरे कुठेच जायचे नाही. इथल्या इथेच, आपल्या आजूबाजूला जे बैल-गाय बांधतात, जवळपास जे कुत्रे राहतात ना, आपल्या हातांनीच खातात, पितात, आपल्या समोरच बघत असतात, आपल्याला ओळखतात, ते आपलेच मामा आहेत, काका आहेत, सगळे तेच, इथल्या इथेच असतात. म्हणून त्यांना मारु नका. खायला द्या. ते तुमच्या जवळचेच नातेवाईक आहेत. तुम्हाला चाटायला सुद्धा येतात, बैल सुद्धा चाटतात.
रिटर्न तिकीट
प्रश्नकर्ता : गायी-म्हशींचा जन्म मध्येच का मिळतो ?
दादाश्री : हे तर अनंत जन्मापासून, हे लोक सगळे आले आहेत, ते सर्व गायी- म्हशीमधूनच आले आहेत. आणि इथून जे जाणार आहेत, त्यातून पंधरा टक्के सोडून बाकी सगळे तिथले रिटर्न तिकीट घेऊन आले आहेत. कोण-कोण तेथील तिकीट घेऊन आले आहेत ? तर जे भेसळ करतात, जे बिनहक्काचे बळकावतात, बिनहक्काचे उपभोगतात, जिथे बिनहक्काचे असेल तिथे जनावराचा जन्म मिळतो.
मागील जन्मांची विस्मृती
प्रश्नकर्ता : आम्हाला आमचा मागील जन्म का आठवत नाही ? आणि समजा आठवला तर काय होईल ?
दादाश्री : तो कोणाला आठवतो की ज्याला मरतेवेळी जरा सुद्धा दुःख झाले नसेल आणि येथे चांगला आचार-विचार करणारा असेल,
Page #17
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
तेव्हा त्याला आठवते. कारण की मातेच्या गर्भात तर अपार दुःख होते. पण या दुःखासोबत दुसरेही दुःख असते, मृत्यू झाला आहे त्याचेही दुःख, हे दोन्ही असतात. त्यामुळे तो बेभान होऊन जातो दु:खामुळे. म्हणून त्याला आठवत नाही.
6
अंतिम समयी गाठोडी गोळा कर ना....
एक ऐंशी वर्षांचे काका होते, त्यांना दवाखान्यात दाखल केले होते. मला जाणवले की हे दोन-चार दिवसात जाणार आहेत येथून. तरी सुद्धा मला म्हणतात, ‘ते चंदुलाल तर मला येथे भेटायलाही येत नाही.' आम्ही सांगितले की, 'चंदुलाल तर आले होते.' तेव्हा म्हणतात, मग 'त्या नगीनदासचे काय ?' अंथरुणावर पडल्या पडल्या नोंद करत राहतो की कोण-कोण भेटायला आले होते. अरे, स्वतःच्या तब्येतीची काळजी घे ना! दोन-चार दिवसात तर जाणार आहेस. आधी तू आपली गाठोडी सांभाळ. इथून सोबत घेऊन जायची तुझी गाठोडी तर गोळा कर. नगीनदास नाही आले त्याचे तुला काय करायचे आहे ?
ताप आला आणि टप्प
म्हातारे काका आजारी असतील आणि तुम्ही डॉक्टरांना बोलावले, सगळे इलाज केले पण तरीसुद्धा मृत्यू पावले. नंतर शोक प्रदर्शित करणारे असतात ना, ते आश्वासन द्यायला येतात. मग ते विचारतात, 'काय झाले होते काकांना ?' तेव्हा तुम्ही सांगता की, 'खरे तर मलेरियासारखे वाटत होते, पण नंतर डॉक्टरांनी सांगितले की हे तर जरा फ्लूसारखे आहे. ' तेव्हा ते विचारतील की, 'कोणत्या डॉक्टरला बोलावले होते ? ' तुम्ही सांगाल, की अमक्याला, त्यावर ते म्हणतील, 'तुम्हाला अक्कल नाही. ह्या नाही, त्या डॉक्टरला बोलावण्याची गरज होती. ' नंतर परत दुसरा कोणी येऊन तुम्हाला रागवेल, ' असे करायला हवे होते ना ! अशी मुर्खासारखी गोष्ट करायची असते का?' याचा अर्थ पूर्ण दिवस लोकं येऊन तुम्हाला दटावतच राहतील. लोक उलट आपल्यावरच चढून बसतात. आपल्या
Page #18
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
साधेपणाचा फायदा घेतात. म्हणून मी तुम्हाला सांगतो की, लोकं जेव्हा दुसऱ्या दिवशी येऊन विचारतील तेव्हा तुम्ही काय सांगायचे की, 'भाऊ, काकांना जरा ताप आला आणि टप्प झाले; आणखी काहीही झाले नव्हते. समोरचा विचारेल तेवढेच बोला. आपल्याला समजायला हवे की विस्ताराने सांगायला गेलो तर झंझट होईल. त्यापेक्षा, रात्री ताप आला आणि सकाळी टप्प झाले, असे सांगितले की मग कोणतीच झंझट उरत नाही ना !
7
,
स्वजनांचा अंतिमकाळी सांभाळ
प्रश्नकर्ता : एकाद्या स्वजनाचा अंतकाळ जवळ आला असेल तर त्याच्याशी जवळच्या नातेवाईकांची वागणुक कशी असायला हवी ?
दादाश्री : ज्याचा अंतिमकाळ जवळ आला असेल, त्यांना तर अतिशय चांगल्याप्रकारे सांभाळायला हवे. त्याचा प्रत्येक शब्द सांभाळायला हवा. त्याला नाराज करु नये. सगळ्यांनी त्याला खूश ठेवायला हवे, आणि तो जरी काही उलट बोलला तरीही आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे की, 'आपले बरोबर आहे !' ते म्हणतील की, दूध द्या, तर लगेचच दूध आणून द्यायचे. ते म्हणतील की, 'हे तर पाण्यासारखे आहे, दूसरे आणा. ' तर लगेच दुसरे दूध गरम करुन आणून द्यायचे. आणि सांगायचे की, 'हे शुद्ध आणि चांगले आहे.' म्हणजे त्यांना अनुकूल राहील असेच केले पाहिजे. असेच सगळे बोलायला हवे.
प्रश्नकर्ता : म्हणजे त्यात खऱ्या- -खोट्याच्या भानगडीत पडू नये ?
दादाश्री : खरे-खोटे तर या जगात नसतेच. त्यांना बरे वाटले की बस, त्यानुसार सर्वकाही करायला हवे. त्यांना अनुकूल वाटेल असेच वर्तन करायला हवे. लहान मुलांसोबत आपण कशाप्रकारे वागतो ? मुलाने काचेचा ग्लास फोडला तरी आपण त्याला रागावतो का ? दोन वर्षाचा मुलगा असला तरी त्याला विचारतो की, का फोडलास ? किंवा असे तसे काही ? मुलांबरोबर जसा व्यवहार करतो, तसाच व्यवहार त्यांच्याबरोबरही करायला हवा.
Page #19
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
अंतिम क्षणी धर्मध्यान प्रश्नकर्ता : अंतिम तासांमध्ये ठराविक लामांकडून काही क्रिया करुन घेतात. मनुष्य जेव्हा मृत्यू शय्येवर असतो, तेव्हा तिबेटीयन लोकांमध्ये असे म्हटले जाते की ते लोक त्याच्या आत्म्याला म्हणतात की, तू अशाप्रकारे जा अथवा आपल्यात जो गीतापाठ केला जातो किंवा जे चांगले शब्द ऐकवतात त्यामुळे त्यांच्यावर अंतिम तासांमध्ये काही परिणाम होतो का?
___दादाश्री : काही सुद्धा होत नाही. बारा महिन्यांचे वहीखाते तुम्ही लिहिता, तेव्हा धनत्रयोदशीपासून तुम्ही फक्त नफा जमा करत राहाल आणि तोटा मांडणार नाही तर चालेल काय?
प्रश्नकर्ता : नाही चालणार. दादाश्री : असे का? प्रश्नकर्ता : ते तर पूर्ण वर्षाचेच येते ना.
दादाश्री : त्याचप्रमाणे हा देखील संपूर्ण आयुष्याचा ताळेबंदी हिशोब समोर येतो. हे तर लोक फसवतात. लोकांना मूर्ख बनवतात.
प्रश्नकर्ता : दादाश्री, मनुष्याची अंतिम अवस्था असेल, जागृत अवस्था असेल, अशावेळेस त्याला कोणी गीतेचा पाठ ऐकवेल किंवा दुसऱ्या शास्त्रातील काही ऐकवेल, त्याच्या कानात काही सांगेल....
दादाश्री : तो स्वतः सांगत असेल तर, त्याच्या इच्छेनुसार असेल तर म्हणायला पाहिजे.
मर्सी किलिंग प्रश्नकर्ता : ज्याला अतिशय वेदना होत असेल त्याला वेदना सहन करु द्यायचे, आणि समजा जर त्याला मारून टाकले तर त्याला पुढच्या जन्मात वेदना सहन करण्याचे बाकी राहील, ही गोष्ट योग्य वाटत नाही.
Page #20
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
तो अतिशय वेदनेत असेल तर त्याचा अंत आणायलाच पाहिजे, त्यात काय चुकीचे आहे?
दादाश्री : असा अधिकार कोणालाही नाही. आम्हाला इलाज करण्याचा अधिकार आहे, सेवा करण्याचा अधिकार आहे, परंतु कोणालाही मारण्याचा अधिकार नाहीच.
प्रश्नकर्ता : तर त्यात आपले काय भले झाले?
दादाश्री : तर मारण्याने काय भले झाले? तुम्ही जर त्या वेदनेत असलेल्या व्यक्तिला मारून टाकले तर तुमचे मनुष्यत्व निघून जाते आणि तो उपाय मानवतेच्या सिद्धांताबाहेरचा आहे, मानवतेच्या विरुद्ध आहे.
सोबत, स्मशानापर्यंत ही उशी असते तिचे अभ्रे (कवर) बदलत राहतात, परंतु उशी तर तीच असते. अभ्रे फाटून जातात आणि बदलत राहतात, तसेच हा अभ्रा सुद्धा बदलत राहतो.
बाकी हे जग सारे पोलमपोल आहे. तरी पण व्यवहाराने बोललो नाही, तर समोरच्याच्या मनाला दु:ख होते. परंतु स्मशानात सोबत जाऊन तिथे चितेत कोणी उडी घेतली नाही. घरातील सगळे जण परत येतात. सगळे हुशार, समजदार आहेत. त्याची आई असेल, ती सुद्धा रडत-रडत परत येते.
प्रश्नकर्ता : मग त्याच्या नावाने छाती बडवतात की मागे काहीच ठेवून गेले नाही, आणि जर दोन लाख ठेवले असतील तर काहीच बोलत नाही.
दादाश्री : हो, अस्सं. हे तर मागे काही ठेवून गेला नाही त्याचे रडणे आहे. 'मरुन गेला आणि मारुन गेला' असे सुद्धा आतल्या आत बोलत राहतात. 'काहीच ठेवले नाही आणि आम्हाला मारून गेला,' आता तो काही ठेवून गेला नाही, त्यात त्या बाईचे नशीब कच्चे म्हणून ठेवले
Page #21
--------------------------------------------------------------------------
________________
10
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
नाही. पण जो मरतो त्याला शिव्या खाणे लिहिलेले होते, भरपूर शिव्या देतात!
म्हणून खाल्ल्या.
आमचे जे लोक स्मशानात जातात, ते परत येत नाही ना, की सगळे परत येतात? अर्थात ही तर एक प्रकारची फजिती आहे ! रडले तरी दुःख आणि नाही रडले तरी दुःख खूप रडले तर लोक म्हणणार की, 'इतरांकडे कोणी मरत नाहीत का, की तुम्ही इतके रडत आहात ? घनचक्कर आहात की काय ?' आणि नाही रडले तर म्हणणार की, 'तुम्ही दगड आहात. ' हृदय दगडासारखे आहे तुमचे.' अर्थात कुठे जायचे हीच समस्या आहे. सर्वकाही पद्धतशीर असायला हवे, असे म्हणतील.
तिथे स्मशानात जाळणारही आणि सोबत जवळच्या हॉटेलमध्ये बसून चहा-नाश्टाही करतील, नाश्टा करतात ना लोकं ?
प्रश्नकर्ता : नाश्टा सोबतच घेऊन जातात ना !
दादाश्री : असे होय, काय सांगता? म्हणजे, असे आहे हे सारे जग. अशा जगात कसे रहावे ?
येण्या-ज - जाण्याचा संबंध ठेवतात, पण डोक्यावर काही घेत नाहीत. तुम्ही घेता का डोक्यावर आता ? डोक्यावर घेता ? पत्नी किंवा अन्य कोणाचेच नाही ?
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : काय सांगता? आणि तो तर अजून बायकोला शेजारी बसवून ठेवतो. म्हणतो की, तुझ्याशिवाय मला करमत नाही. परंतु स्मशानात सोबत मात्र कोणीच जात नाही. जातो का कोणी ?
मृत्यूतिथीच्या वेळी
प्रश्नकर्ता : कुटुंबात कोणाची तिथी आली की त्या दिवशी कुटुंबीयांनी काय करायला हवे.
Page #22
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
11
दादाश्री : परमेश्वराला प्रार्थना करायला हवी की त्यांचे भले होवो.
नंतर कुठे गेले ते माहित पडत नाही
प्रश्नकर्ता : कोणाचे निधन झाले असेल, आणि आम्हाला जर हे जाणून घ्यायचे असेल की ती व्यक्ति आता कुठे आहे, तर ते कसे माहित पडेल ?
दादाश्री : ते तर ठराविक ज्ञानाशिवाय दिसणार नाही ना ! ठराविक ज्ञान हवे त्यासाठी आणि ते जाणून घेऊनही त्याचा काही अर्थ नाही, परंतु आपण भावना केली तर ती भावना मात्र पोहोचते. आपण आठवण काढली, भावना केली तर ती पोहोचते. ते तर, ज्ञानाशिवाय दुसरे काहीच माहित पडत नाही ना !
तुला कोणाची तरी माहिती काढायची आहे का ? तुझे कोणी नातेवाईक गेलेत का ?
प्रश्नकर्ता : माझा सख्खा भाऊ आत्ताच मृत्यू पावला.
दादाश्री : तो तुझी आठवण काढत नाही आणि तू त्याला आठवत राहतोस? हे मृत्यू होणे याचा अर्थ काय आहे, हे तू समजतो ? वहीखात्याचा हिशोब पूर्ण होणे, हा आहे. म्हणून आपण काय करायचे, की जर आम्हाला त्याची खूप आठवण येत असेल तर वीतराग भगवंतांना सांगायचे की त्याला शांती द्या. आठवण येते, म्हणून त्याला शांती मिळावी असे म्हणायचे. दुसरे आपण काय करु शकतो ?
अल्लाहची अमानत
तुम्हाला जे विचारायचे असेल ते विचारा. अल्लाजवळ जाण्यासाठी ज्या काही अडचणी येतात, त्या आम्हाला विचारा, आम्ही त्या दूर करून देऊ.
प्रश्नकर्ता : माझ्या मुलाचे अपघातात निधन झाले, तर त्या दुर्घटनेचे कारण काय असेल ?
Page #23
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
दादाश्री : या जगात जे काही डोळ्यांनी दिसते, कानांनी ऐकायला येते, ते सारे 'रिलेटीव करेक्ट' ( व्यवहार सत्य) आहे. अगदी खरी गोष्ट नाही ही. हे शरीरही आपले नाही, तर मुलगा आपला कसा असू शकतो ? हे तर व्यवहाराने, लोक - व्यवहाराने आपला मुलगा मानतात. वास्तवात तो आपला मुलगा नसतोच, खरे तर हे शरीर सुद्धा आपले नाही. म्हणजे, जे आपल्या जवळ आहे तेवढेच आपले आणि दुसरे सारे परके आहे! म्हणून मुलाला आपला मुलगा मानत रहाल, तर उपाधी होईल आणि अशांती राहील. तो मुलगा आता गेला. खुदाची अशीच मर्जी आहे, तर त्याला आता 'लेट गो' करा.
12
प्रश्नकर्ता : ते तर ठीक आहे, अल्लाहची अमानत आमच्याजवळ होती, ती घेतली.
दादाश्री : हो, बस. हा सारा बाग अल्लाहचाच आहे.
प्रश्नकर्ता : त्याचा जो अशा प्रकारे मृत्यू झाला, तर ते आमचे कुकर्म असेल ?
दादाश्री : हो. मुलाचेही कुकर्म आणि तुमचेही कुकर्म. चांगले कर्म असते तर चांगलेच झाले असते.
पोहोचतात मात्र भावस्पंदन
मुलांचा जर मृत्यू झाला असेल तर त्यांच्या मागे चिंता केल्याने त्यांना दुःख होते. आपले लोक अज्ञानतेमुळे असे सर्व करतात, म्हणून आपल्याला जसे आहे तसे समजून, शांत राहिले पाहिजे. विनाकारण डोकेफोडी कराल, त्याला काय अर्थ आहे ? सगळ्या ठिकाणी, कोणीही असे नाही की ज्यांच्या मुलांनी या जगाचा निरोप घेतलेला नाही. हे तर केवळ संसारिक ऋणानुबंध आहेत, देण्या-घेण्याचा हिशोब आहे. आम्हांला सुद्धा मुलगा-मुलगी होते. परंतु ते ही वारले. पाहुणे आले होते, ते पाहुणे निघून गेले. ते आपले सामानच कुठे आहे ? आपल्याला सुद्धा नाही का
Page #24
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
जायचे? आपल्यालाही जायचे आहे तिथे, मग हे काय चालवले आहे ? त्यापेक्षा जे जिवंत आहेत त्यांना शांती द्या. गेले ते गेले, त्यांना आठवायचे सोडून द्या. येथे जिवंत आहेत, आश्रित आहेत त्यांना शांती द्या, इतकेच आपले कर्तव्य. हे तर गेलेल्यांना आठवत राहतात आणि जे आहेत त्यांना शांती देऊ शकत नाही, असे कसे? याचा अर्थ, तुम्ही तुमचे कर्तव्य चुकत आहात. असे तुम्हाला वाटते का? गेले ते गेले. खिशातून लाख रूपये खाली पडले आणि परत सापडले नाही तर आपण काय करायला हवे? डोके फोडायला हवे?
हा आपल्या हातचा खेळ नाही आणि त्या बिचाऱ्याला तिथे दुःख होते. आपण इथे दुःखी होतो, याची असर त्याला तिथे पोहचते. त्याला ही सुखी होऊ देत नाही आणि आपणही सुखी होत नाही. म्हणून शास्त्रकारांनी सांगितले आहे की, 'गेल्यानंतर उपाधी करु नका' म्हणून आपल्या लोकांनी काय केले की, 'गरुड पुराण करा, अमके करा, पूजा करा आणि मनातून काढून टाका.' आपण असे काही केले होते? तरीही विसरलात, नाही का?
प्रश्नकर्ता : परंतु त्याला विसरू शकत नाही, वडिलांचा व मुलाचा व्यवहार खूप चांगला होता. म्हणून त्याला विसरू शकत नाही.
दादाश्री : हो. विसरु शकू असे नाही. परंतु आपण जर विसरलो नाही, तर आपल्याला दु:ख होते आणि त्यालाही तिथे दु:ख होते. आपल्या मनात त्याच्यासाठी दु:ख बाळगणे, ते वडील या नात्याने आपल्या कामाचे नाही.
प्रश्नकर्ता : त्याला कशाप्रकारे दुःख होते?
दादाश्री : आपण इथे दुःखी आहोत, त्याचा परिणाम तिथे झाल्याशिवाय राहत नाही. या जगात तर सर्व फोनसारखे आहे, टेलीविजनसारखे आहे हे जग. आणि आपण इथे उपाधी केली तर तो परत येणार आहे का?
Page #25
--------------------------------------------------------------------------
________________
14
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
प्रश्नकर्ता : नाही. दादाश्री : कोणत्याही मार्गाने येणार नाही? प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : उपाधी कराल तर त्याला पोहोचते आणि त्याच्या नावावर आपण धर्म-भक्ती करु, तरीही आपली भावना त्याच्यापर्यंत पोहोचते. आणि त्याला शांती राहते. त्याला शांती देण्याची गोष्ट आपल्याला कशी वाटते? त्याला शांती मिळावी हे आपले कर्तव्य आहे ना? म्हणून असे काही करा की त्याला चांगले वाटेल. एखाद्या दिवशी शाळेतील मुलांना पेढे खाऊ घाला, असे काहीतरी करा.
म्हणजे जेव्हा तुम्हाला मुलाची आठवण येईल, तेव्हा त्याच्या आत्म्याचे कल्याण होवो, असे बोला. 'कृपाळूदेवाचे' नाव घ्याल, 'दादा भगवान' बोलाल तरीही काम होईल. कारण ‘दादा भगवान' आणि 'कृपाळू देव' आत्मस्वरुपाने एकच आहेत! देहाने वेगळे दिसतात. डोळ्यांनी वेगळे दिसतात परंतु वस्तुतः एकच आहेत, मग महावीर भगवानांचे नाव घेतले तरी एकच गोष्ट आहे. त्यांच्या आत्म्याचे कल्याण होवो, हीच निरंतर भावना तुम्हाला करायची आहे. तुम्ही निरंतर सोबत राहिले, सोबत खाणेपिणे केले, म्हणून कल्याण कसे होईल, अशीच भावना करायला हवी. आपण परक्या लोकांसाठी चांगली भावना करतो, मग हा तर आपला स्वजन आहे, त्याच्यासाठी का नाही करावी?
रडणे, स्वतःसाठी की जाणाऱ्यासाठी? प्रश्नकर्ता : आपल्याला पूर्वजन्माची कल्पना आहे, तरीही घरात कोणाचे निधन झाल्यावर लोकं का रडतात?
दादाश्री : ते तर आपल्या स्वार्थासाठी रडतात. खूपच जवळचे नातेवाईक असतील तर ते खरंच रडतात, पण दुसरे सगळे जे रडतात ना, ते स्वत:च्या नातेवाईकांना आठवून रडतात, हे ही आश्चर्यच आहे ना? हे लोक
Page #26
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
भूतकाळाला वर्तमानकाळात आणतात. हे भारतीय सुद्धा धन्य आहेत ? भूतकाळाला वर्तमानकाळात आणतात आणि तो प्रयोग आपल्याला दाखवतात. परिणाम कल्पांतचा
15
एकदा कल्पांत केला तर 'कल्प'च्या अंतापर्यंत भटकावे लागेल. एक पूर्ण कल्पाच्या अंतापर्यंत भटकण्याचे झाले हे !
हे 'लिकेज' करु नये
प्रश्नकर्ता : नरसिंह मेहतांनी त्यांच्या पत्नीचे निधन झाले त्यावेळी 'भलु थयु भांगी जंजाळ' (भले झाले सुटली जंजाळ) असे बोलले, ते काय म्हटले जाईल ?
4
दादाश्री : परंतु ते खुळ्यासारखे ( आनंदाने वेडे ) बोलून गेले की 'भलु थयु भांगी जंजाळ.' ही गोष्ट तर मनातच ठेवायची होती की 'जंजाळ सुटले.' ते मनातून 'लिकेज' व्हायला नको परंतु हे तर मनातून 'लिकेज' होऊन बाहेर निघाले. मनात ठेवायची गोष्ट जाहीर करणाऱ्या मनुष्याला खुळे म्हटले जाते.
ज्ञानी असतात खूप विवेकी
आणि 'ज्ञानी' वेडे - खूळे नसतात. ज्ञानी खूप समंजस असतात. मनातून असे वाटते की, 'बरे झाले सुटली जंजाळ' परंतु बाहेर काय म्हणतात ? अरेरे, खूप वाईट झाले. आता मी एकटा काय करणार ? असे देखील म्हणतात. नाटक करतात ! हे जग स्वयं नाटकच आहे, म्हणून मनातून जाणून घ्या 'की, बरे झाले सूटली जंजाळ' परंतु विवेकात राहिले पाहिजे. ‘भले झाले सुटले जंजाळ, सुखाने भजूया श्री गोपाळ' असे नाही बोलायचे, असा अविवेक तर कोणी बाहेरचाही नाही करत. दुश्मन असला, तरीही तो विवेकपूर्वक बसतो. तोंड शोकग्रस्त करुन बसतो. आम्हाला दुःख किंवा असे दुसरे काहीही होत नाही, पण तरीही बाथरुममध्ये जाऊन
Page #27
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
तोंडाला पाणी लावून, येऊन बसतो आरामात. हा अभिनय आहे. दी वर्ल्ड इज दी ड्रामा इटसेल्फ, (जग स्वयं एक नाटक आहे.) तुम्हाला नाटकच करायचे आहे, केवळ अभिनयच करायचा आहे, परंतु अभिनय 'सिन्सिअरली' करायचा.
जीव भटकतो तेरा दिवस? प्रश्नकर्ता : मृत्यूनंतर तेरा दिवसांचा रेस्ट हाऊस असतो, असे म्हटले जाते.
दादाश्री : तेरा दिवसांचे तर या ब्राम्हणांचे असते, मरणाऱ्याला त्याचे काय? हे ब्राम्हण असे म्हणतात की, रेस्ट हाउस आहे. घरावर बसून बघत राहील, अरे मुर्खा कशासाठी बघत राहिल? कसा हा गोंधळ ! अंगठ्याइतकाच आहे, आणि कौलावर बसून राहतो. असे म्हणतात! आणि आपले लोक हे खरे मानतात. आणि हे जर खरे मानले नसते तर तेरावं केले नसते या लोकांनी. तेरावं करण्याच्या फंद्यातच पडले नसते.
प्रश्नकर्ता : गरुड पुराणात लिहिले आहे की अंगठ्याइतकाच आत्मा
आहे.
दादाश्री : हो, त्याचे नावच गरुड पुराण आहे ना, पुराणे (जुने) म्हटले जाते. म्हणे अंगठ्या इतका आत्मा, म्हणून प्राप्तीच होत नाही ना, दिवसच फिरत नाही, प्रगति होत नाही! करायला गेले साईन्टिफिक, हेतू साईन्टिफिक होता परंतु थिंकिंग (विचारसरणी) सगळे बिगडून गेले. हे लोक त्याच्या नावावर क्रिया करतात आणि क्रिया करण्याआधी ब्राम्हणांना दान देतात. तेव्हा दान देण्यायोग्य ब्राम्हण होते, त्या ब्राम्हणांना दान दिल्यावर पुण्य घडत होते. आता तर सगळे जर्जरित झाले आहे. ब्राम्हण इथून पलंग घेऊन जातो, त्या पलंगाचा सौदा आधीच झालेला असतो. की हा पलंग दोनशे रुपयात तुला देईल, गोदडीचा सौदा केलेला असतो, चादरीचा सौदा केलेला असतो. आपण दुसरे सगळे देतो, कपडे, साधन वगैरे सर्व, ते सुद्धा विकून टाकतात. मग हे तिथे आत्म्यापर्यंत पोहोचेल, असे कसे मानून घेतले लोकांनी?
Page #28
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
प्रश्नकर्ता: दादाजी, आता तर किती लोक ब्राम्हणांना सांगतात की, तुम्हीच सगळे आणा, आम्ही ठराविक पैसे देऊ.
17
दादाश्री : हे तर आज नाही, कितीतरी वर्षांपासून करत आहेत, ठराविक पैसे देऊ, तू घेऊन ये. आणि तो दुसऱ्याने दिलेली खाट घेऊन येतो! आता बोला! तरीही लोकांना हे चुकीचे आहे असे मानता येत नाही, आणि गाडी तर जशीच्या तशी चालतच राहते. जैन असे करत नाहीत. जैन फार पक्के असतात. म्हणून ते असे - तसे करत नाही. असे - तसे काही नाहीच. इथून आत्मा निघाला की सरळ त्याच्या गतीमध्ये जातो, योनी प्राप्त होऊनच जाते.
मारणाऱ्याला नाही काही घेणे-देणे
प्रश्नकर्ता : मरणाऱ्याच्या मागे भजन-कीर्तन करायचे की नाही ? त्याच्याने काय फायदा होतो ?
दादाश्री : मरणाऱ्या व्यक्तिला त्याच्याशी काहीच घेणे-देणे नाही.
प्रश्नकर्ता : मग या ज्या आमच्या धार्मिक विधी आहेत, मृत्यूनंतर ज्या काही विधी केल्या जातात, त्या बरोबर आहेत की नाही ?
दादाश्री : यामधील एक अक्षर देखील खरे नाही. गेले ते गेले. लोकं तर आपल्या आपणच करतात आणि समजा असे सांगितले की आपल्यासाठी करा ना, तर म्हणतात, 'नाही भाऊ, वेळच नाही मला. '... जर वडिलांसाठी करायला सांगितले, तर तेव्हाही करणार नाहीत अशी आहेत ही लोकं. परंतु शेजारी म्हणतात की, 'अरे मेल्या, तुझ्या वडिलांचे कर, तुझ्या वडिलांचे कर.' ते शेजारचे जबरदस्तीने करायला
लावतात.
प्रश्नकर्ता : मग हे गरुड पुराण बसवतात. ते काय आहे ?
दादाश्री : गरुड पुराण तर, जे रडत राहतात ना, ते गरुड पुराणमध्ये
जातात, म्हणजे फक्त शांती मिळविण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत.
Page #29
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
हे सर्व वाह-वाह साठी प्रश्नकर्ता : मृत्यूनंतर बारवं-तेरावं करतात, भांडी वाटतात, भोजन ठेवतात, त्याचे महत्व किती आहे?
दादाश्री : ती अनिवार्य वस्तू नाही. ते तर मागे वाह-वाह मिळवण्यासाठी करतात. आणि समजा खर्च केला नाहीतर लोभी बनतो. दोन हजार रुपये दिले असतील तर खात-पित नाही आणि दोन हजारामागे पैसे जोडत राहतो. म्हणून असा खर्च केला की मन शुद्ध होते आणि लोभही वाढत नाही. परंतु ती अनिवार्य वस्तू नाही. जवळ असेल तर करा, नाही तर काही हरकत नाही.
श्राद्धाची खरी समज प्रश्नकर्ता : या श्राद्धामध्ये पितूंचे जे आह्वान केले जाते, ते योग्य आहे? श्राद्ध पक्षाच्यावेळी पितृ येतात? आणि कावळ्याला भोजन(घास) देतात, ते काय आहे?
दादाश्री : असे आहे ना, मुलासोबत संबंध असेल तर तो येईल ना. सर्व संबंध पूर्ण होतो तेव्हा तर देह सुटतो. घरच्यांशी कोणत्याही प्रकारचा संबंध उरला नाही, म्हणून हा देह सुटतो. नंतर कोणी भेटत नाही. नंतर पुन्हा जर नवीन संबंध बांधला गेला असेल तर परत तिथे जन्म होतो. बाकी कोणी येत नाही. पितृ कोणाला म्हणणार? मुलाला म्हणणार की बापाला म्हणणार? मुलगाही पितृ होणार आहे आणि बापही पितृ होणार आहे, आजोबाही पितृ होणार आहेत, मग पितृ कोणाला म्हणणार?
प्रश्नकर्ता : आठवण काढण्यासाठीच या क्रिया केल्या जातात, असेच ना?
दादाश्री : नाही, आठवण काढण्यासाठीही नाही. हे तर आपले लोक मृतकाच्या मागे धर्माच्या नावावर चार आणे सुद्धा खर्च करतील
Page #30
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
असे नाहीत. म्हणून मग त्यांना समजावले की भाऊ, आपल्या वडिलांचे निधन झाले तर काहीतरी खर्च करा. असे करा, तसे करा, तेव्हा ते आपल्या वडिलांपर्यंत पोहोचेल. तेव्हा लोकंही त्याला रागावून सांगतात की बापासाठी काहीतरी तर कर ना, श्राद्ध कर, काही चांगले कर! तर असे करून दोनशे-चारशे, जे काही खर्च करायला लावतात, धर्माच्या नावावर, इतकेच त्याचे फळ मिळते. बापाच्या नावावर करतो आणि नंतर त्याचे फळ मिळते. जर वडिलांचे नाव घेतले नसते तर या लोकांनी चार आणे सुद्धा खर्च केले नसते. याचा अर्थ अंधश्रद्धेवर हे सगळे चालले आहे, आपल्याला समजले ना? नाही समजले?
हे व्रत-उपास करतात ते सगळे आयुर्वेदिक आहे. आयुर्वेदात कशा तहेने फायदा होईल, यासाठी व्रत-उपासाची व्यवस्था केली आहे. पूर्वीच्या लोकांनी चांगली व्यवस्था केली आहे. या मूर्ख लोकांनाही त्यामुळे फायदा होईल, म्हणून अष्टमी, एकादशी, पंचमी, असे सर्व प्रबंध केले आणि हे श्राद्धही करतात ना! श्राद्ध, तर खूप चांगल्या हेतूसाठी केले आहे.
प्रश्नकर्ता : दादाजी, श्राद्धात कावळ्यांना घास देतात, त्याचे तात्पर्य काय? अज्ञानता म्हटली जाईल ती?
दादाश्री : नाही, अज्ञानता नाही. हे एक प्रकारे लोकांनी शिकवले आहे की या प्रकारे श्राद्ध कर्म होतात. आपल्या येथे तर श्राद्ध करण्याचा मोठा इतिहास आहे. त्याचे काय कारण होते? श्राद्ध केव्हापासून सुरु होतात तर भाद्रपद शुक्ल पौर्णिमेपासून ते भाद्रपद कृष्ण अमावस्येपर्यंत श्राद्धपक्ष म्हणतात. सोळा दिवसांचे श्राद्ध. आता ही श्राद्धाची परंपरा लोकांनी का सुरु केली? खूप बुद्धिमान प्रजा आहे. श्राद्ध जे सुरु केले आहे, ती तर सर्व वैज्ञानिक पद्धत आहे. आपल्या इंडियात आजपासून काही वर्षांपूर्वी गावांमध्ये प्रत्येक घरांमध्ये एक खाट टाकलेली असायची. मलेरिया झालेली एक-दोन माणसं खाटेवर झोपलेली असायचीच. कोणत्या महिन्यात? तेव्हा म्हणे, भाद्रपद महिन्यात. आम्ही गावात जात, तर प्रत्येक घराबाहेर एखादी खाट पडलेली असायची आणि त्यावर आजारी माणूस झोपलेला
Page #31
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
असायचा, चादर ओढून. ताप होता, मलेरियाच्या तापाने पीडीत, भाद्रपद महिन्यात मच्छर खूप असायचे, म्हणून मलेरिया खूप पसरत होता, म्हणजे मलेरिया हा पित्ताचा ज्वर म्हटला जातो. तो वायू अथवा कफाचा ज्वर नाही. पित्ताचा ज्वर, तर इतके अधिक पित्त वाढत होते. पावसाचे दिवस आणि पित्तज्वर आणि त्यावर मच्छर चावतात. ज्याला जास्त पित्त असते त्याला चावतात. म्हणून माणसांनी, या शोधकर्त्यांनी हे शोधले होते की, या हिंदूस्तानात काहीतरी मार्ग शोधून काढा. नाहीतर जनसंख्या अर्धी होऊन जाईल. आता तर मच्छर कमी झाले आहेत, नाहीतर मनुष्य जिवंत राहिला नसता. म्हणजे या पित्ताच्या तापाचे शमन करण्यासाठी, अशी शमन क्रिया करण्यासाठी शोध लावला होता की हे लोक दूधपाक, खीर, दुध आणि साखर इत्यादी खातील तर पित्त शमेल आणि मलेरियापासून सुटका मिळेल. आता ही लोकं घरचे दुध असले तरीही खीर-बीर बनवत नव्हते. खीर खात नव्हते, अशी ही लोकं होती! खूप नॉर्मल ना (!) मग काय होणार ते आपण जाणता? आता दुधपाक, खीर रोज खाणार तरी कशा प्रकारे?
आता वडिलांना तर एक अक्षर सुद्धा पोहोचत नाही. पण या लोकांनीच शोधून काढले होते की, हिंदुस्तानातील लोक चार आण्याचाही धर्म करतील, असे नाहीत. इतके लोभी आहेत की दोन आणेही धर्म करणार नाहीत. म्हणून असे उल्टे कान पकडायला लावले की, 'निदान तुझ्या बापाचे श्राद्ध तरी कर!' असे सगळे बोलायला येतात. अशा प्रकारे श्राद्धाचे नाव पाडले. म्हणून लोकांनी नंतर सुरु केले की बापाचे श्राद्ध तर करावेच लागेल ना! आणि माझ्यासारखा कोणी अडून बसणारा असेल आणि तो जर श्राद्ध करत नसेल तर काय म्हणतात? 'बापाचे श्राद्धही करत नाही.' आजूबाजूचे सर्व किचकिच करतात, म्हणून मग तो श्राद्ध करतो, आणि लोकांना खाऊ घालतो.
तेव्हा पौर्णिमेपासून खीर खायला मिळते आणि ते पंधरा दिवस खीर मिळतच राहते. कारण की आज माझ्याकडे, उद्या तुझ्याकडे आणि लोकांनाही हे जमले की, 'असो, पाळी पाळीनेच खायचे आहे ना! लुबाडले
Page #32
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
जायचे नाही. आणि मग खायला द्यायचे कावळ्याला.' हे असे शोधून काढले. त्याने पित्त सारे शमते. म्हणून या लोकांनी ही व्यवस्था केली होती. म्हणून आमचे लोक त्यावेळी काय सांगत असत की सोळा दिवसांच्या श्राद्धानंतर जर जगला तर नवरात्रीत आला !
21
सही केल्याशिवाय मरण सुद्धा नाही
निसर्गाचा नियम असा आहे की तो कोणत्याही मनुष्याला इथून घेऊन जाऊ शकत नाही. मरण्याऱ्याने सही केल्याशिवाय त्याला इथून घेऊन जाता येत नाही. लोक सही करीत असतील काय ? असे म्हणतात ना की, 'हे भगवंता, इथून जायला मिळाले तर चांगले.' आता असे का बरे बोलतात ? ते आपण जाणता का ? कधी असे आतून दुःख होते, तेव्हा मग दुःखामुळे त्रासलेला माणूस असे बोलतो की, 'हा देह सुटला तर बरे.' त्यावेळी सही घेतली जाते.
त्याआधी करा 'माझी' आठवण
प्रश्नकर्ता: दादाजी, असे ऐकले आहे की आत्महत्येनंतर असे सात जन्म होतात, हे खरे आहे ?
दादाश्री : जे संस्कार पडतात, ते सात - आठ जन्मानंतर जातात. म्हणूनच असे काही वाईट संस्कार पडू देऊ नका. वाईट संस्कारांपासून दूर पळा. हो, इथे वाटेल तेवढे दुःख असेल ते सहन करा, पण गोळी मारु नका, आत्महत्या करु नका. म्हणून बडोदा शहरात आजपासून काही वर्षांपूर्वी सगळ्यांना मी सांगितले होते की, आत्महत्येचा विचार आला तर माझी आठवण काढा आणि माझ्याकडे या. अशी माणसं असतात ना, जोखीमवाली माणसं, त्यांना मी असे सांगून ठेवतो ते मग माझ्याकडे येतात तेव्हा त्यांना समजावतो. त्यामुळे त्या दिवसापासून त्याचे आत्महत्या करणे बंद होऊन जाते. १९५१ नंतर सगळ्यांना कळवले होते की ज्यांना आत्महत्या करायची असेल तर त्याने आधी मला भेटावे आणि नंतर आत्महत्या करावी. असे कोणी आले की मला आत्महत्या करायची आहे
Page #33
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
तर मी त्याला समजावतो. आसपासचे कॉजेस (कारणे), सर्कल, आत्महत्या करण्यासारखे आहे की नाही, हे सर्व त्याला समजावत आणि परत फिरवत.
22
आत्महत्येचे फळ
प्रश्नकर्ता: एखादा मनुष्याने आत्महत्या केली तर त्याची गती काय होते ? भूत-प्रेत बनतो ?
दादाश्री : आत्महत्या केल्याने प्रेत बनतो आणि प्रेत बनून भटकावे लागते. म्हणजे आत्महत्या केल्यानंतर उलट त्रास वाढवून घेतो. एकदा आत्महत्या केली, त्यानंतर कितीतरी जन्मांपर्यंत त्याचा प्रतिध्वनी उमटत राहतो. आणि ही जी आत्महत्या करतो ते काही नवीन नाही करत. ते तर मागील जन्मी आत्महत्या केली होती, त्याच्या प्रतिध्वनीमुळे करतो. ही जी आत्महत्या करतो, ते तर मागच्या जन्मी केलेल्या आत्महत्या कर्माचे फळ येते. म्हणून आपल्या आपणच आत्महत्या करतो. हे असे प्रतिध्वनी पडलेले असतात की तसेच्या तसेच करत आलेला असतो. म्हणून आपल्या आपणच आत्महत्या करतो आणि आत्महत्या केल्यानंतर परत अवगतीवाला जीव होतो. अवगतीवाला म्हणजे देहाशिवाय भटकणारा जीव. भूत बनणे काही सोपे नाही. भूत तर देवगतीचा अवतार आहे, ती सोपी गोष्ट नाही. भूत तर येथे कठोर तप केले असतील, अज्ञान तप केले असतील, तेव्हाच भूत होतो आणि प्रेत, ही तर वेगळी वस्तू आहे.
विकल्पाशिवाय जगता येत नाही
प्रश्नकर्ता : आत्महत्येचे विचार का येत असतील ?
दादाश्री : ते तर मनातील विकल्प संपलेले असतात म्हणून. विकल्पाच्या आधारावर मनुष्य जगतो. विकल्प संपले की मग आता काय करायचे, त्याचे काहीच दर्शन दिसत नाही. म्हणून मग आत्महत्या करण्याचा विचार करतो. म्हणजे हे विकल्प सुद्धा कामाचेच आहेत.
Page #34
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
सहज विचार बंद होतात, तेव्हा हे सगळे उलटे विचार येतात. विकल्प बंद झाले म्हणून जे सहज विचार येत होते, ते ही बंद होतात. अगदी अंधारच होतो. मग काहीच दिसत नाही. संकल्प अर्थात 'माझे' आणि विकल्प अर्थात 'मी.' हे दोन्ही बंद होतात, तेव्हाच मरण्याचे विचार येतात.
आत्महत्येचे कारण प्रश्नकर्ता : हा जो त्याला विचार आला, आत्महत्या करण्याचा त्याचे रुट(मूळ) काय आहे?
दादाश्री : आत्महत्येचे रुट असे असते की त्याने कोणत्याही जन्मात आत्महत्या केली असेल तर त्याचा प्रतिध्वनी सात जन्मांपर्यंत राहतो. जसे की आपण एखादा चेंडू तीन फुटावरून टाकला, तर तो आपल्या आपणच दुसऱ्यांदा अडीच फुट, नंतर एक फुट उडून खाली पडेल, असे होते की नाही? तीन फुट पूर्ण नाही उडत. पण स्वतःच्या स्वभावानुसार अडीच फुट उडून परत खाली पडतो, तिसऱ्यांदा दोन फुट उडून खाली पडतो, चौथ्यांदा दीड फुट उडून परत खाली पडतो, परत एक फुट उडून खाली पडतो. असा त्याच्या गतीचा नियम असतो. असेच निसर्गाचेही नियम आहेत. जर त्याने आत्महत्या केली ना, तर सातजन्मांपर्यंत आत्महत्या करावीच लागते. आता त्यात कमी जास्त परिणामाने आत्महत्या आपल्याला पूर्णच दिसते, परंतु परिणाम कमी तीव्रतेचे असतात आणि कमी होत-होत, परिणाम संपून जातात.
अंतिम क्षणी मरतेवेळी पूर्ण आयुष्यात जे केले होते, त्याचे सार येते. ते सार पाऊण तासापर्यंत वाचत राहिल्यानंतर देह बांधला जातो. शेवटी दोन पायातून चार पायांमध्ये जातो. येथे पोळी खाता खाता, तिथे गवत खातो. या कलियुगाचे माहात्म्य असेच आहे. हे मनुष्यत्व परत मिळणे अवघड आहे, असा हा कलियुगाचा काळ.....
Page #35
--------------------------------------------------------------------------
________________
24
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
प्रश्नकर्ता : अंतिम वेळेस कोणाला माहित की कान बंद होऊन
जातील ?
दादाश्री : अंतिम वेळेस तर आज जे आपल्या वहिखात्यात जमा आहे ना, ते समोर येते. मृत्यू वेळीचा तास, जे गुणस्थान ये ना, ते सार आहे आणि तो ताळेबंदी हिशोब फक्त संपूर्ण जीवनाचा नाही, परंतु आधी जो जन्म घेतला आणि नंतरचा, या मधल्या भागाचा हिशोब आहे. मृत्यूवेळी लोक कानामध्ये बोलतात की, 'बोला राम, बोला राम' अरे मुर्खा राम का बोलावतो आहेस ? राम तर गेले कधीचे !
पण लोकांनी असे शिकवले की असे काहीतरी करावे. परंतु ते तर आत पुण्य जागे असेल तरच अॅडजेस्ट होते. आणि तो मरणारा तर मुलीच्या लग्नाच्या चिंतेतच पडलेला असतो. या तीन मुलींचे लग्न झाले आणि ही चौथी राहून गेली. या तिघी विवाहित झाल्या पण ही धाकटी तेवढी राहिली. रक्कम मांडली की मग ती पुढे येऊन उभी राहते. आणि ते लहानपणी चांगले केलेले येणार नाही, पण म्हातारपणी चांगले केलेले येईल.
निसर्गाचा किती सुंदर कायदा
म्हणजे येथून जातो, तो सुद्धा निसर्गाचा न्याय, ठीक आहे ना ! परंतु वीतराग सावधान करतात की भाऊ, पन्नास वर्षे झाली आता सावध हो !
पंच्याहत्तर वर्षाचे आयुष्य असेल तर पन्नास वर्षात पहिला फोटो निघतो आणि साठ वर्षाचे आयुष्य असेल, तेव्हा चाळीसाव्या वर्षी फोटो निघतो. एक्यांशी वर्षाचे आयुष्य असेल तर चौपनाव्या वर्षी फोटो निघून जातो. परंतु तोपर्यंत इतका टाइम फ्री ऑफ कॉस्ट (मोफत) मिळतो, दोन तृतीयांश हिस्सा फ्री मध्ये मिळतो आणि एक तृतीयांश भागात त्याचा मग फोटो निघत राहतो. कायदा चांगला आहे की जोर-जबरदस्तीवाला आहे ? जोर-जबरदस्तीवाला नाही ना ? न्यायसंगत आहे ना ? दोन तृतीयांश भागात
Page #36
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
25
उड्या मारल्या असतील, त्याची आम्हाला आपत्ती नाही, पण आता तरी सरळ हो ना, असे सांगतात.
क्षणोक्षणी भाव मरण प्रश्नकर्ता : देहाचा तर मृत्यू म्हटला जातो ना?
दादाश्री : अज्ञानी मनुष्याचे दोन प्रकारे मरण होते. रोज भाव मरण होत असते. क्षणोक्षणी भाव मरण आणि शेवटी देहाचा मृत्यू होतो. परंतु त्याचे मरणे-रडणे रोजचेच. क्षणोक्षणी भाव मरण. म्हणून कृपाळूदेवांनी लिहिले आहे की,
'क्षण-क्षण भयंकर भाव मरणे कां अहो राची रह्यो! (क्षणोक्षणी भयंकर भाव मरण, का अरे प्रसन्न आहेस!') हे सर्वजण जगतात, ते मरण्यासाठी की कशासाठी जगतात?
समाधी मरण म्हणून मृत्यूला सांगावे की, 'तुला लवकर यायचे असेल तर लवकर ये, उशिरा येणार असशील तर उशिरा ये, परंतु 'समाधी मरण' बनून ये!
__ समाधी मरण अर्थात आत्म्याशिवाय दुसरे काहीच आठवत नाही. निजस्वरूप शुद्धात्मा शिवाय दुसऱ्या ठिकाणी चित्त नसतेच. मन-बुद्धिचित्त-अहंकार डगमगत नाही! निरंतर समाधी! देहाला उपाधी असली तरी ती स्पर्शत नाही. देह तर उपाधीवाला आहे की नाही?
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : केवळ उपाधीवालाच नाही, तर व्याधीवालाही आहे की नाही? ज्ञानीनां उपाधी शिवतही नाही. व्याधी झाली असेल तर ती सुद्धा शिवत नाही, आणि अज्ञानी तर व्याधी नसेल तरी व्याधीला बोलवतो. समाधी मरण अर्थात 'मी शुद्धात्मा आहे' असे भान असणे, आपल्या
Page #37
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
कितीतरी महात्म्यांचे मृत्यू झाले, त्या सगळ्यांना 'मी शुद्धात्मा आहे,' 'मी शुद्धात्मा आहे' असे भान राहत होते.
गतीची निशाणी प्रश्नकर्ता : मृत्यूच्या वेळी अशी कोणती निशाणी आहे की ज्यामुळे समजेल की या जीवाची गती चांगली झाली की नाही? ____ दादाश्री : त्यावेळी 'माझ्या मुलीचे लग्न झाले की नाही? असे झाले नाही,' अशा कारणांनी सगळे घर जर डोक्यावर घेत असेल, उपाधी करत असेल, तर समजायचे की त्याची अधोगती झाली. आणि जर आत्म्यात राहत असेल अर्थात भगवंतांच्या नामात राहत असेल तर चांगली गती झाली.
प्रश्नकर्ता : परंतु काही दिवस बेशुद्धीत असेल तर?
दादाश्री : बेशुद्धीत असेल, तरीही आतून ज्ञानात असेल तर चालेल. हे ज्ञान घेतलेले असायला हवे. मग तो बेशुद्ध असला तरीही चालेल.
__ मृत्यूची भीती प्रश्नकर्ता : तर सगळ्यांना मृत्यूची भीती का वाटत असते?
दादाश्री : मृत्यूची भीती तर अहंकाराला असते. आत्म्याला काहीच नसते. भीती अहंकाराला असते की, मी मरुन जाईल. मी मरुन जाईल.
____ या दृष्टीने बघा तरी.... असे आहे ना, भगवंताच्या दृष्टीने या जगात काय चालले आहे? तेव्हा म्हणतात, 'त्यांच्या दृष्टीने कोणी मरतच नाही,' भगवंताची जी दृष्टी आहे ती दृष्टी जर आपल्याला प्राप्त झाली, एका दिवसासाठी त्यांनी ती दृष्टि आपल्याला दिली, तर इथे कितीही लोक मेले तरीही आपल्यावर त्याचा परिणाम होणार नाही. कारण भगवंताच्या दृष्टीने कोणी मरतच नाही.
Page #38
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
___27
जीव तर मरण, शिव तर अमर कधी ना कधी तर सोल्यूशन काढावे लागेल ना? जीवन-मृत्यूचे सोल्यूशन नाही का काढावे लागणार? खरोखर स्वतः मरतही नाही आणि जगतही नाही. ही मान्यताच चुकीची आहे की स्वत:ला जीव मानून बसला आहे. स्वत:चे स्वरुप शिव आहे. स्वतः शिव आहे परंतु हे स्वत:ला समजत नाही आणि स्वत:ला जीव स्वरूप मानून बसला आहे!
प्रश्नकर्ता : असे प्रत्येक जीवाला समजायला लागले तर जग चालणार नाही ना?
दादाश्री : हो, नाहीच चालणार ना, परंतु हे प्रत्येक व्यक्तिला समजेलच असे नाही ना! हे तर पझल (कोडे) आहे सगळे, अत्यंत गुह्य, अतिशय गुह्यतम. गुह्यतमच्या कारणामुळे तर हे सर्व असे पोलम्पोल जग चालत राहते.
जगतो-मरतो, तो कोण? हा जन्म-मृत्यू आत्म्याला नाही. आत्मा परमनेन्ट वस्तू आहे. जन्ममृत्यू इगोइजमला (अहंकाराला) आहे. इगोइजम जन्म घेतो आणि इगोइजम मरतो. वास्तवात आत्मा स्वतः मरतच नाही. अहंकारच जन्म घेतो आणि अहंकारच मरतो.
Page #39
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, मृत्यू आधी आणि मृत्यूनंतर
आत्म्याची स्थिती
जन्म-मरण काय आहे? प्रश्नकर्ता : जन्म-मरण काय आहे ?
दादाश्री : जन्म-मरण तर होतात, आपण बघतो की त्यात काय आहे, त्यात विचारण्यासारखे काही नाही. जन्म-मरण अर्थात त्याच्या कर्माचा हिशोब पूर्ण झाला. एका जन्माचा जो हिशोब बांधला होता, तो पूर्ण झाला, म्हणून मरण येते.
मृत्यू म्हणजे काय? प्रश्नकर्ता : मृत्यू म्हणजे काय?
दादाश्री : मृत्यू तर, असे आहे ना, हा शर्ट शिवला अर्थात शर्टाचा जन्म झाला ना, आणि जन्म झाला म्हणून मृत्यू झाल्याशिवाय राहत नाही! कोणत्याही वस्तूचा जन्म होतो, त्याचा मृत्यू अवश्य होतो. आणि आत्मा अजन्म-अमर आहे, त्याचा मृत्यू होतच नाही. म्हणजे जितक्या वस्तू जन्मतात, त्यांचा मृत्यू अवश्य होतो आणि मृत्यू आहे म्हणून जन्म होणार. जन्माबरोबर मरण जोइंट झाले आहे. जन्म आहे तिथे मृत्यू अवश्य होतोच.
प्रश्नकर्ता : मृत्यू कशा करता आहे?
दादाश्री : मृत्यू तर, असे आहे ना, या देहाचा जन्म झाला तो एक संयोग आहे, त्याचा वियोग झाल्याशिवाय राहत नाही ना! संयोग नेहमीच
Page #40
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
वियोगी स्वभावाचेच असतात. आपण शाळेत शिकायला गेलो तेव्हा सुरुवात केली होती की नाही, बिगिनिंग? मग एन्ड (अंत) आला की नाही? प्रत्येक गोष्ट बिगिनिंग आणि एन्डवालीच असते. इथे या सगळ्या गोष्टींचा बिगिनिंग आणि एन्ड होतोच. नाही समजले का तुला?
प्रश्नकर्ता : हो, समजले ना!
दादाश्री : या सगळ्या गोष्टी बिगिनिंग-एन्डवाल्या आहेत, परंतु बिगिनिंग-एन्ड यास जाणणारा कोण आहे ?
सगळ्या वस्तू बिगिनिंग-एन्डवाल्या आहेत त्या टेम्पररी (अस्थायीतात्पुरत्या) वस्तू आहेत. ज्याचे बिगिनिंग होते, त्याचा एन्ड होतो, सुरुवात आहे त्याचा अंत अवश्य आहेच. या सगळ्या वस्तू टेम्पररी आहेत, परंतु टेम्पररीला जाणणारा कोण आहे ? तू परमनन्ट आहे, कारण की तू या वस्तूंना टेम्पररी म्हणतोस, म्हणून तू परमनन्ट आहे, जर सगळ्या गोष्टी टेम्पररी असतील तर मग टेम्पररी म्हणण्याची गरजच नव्हती. टेम्पररी सापेक्ष शब्द आहे. परमनन्ट आहे तर टेम्पररी आहे.
मृत्यूचे कारण प्रश्नकर्ता : तर मृत्यू का येतो?
दादाश्री : ते तर असे आहे, जेव्हा जन्म होतो, तेव्हा हे मन-वचनकायेच्या तीन 'बॅटऱ्या' आहेत, ज्या गर्भामधून इफेक्ट (परिणाम) देत जातात. तो इफेक्ट पूर्ण होतो, 'बॅटरीचा' हिशोब पूर्ण होईपर्यंत त्या बॅटऱ्या राहतात आणि नंतर संपून जातात, त्याला मृत्यू म्हणतात. पण तेव्हा परत पुढच्या जन्मासाठी आतमध्ये नवीन बॅटऱ्या चार्ज झालेल्या असतात. पुढच्या जन्मासाठी आतमध्ये नवीन बॅटऱ्या चार्ज होत असतात आणि जुन्या 'बॅटऱ्या' 'डिस्चार्ज' होत राहतात. असे 'चार्ज-डिस्चार्ज' होतच राहते. कारण त्याला 'रोंग बिलीफ' (चुकीची मान्यता) आहे. म्हणून 'कॉजेस' उत्पन्न होत राहतात, जोपर्यंत ‘रोंग बिलीफ' आहे, तोपर्यंत राग-द्वेष आणि
Page #41
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
कॉजेस उत्पन्न होत राहतात आणि जेव्हा ती 'रोंग बिलीफ' बदलते आणि 'राईट बिलीफ' बसते तेव्हा मग राग-द्वेष आणि कॉजेस उत्पन्न होत नाहीत.
पुर्नजन्म प्रश्नकर्ता : जीवात्मा मेल्यानंतर परत येतो ना?
दादाश्री : त्याचे असे आहे की, फॉरेनवाल्यांचा परत येत नाही, मुस्लिमांचा परत येत नाही. परंतु तुमचा परत येतो. तुमच्या भगवंताची इतकी कृपा आहे की तुमचा परत येतो. इथून मेला की तिथे दुसऱ्या योनीत प्रवेश करतो. आणि त्यांचा तर परत येत नाही.
आता खरोखर परत येत नाही असे नाही. त्यांची मान्यता अशी आहे की येथून मेला म्हणजे मेला, परंतु वास्तवात परत येतोच. पण हे त्यांना समजत नाही. पुर्नजन्मच समजत नाहीत. तुम्हाला पुर्नजन्म समजतो ना?
शरीराचा मृत्यू झाला की ते जड होऊन जाते. त्यावरून सिद्ध होते की त्याच्यात जीव होता तो निघून दुसऱ्या ठिकाणी गेला. फॉरेनवाले तर म्हणतात की हा तोच जीव होता आणि तोच जीव मेला. आपण सर्व हे कबूल करत नाही. आपण पुर्नजन्मात मानतो. आपण 'डेव्हलप' (विकसित) झालेलो आहोत. आपण वीतराग विज्ञानाला जाणतो. वीतराग विज्ञान सांगते की, पुर्नजन्माच्या आधारावर सर्व एकत्र आलो आहोत, असे हिंदुस्तानात समजतात. त्या आधारावर आपण आत्म्याला मानायला लागलो. जर पुर्नजन्माचा आधार नसता तर आत्म्याला कसे काय मानले असते?
पुर्नजन्म कोणाचा होतो? तेव्हा सांगतात, आत्मा आहे तर पुर्नजन्म होतो, कारण की देह तर मेला, त्याला जाळले गेले, असे आपण बघत
असतो.
अर्थात आत्मा समजला तर निराकरण होईल ना! परंतु ते समजेल असे नाही ना! म्हणून तमाम शास्त्रकारांनी सांगितले की, 'आत्मा जाणा.'
Page #42
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
त्याला ओळखल्याशिवाय जे काही केले जाते, ते सगळे त्याला फायद्याचे नाही, की हेल्पिंग नाही. आधी आत्मा जाणाल तर पूर्ण निराकरण होईल.
पुर्नजन्म कोणाचा? प्रश्नकर्ता : पुर्नजन्म कोण घेतो? जीव घेतो की आत्मा घेतो?
दादाश्री : नाही. कोणालाही घ्यावा लागत नाही, मिळून जातो. हा संपूर्ण जग ‘इट हेपन्स'च (आपल्या आपणच चालणारे) आहे.
प्रश्नकर्ता : हो, पण तो (पुर्नजन्म) कोणापासून होतो? जीवापासून होतो की आत्म्यापासून?
दादाश्री : नाही, आत्म्याला काही घेणे-देणे नाही. सर्वकाही जीवापासूनच आहे. ज्याला भौतिक सुख पाहिजे, त्याला योनीमध्ये प्रवेश करण्याचा 'राईट' (अधिकार) आहे. ज्याला भौतिक सुख नको असेल? त्याचा योनीमध्ये प्रवेश करण्याचा राईट राहत नाही.
संबंध जन्मोजन्मीचा प्रश्नकर्ता : मनुष्याच्या प्रत्येक जन्माचा पुर्नजन्माशी संबंध आहे का?
दादाश्री : प्रत्येक जन्म हा पुर्नजन्मच असतो. प्रत्येक जन्माचा संबंध पुर्नजन्माशीच असतो.
प्रश्नकर्ता : परंतु पुर्नजन्माचे या जन्माशी काय घेणे-देणे आहे ?
दादाश्री : अरे, पुढच्या जन्मासाठी हा पूर्वजन्म झाला. आधीचा जन्म, तो पूर्वजन्म आहे, तर हा जन्म आहे तो पुढच्या जन्माचा पूर्वजन्म म्हटला जाईल.
प्रश्नकर्ता : हो, ही गोष्ट खरी आहे. पण पूर्वजन्मात असे काही घडते का, ज्याचा या जन्मात काही संबंध असतो?
Page #43
--------------------------------------------------------------------------
________________
32
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
दादाश्री : खूपच संबंध, पूर्वजन्मात बीज पडते आणि दुसऱ्या जन्मात फळ येते. तर त्या बीजात आणि फळात फरक नाही का? संबंध आला की नाही? आपण बाजरीचे दाणे पेरु, तो पूर्वजन्म आणि कणीस आले, तो हा जन्म, परत या कणसातून बीजरुपात दाणा पडेल तो पूर्वजन्म आणि त्याच्यातून कणीस आले, तो नवीन जन्म, समजले की नाही?
प्रश्नकर्ता : एक माणूस रस्त्यावरुन चालत जात आहे आणि दुसरी सुद्धा कितीतरी माणसं रस्त्यावरुन चालत आहेत, पण एखादा साप ठराविक माणसालाच चावतो, त्याचे कारण पुर्नजन्मच?
दादाश्री : हो. आम्ही हेच सांगू इच्छितो की पुर्नजन्म आहे. म्हणून तो साप तुम्हाला चावतो. पुर्नजन्म नसता तर तुम्हाला साप चावला नसता. पुर्नजन्म आहे, तो तुम्हाला तुमच्या हिशोबाची परतफेड करतो. हे सगळे हिशोब फेडले जात आहेत. जसे वहीखात्यातले हिशोब फेडले जातात तसेच सर्व हिशोब फेडले जातात. आणि 'डेव्हलपमेन्ट' मुळे हे सर्व हिशोब आपल्याला समजतात सुद्धा. म्हणूनच आपल्या इथे कित्येक लोकांना पुर्नजन्म आहेच अशी मान्यताही बसलेली आहे ना! परंतु ते पुर्नजन्म आहेच असे सांगू शकत नाही. 'आहेच' असे पुरावे देऊ शकत नाही. परंतु अशा सगळ्या उदाहरणांमुळे त्यांच्या श्रद्धेत पक्के बसलेले आहे की पुर्नजन्म आहे हे नक्की.
या ताई म्हणतील, तिला सासू चांगली का मिळाली आणि मला का अशी मिळाली? म्हणजे संयोग सगळे वेगवेगळे मिळतील.
सोबत आणखी काय जाते? प्रश्नकर्ता : एक जीव दुसऱ्या देहात जातो. तिथे सोबत पंचेन्द्रिये आणि मन हे सर्व प्रत्येक जीव घेऊन जातो?
दादाश्री : नाही, नाही. काहीही नाही. सगळी इन्द्रिये तर एक्झोस्ट(रिकामी) होऊन संपून जातात. इन्द्रिय तर मरुन गेली. म्हणून
Page #44
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
33
त्याच्यासोबत इन्द्रिय वगैरे काहीही जात नाहीत. केवळ हे क्रोध-मानमाया-लोभ जातात, त्या कारण-शरीरात क्रोध-मान-माया-लोभ हे सगळेच येतात. आणि सूक्ष्म शरीर कसे असते? जोपर्यंत मोक्षाला जात नाही, तोपर्यंत सोबत राहते. कुठेही जन्म होऊ दे, पण हे सूक्ष्म शरीर तर सोबतच असते.
इलेक्ट्रिकल बॉडी आत्मा देहाला सोडून एकटा जात नाही. आत्म्याबरोबर सर्व कर्म, जे कारण शरीर म्हटले जाते ते, मग तिसरे इलेक्ट्रिकल बॉडी (तेजस शरीर). हे तिन्ही सोबत निघतात. जोपर्यंत
___ हा संसार आहे, तोपर्यंत प्रत्येक जीवात इलेक्ट्रिकल बॉडी असतेच! कारण शरीर बनले की इलेक्ट्रिकल बॉडी सोबतच असते. इलेक्ट्रिकल बॉडी प्रत्येक जीवात सामान्य भावाने असतेच आणि त्या आधारावर आपले सर्व चालत असते, जेवण जेवतो ते पचवण्याचे काम इलेक्ट्रिकल बॉडी करते. रक्त वगैरे बनते, रक्त शरीरात वरती चढवणे, खाली उतरवणे हे सगळे कार्य आतमध्ये करत राहते. डोळ्यांनी दिसते, तो लाईट या इलेक्ट्रिकल बॉडीच्या कारणाने असतो. आणि हे क्रोध-मान-माया-लोभ ते सुद्धा या इलेक्ट्रिकल बॉडीच्या कारणानेच होतात. आत्म्यामध्ये क्रोधमान-माया-लोभ नाहीच. हे चिडणे हे सगळे इलेक्ट्रिकल बॉडीचे शॉक (आघात) आहेत.
प्रश्नकर्ता : म्हणजे 'चार्ज होण्यामध्ये' इलेक्ट्रिकल बॉडी काम करत असेल ना?
दादाश्री : इलेक्ट्रिकल बॉडी असेल, तेव्हाच चार्ज होते. इलेक्ट्रिकल बॉडी नसेल, तर हे सर्व चालणारच नाही. 'इलेक्ट्रिकल बॉडी' असेल आणि आत्मा नसेल तरीही काहीच चालणार नाही. हे सारे समुच्चय 'कॉजेस' आहेत.
Page #45
--------------------------------------------------------------------------
________________
34
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
गर्भात जीवाचा प्रवेश केव्हा? प्रश्नकर्ता : संचार होतो तेव्हा जीव प्रवेश करतो, प्राण येतो, असे वेदांमध्ये सांगितले आहे.
दादाश्री : नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी अनुभवाच्या नाहीत. खऱ्या गोष्टी नाहीत. ती लौकिक भाषा झाली. जीवाशिवाय कधीही गर्भ धारण होत नाही, जीवाच्या उपस्थितीतच गर्भधारणा होते, नाहीतर धारण होत नाही.
त्या आधी तर तो अंड्यासारखा बेभान अवस्थेमध्ये राहत असतो. प्रश्नकर्ता : कोंबडीच्या अंड्यात छेद बनवून जीव आत शिरला का?
दादाश्री : नाही. ते तर लौकिकतेत असे आहे. लौकिकात तुम्ही म्हणता, असेच लिहिले आहे. कारण की गर्भधारण होणे तो काळ, सर्व सायन्टिफिक सरकमस्टेन्शिअल एविडेन्स, काळही मिळेल, तेव्हा धारणा होते.
नऊ महिने गर्भात जीव राहतो तेव्हा प्रकट होतो आणि सात महिन्यांचा जीव असेल, तेव्हा कमी महिन्यात जन्म झाला म्हणून कच्चा असतो. त्याचे डोके-बीके, (मेंदु) सगळे कच्चे असते. सगळे अंग कच्चे असतात. सातव्या महिन्यात जन्म झाला म्हणून आणि अठरा महिन्याने जन्म झाला तर ती गोष्टच वेगळी, खूप उच्च कोटी बुद्धिमता असते. अर्थात नऊ महिन्यापेक्षा जितके जास्त महिने होतात तितकी त्याची 'टॉप' हुशारी असते. माहिती आहे असे?
का बोलत नाही? आपण हे ऐकले नाही का, की हा अठरा महिन्यांचा आहे असे! ऐकले आहे? आधी ऐकण्यात आले नसेल, नाही का? की जाऊ द्या, त्याची आई तर, हा अठरा महिन्यांचा आहे, असे सांगते. तो तर खूप हुशार असतो. त्याच्या आईच्या पोटातून बाहेर निघतच नाही. अठरा महिन्यापर्यंत ऐटीत राहतो तिथे!
Page #46
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
मध्ये वेळ किती ?
प्रश्नकर्ता : हा देह सोडणे आणि दुसरा देह धारण करणे, या दोन्हींमध्ये असा किती वेळ लागतो ?
35
दादाश्री : काहीच वेळ लागत नाही. इथून या देहातून अजून निघत आहे आणि तिथे योनीमध्ये हजर होतो, कारण हे टाईमिंग आहे. वीर्य आणि रज यांचा संयोग होतो त्या वेळेला. इथून देहापासून सुटणार आहे आणि तिथे तो संयोग जुळून येतो, हे सर्व एकत्र होते तेव्हा इथून जातो. नाहीतर तो इथून जातच नाही. अर्थात मनुष्याच्या मृत्यूनंतर तो आत्मा इथून सरळ दुसऱ्या योनीमध्ये जातो. म्हणून पुढे काय होईल याची काहीही चिंता करण्यासारखे नाही. कारण की मेल्यानंतर दुसरी योनी प्राप्त होऊनच जाते. आणि त्या योनीमध्ये प्रवेश करताच लगेचच तिथे जेवण वगैरे सर्व मिळते.
त्यापासून सर्जन होते कारण देहाचे
जग भ्रांतीचे आहे, ते क्रियानां बघते. ध्यानाला बघत नाही. ध्यान पुढच्या जन्माचा पुरुषार्थ आहे आणि क्रिया मागील जन्माचा पुरुषार्थ आहे. ध्यान हे पुढच्या जन्मात फळ देणार आहे. ध्यान झाले की त्यावेळी परमाणु बाहेरून ओढले जातात आणि ते ध्यान स्वरूप होऊन आत सूक्ष्मपणे संग्रहित होतात आणि कारण - देहाचे सर्जन होते. जेव्हा ऋणानुबंधाने मातेच्या गर्भात जातो, तेव्हा कार्य - देहाची रचना होते. मनुष्य मरतो तेव्हा आत्मा, सूक्ष्म शरीर तसेच कारण - शरीर सोबत जातात. सूक्ष्म शरीर प्रत्येकाचे कॉमन असते परंतु कारण - शरीर प्रत्येकाचे त्याच्याद्वारे केलेल्या कॉजेस अनुसार . वेगवेगळे असते. सूक्ष्म - शरीर हे इलेक्ट्रिकल बॉडी (तेजसशरीर) आहे.
कारण- कार्याची श्रृंखला
मृत्यूनंतर जन्म आणि जन्मानंतर मृत्यू आहे,
बस.
हे निरंतर चालूच
Page #47
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
राहते. आता हा जन्म आणि मृत्यू का झाले आहेत? तेव्हा म्हणतात, 'कॉजेस अॅन्ड इफेक्ट, इफेक्ट अॅन्ड कॉजेस' कारण आणि कार्य, कार्य आणि कारण. त्यात जर कारणांचा नाश केला गेला, तर हे सारे 'इफेक्ट' बंद होतील, मग नवीन जन्म घ्यावा लागणार नाही.
इथे आयुष्यभर 'कॉजेस' उभे केले आहेत. ते आपले 'कॉजेस' कोणाकडे जाणार? आणि 'कॉजेस' केले आहेत म्हणून ते आपल्याला कार्यफळ दिल्याशिवाय राहत नाहीत. 'कॉजेस' तयार केले आहेत, असे तुम्हाला समजते का?
प्रत्येक कार्यात कॉजेस तयार होतात. तुम्हाला कोणी नालायक म्हटले तर तुमच्या आत 'कॉजेस' तयार होतात. 'तुझा बाप नालायक आहे' हे तुमचे 'कॉजेस' म्हटले जातात. तुम्हाला नालायक म्हटले ते तर नियमानुसार म्हटले गेले आणि तुम्ही त्याला बेकायदेशीर करून टाकले. हे समजले नाही तुम्हाला? का बोलत नाही?
प्रश्नकर्ता : बरोबर आहे.
दादाश्री : अर्थात 'कॉजेस' या जन्मात होतात. त्याचा इफेक्ट पुढच्या जन्मी भोगावा लागतो!
हे तर 'इफेक्टिव' (परिणाम) मोहाला 'कॉजेस' (कारण) मोह मानले जाते. तुम्ही केवळ असे मानता, की 'मी क्रोध करतो' परंतु ही तर तुम्हाला भ्रांती आहे तोपर्यंतच क्रोध आहे. बाकी, हा क्रोध नाहीच, हा तर इफेक्ट आहे. आणि कॉजेस बंद झाले, तेव्हा इफेक्ट एकटाच राहतो, आणि हे 'कॉजेस' बंद झाले म्हणून 'ही इज नॉट रीस्पोन्सिबल फॉर इफेक्ट' अर्थात (परिणामासाठी स्वतः जबाबदार नाही.) आणि 'इफेक्ट' आपला प्रभाव दाखविल्याशिवाय राहत नाही.
कारणं बंद होतात का? प्रश्नकर्ता : देह आणि आत्मा यांच्यात संबंध तर आहे ना?
Page #48
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
38
दादाश्री : हा देह आहे, तो आत्म्याच्या अज्ञान दशेचा परिणाम आहे. जे जे 'कॉजेस' केले, त्याचा हा 'इफेक्ट' आहे. कोणी तुम्हाला फलं वाहीली तर तुम्ही खुश होऊन जाता आणि कोणी तुम्हाला शिव्या दिल्या तर तुम्ही चिडता. या चिडण्यात आणि खुश होण्यात बाह्य दर्शनाची किंमत नाही, अंतरभावामुळे कर्म चार्ज होतात, त्याचा मग पुढच्या जन्मात 'डिस्चार्ज' होतो. त्यावेळी ते 'इफेक्टिव' आहे. हे मन-वचन-काया तिन्ही 'इफेक्टिव' आहेत. 'इफेक्ट' भोगतेवेळी दुसरे नवीन कॉजेस' उत्पन्न होतात, जे पुढील जन्मात परत 'इफेक्टिव' होतात. या प्रकारे 'कॉजेस अॅन्ड इफेक्ट, इफेक्ट अॅन्ड कॉजेस' हा क्रम निरंतर चालूच राहतो.
केवळ मनुष्यजन्मातच कॉजेस बंद होऊ शकतील असे आहे. अन्य सगळ्या गतींमध्ये केवळ 'इफेक्ट' च आहेत. इथे 'कॉजेस अॅन्ड इफेक्ट' दोन्ही आहेत. आम्ही ज्ञान देतो तेव्हा 'कॉजेस' बंद करतो. मग नवीन 'इफेक्ट' होत नाही.
तोपर्यंत भटकायचे आहे.... 'इफेक्टिव बॉडी' अर्थात मन-वचन-कायेच्या तीन बॅटऱ्या तयार होऊन जातात आणि त्यातून परत नवीन 'कॉजेस' उत्पन्न होत राहतात. अर्थात या जन्मामध्ये मन-वचन-काया डिस्चार्ज होत राहतात. आणि दुसऱ्या बाजूने आतमध्ये नवीन चार्ज होत राहतो. मन-वचन-कायेच्या ज्या बॅटऱ्या चार्ज होत राहतात, त्या पुढच्या जन्मासाठी आहेत आणि ह्या मागील जन्माच्या ज्या आहेत, त्या आज डिस्चार्ज होत आहेत. 'ज्ञानी पुरुष' नवीन 'चार्ज' बंद करून देतात म्हणून जुने 'डिस्चार्ज' होत राहते.
मृत्यूनंतर आत्मा दुसऱ्या योनीत जातो. जोपर्यंत स्वत:चे 'सेल्फ' चे रियलाइज (आत्म्याची ओळख) होत नाही तोपर्यंत सगळ्या योनीमध्ये भटकत राहतो. जोपर्यंत मनात तन्मयाकार होतो, बुद्धीत तन्मयाकार होतो तोपर्यंत संसार उभा राहतो. कारण तन्मयाकार होणे अर्थात योनीमध्ये बीज
Page #49
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
पडणे आणि कृष्ण भगवंतांनी सांगितले आहे की योनीमध्ये बीज पडते आणि त्यामुळे हा संसार उभा राहिला आहे. योनीत बीज पडणे बंद झाले की त्याचा संसार समाप्त झाला.
38
विज्ञान वक्रगतीचे आहे
प्रश्नकर्ता: 'थिअरी ऑफ इवोल्युशन' (उत्क्रांतीवाद ) च्या अनुसार जीव एक इन्द्रिय, दोन इन्द्रिय असे 'डेव्हलप' होत-होत मनुष्यात येतो आणि मनुष्यातून परत जनावरात जातो. तर या 'इवोल्युशन थिअरी' मध्ये जरा विरोधाभास वाटतो. ते जरा स्पष्ट कराल ?
दादाश्री : नाही. यात विरोधाभासासारखे काहीच नाही. 'इवोल्युशनची थिअरी' सगळी बरोबर आहे. केवळ मनुष्यापर्यंतच 'इवोल्युशनची थिअरी' करेक्ट आहे. मग त्याच्या पुढची गोष्ट ती लोकं जाणत नाहीत.
प्रश्नकर्ता : मनुष्यातून पशुमध्ये परत जातो का ? प्रश्न हा आहे.
दादाश्री : असे आहे. आधी डार्विनची थिअरी 'उत्क्रांतीवादा'च्या अनुसार ‘डेव्हलप’ होत-होत मनुष्यापर्यंत येतो आणि मनुष्यात आला म्हणून ‘इगोइजम' (अहंकार) सोबत असल्यामुळे कर्ता होतो. कर्माचा कर्ता होतो, म्हणून मग कर्मानुसार त्याला भोगण्यासाठी जावे लागते. 'डेबिट' (पाप) करेल तेव्हा जनावरात जावे लागेल आणि 'क्रेडिट' (पुण्य) करेल, तेव्हा देवगतीत जावे लागेल किंवा मग मनुष्य गतीत राजपद मिळेल, अर्थात मनुष्यात आल्यानंतर परत 'क्रेडीट' आणि 'डेबिट' वर अवलंबून आहे.
नंतर नाहीत चौऱ्यांशी योनी
प्रश्नकर्ता : परंतु असे म्हणतात ना की, मानवजन्म की जो चौऱ्याशी लक्ष योनीमध्ये भटकल्यानंतर मिळतो, तर त्याला परत एवढे भटकावे लागते त्यानंतर मानवजन्म मिळतो ?
दादाश्री : नाही. असे काही नाही. एकदा मनुष्यजन्म मिळाला तर
Page #50
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
परत पूर्ण चौऱ्यांशी लक्ष भटकावे लागत नाही. त्याला जर पाशवतेचे विचार आले तर जास्तीत जास्त आठ जन्म त्याला पशूयोनीत जावे लागेल. ते ही केवळ शे-दोनशे वर्षासाठी. त्यानंतर परत इथल्या इथेच मनुष्यात येतो. एकदा मनुष्य झाल्यानंतर चौऱ्यांशी लाख फेऱ्यात भटकावे लागत नाही.
प्रश्नकर्ता : एकच आत्मा चौऱ्यांशी लाख फेऱ्यात फिरतो ना?
दादाश्री : हो. एकच आत्मा.
प्रश्नकर्ता : पण आत्मा तर पवित्र आहे ना?
दादाश्री : आत्मा पवित्र तर आता, यावेळीही आहे. चौऱ्यांशी लाख योनीमध्ये फिरूनही पवित्रच राहिला आहे. पवित्र होता आणि पवित्रच राहील!!
वासनेच्या अनुसार गती प्रश्नकर्ता : मरणाआधी जशी वासना असेल, त्याच रुपात जन्म होतो ना?
दादाश्री : हो, ती वासना, आपली लोकं म्हणतात ना की मरणाआधी अशी वासना होती. पण ती वासना काही अशीच आणू शकत नाही, तो तर हिशोब आहे, संपूर्ण जीवनाचा. आयुष्यभरात तुम्ही जे काही केले असेल, त्याचा मृत्यूवेळी शेवटचा जो तास असतो तेव्हा हिशोब समोर येतो आणि त्या हिशोबानुसार त्याची गती होते.
मनुष्यातून मनुष्यच बनतो का? प्रश्नकर्ता : मनुष्यातून मनुष्यातच जाणार आहेत ना?
दादाश्री : ही स्वत:ची चुकीची समज आहे. बाकी स्त्रीच्या पोटातून मनुष्यच जन्म घेतो. तेथे कोणी गाढव जन्माला येत नाही. मात्र तो असे समजतो की मी मेलो तरीपण परत मनुष्य म्हणूनच माझा जन्म होईल तर
Page #51
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
ती चूक आहे. अरे मुर्खा, तुझे विचार तर गाढवाचे आहेत, मग तू मनुष्य होणार तरी कसा? तुला विचार येतात, कोणाचे उपभोगू, कोणाचे हिसकावून घेऊ, बिनहक्काचे भोगण्याचे विचार येतात, ते विचारच घेऊन जातात त्या त्या गतीमध्ये..
प्रश्नकर्ता : जीवाचा असा काही क्रम आहे का की मनुष्यात आल्यानंतर परत मनुष्यातच येईल की दुसरीकडे जाईल?
दादाश्री : हिंदुस्तानात मनुष्यजन्मात आल्यानंतर चारही गतीमध्ये भटकावे लागते. फॉरेनच्या माणसाचे असे नाही. त्यांच्यात दोन-पाच टक्के अपवाद असतात, दुसरे सगळे वर चढतच राहतात.
प्रश्नकर्ता : लोक ज्याला विधाता म्हणतात ते कोणाला म्हणतात?
दादाश्री : ते निसर्गाला विधाता म्हणतात. विधाता नावाची कोणी देवी नाही. सायन्टिफिक सरकमस्टॅन्शिअल एविडन्स (वैज्ञानिक संयोगिक पुरावे) तेच विधाता आहे. आपल्या लोकांनी ठरवले आहे की, सहाव्या दिवशी विधाता लेख लिहून जातो. विकल्पांनी हे सगळे ठीक आहे आणि जर वास्तविक जाणून घ्यायचे असेल तर हे खरे नाही.
येथे तर कायदा असा आहे की ज्याने बिनहक्काचे घेतले असेल त्याचे दोन पायातून चार पाय होऊन जातील. परंतु ते नेहमीसाठी नाही. जास्तीत जास्त दोनशे वर्ष आणि खूप झाले तर सात-आठ जन्म जनावर गतीत जातील. आणि कमीत कमी पाचच मिनिटात जनावरात जाऊन परत मनुष्यात येतो. कित्येक जीव असे आहेत की एका मिनिटात सतरा जन्म बदलतात. अर्थात असेही जीव आहेत. म्हणून जनावरात गेलेत, त्या सगळ्यांनाच शे-दोनशे वर्षाचे आयुष्य मिळेल असे नाही.
हे समजते लक्षणांवरून प्रश्नकर्ता : हे जनावर योनीत जाणार आहे, याचा काही पुरावा तर सांगा. त्याला वैज्ञानिक आधारावर कशाप्रकारे मानायचे?
Page #52
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
दादाश्री : इथे कोणी भुंकत राहतो असा मनुष्य भेटला आहे तुम्हाला ? 'का भुंकत राहतोस?' असे तुम्ही त्याला बोलले होते ? तो तिथून, कुत्र्याच्या योनीतून आला आहे. कोणी माकडासारख्या हालचाली करेल, असे असतात ! ते तिथूनच आलेले असतात. कोणी मांजरी सारखे एकटक बघत असतात, आपले काही घेण्यासाठी, हिसकावण्यासाठी, ते तिथून आलेले असतात. अर्थात, ते इथे कुठून आले आहेत तेही ओळखू शकतो आणि कुठे जाणार आहेत हे ही ओळखू शकतो, आणि ते सुद्धा कायमसाठी नाही. हे लोक तर कसे आहेत, यांना पाप करता देखील येत नाही.
41
या कलियुगात लोकांना पाप करणे येत नाही आणि करतात ही पापच! म्हणून त्यांच्या पापाचे फळ कसे असते ? खूप झाले तर पन्नासशंभर वर्ष जनावरात जाऊन परत इथल्या इथेच येतात. हजारो वर्ष किंवा लाखो वर्ष नाही. आणि कित्येक तर पाच वर्षातच जनावरात जाऊन परत येतात, म्हणून जनावरात जाणे हा गुन्हा समजू नका. कारण की ते लगेचच परत येतात बिचारे. कारण की असे पापच करत नाहीत ना ! त्यांच्यात शक्तिच नाही असे पाप करण्याची.
नियम, हानी - वृद्धीचा
प्रश्नकर्ता : या मनुष्यांची संख्या वाढतच चालली आहे, याचा अर्थ असा की जनावरे कमी झाली आहेत ?
दादाश्री : हो. खरे आहे. जेवढे आत्मा आहेत तेवढेच आत्मा राहतात. पण ‘कन्वर्जन' (रुपांतर) होत राहते. कधी मनुष्य वाढतात तेव्हा जनावर कमी होतात, आणि कधी जनावर वाढतात तेव्हा मनुष्य कमी होतात. असे कन्वर्जन होत राहते. आता परत मनुष्य कमी होतील. आता सन १९९३ पासून सुरुवात होईल कमी व्हायला.
तेव्हा लोकं कॅल्क्युलेशन (मोजणी ) करतील की सन २००० मध्ये असे होईल आणि तसे होईल. हिंदुस्तानातील जनसंख्या वाढेल, मग आम्ही काय खाणार? असे कॅल्क्युलेशन करतात, नाही का ? ते कशासारखे आहे ? 'सिमिली' (उपमा) सांगू ?
Page #53
--------------------------------------------------------------------------
________________
42
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
एक चौदा वर्षांचा मुलगा असेल, त्याची उंची चार फुट आणि चार इंच असेल आणि अठराव्या वर्षी पाच फुट उंची असेल. तेव्हा म्हणतात की चार वर्षात आठ इंच वाढला. तेव्हा तो सतराव्या वर्षी किती वाढेल? असे कॅल्क्युलेशन करतो, अशाच प्रकारे हे जनसंख्येचे कॅल्क्युलेशन करतात.
मुलांना दुःख का? प्रश्नकर्ता : निर्दोष मुलाला शारीरिक वेदना भोगावी लागते, त्याचे कारण काय?
दादाश्री : मुलाच्या कर्माचा उदय मुलाला भोगायचा आहे आणि 'आई'ला तो बघून भोगायचा आहे. मूळ कर्म मुलाचे आहे, त्यात आईची अनुमोदना होती. म्हणून 'आई'ला ते बघून भोगायचे आहे. म्हणजे करणे, करविणे आणि अनुमोदना करणे हे तीन कर्मबंधनाची कारणे आहेत.
मनुष्य जीवनाची महत्ता मनुष्य देहात आल्यानंतर अन्य गतीमध्ये जसे की देव, तिर्यंच अथवा नरकात जाऊन आल्यानंतर परत मनुष्यदेह प्राप्त होतो. आणि भटकंतीचे अंत, हे सुद्धा मनुष्य देहातूनच मिळते. हा मनुष्य देह जर सार्थक करता आला तर मोक्षाची प्राप्ती होऊ शकेल असे आहे, नाही तर भटकण्याचे साधन वाढवेल, असेही आहे ! दुसऱ्या गतींमध्ये केवळ सुटत जातो. परंतु यात दोन्हीही आहे. सुटतो आणि सोबतच बांधला जातो. दुर्लभ मनुष्य देह प्राप्त झाला आहे तर त्यापासून आपले (मोक्षाचे) काम काढून घ्या. अनंत जन्म आत्म्याने देहासाठी घालवले आहेत. एक जन्म जर देह आत्म्यासाठी काढेल तर कामच होऊन जाईल.
मनुष्य देहातच जर ज्ञानी पुरुष भेटले तर मोक्षाचा उपाय होईल. देवताही मनुष्यदेहासाठी व्याकुळ असतात. ज्ञानी पुरुषांशी भेट झाल्याने, तार जुळल्याने, अनंत जन्मापर्यंत शत्रू समान झालेला हा देह परम मित्र
Page #54
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
बनतो. म्हणून या देहात आपल्याला ज्ञानी पुरुष भेटले आहेत तर पूर्णसंपूर्ण काम काढून घ्या. पूर्ण तार जोडून तडीपार उतरुन जा.
अजन्म - अमरला आवागमन कसे असणार ?
प्रश्नकर्ता: परंतु आवागमनाचा फेरा कोणाला आहे ?
दादाश्री : जो अहंकार आहे ना, त्याला आवागमन आहे. आत्मा तर मूळ दशेतच आहे. अहंकार मग बंद होतो. म्हणून त्याचे फेरे बंद होऊन जातात!
43
मग मृत्यूचीही भीती नाही
प्रश्नकर्ता : मात्र ही सनातन शांती प्राप्त केली तर ती या जन्मापूरतीच असते की जन्म-जन्मांपर्यंत असते ?
दादाश्री : नाही. ती तर परमनन्ट झाली. मग कर्ताच राहिला नाही, म्हणून कर्मबंधन नाही. एक किंवा दोन जन्मांनंतर मोक्ष होतोच. सुटकाच नाही. चालतच नाही. ज्याला मोक्षाला जायचे नसेल, त्याने हा धंदा करायचा नाही. या लाईनीत पडायचेच नाही. ज्याला मोक्ष पसंत नाही, त्याने या लाईनीत पडायचेच नाही.
प्रश्नकर्ता : हे सगळे ज्ञान आहे, ते दुसऱ्या जन्मात गेल्यावर आठवते
का ?
दादाश्री : सर्वकाही त्या रुपातच असणार. बदलणार नाही. कारण की कर्म ( नवीन) बांधले जात नाहीत, म्हणून पुन्हा गुंता निर्माण होतच नाही.
प्रश्नकर्ता : तर याचा अर्थ असा झाला की आमच्या मागील जन्माची अशी कर्म असतात, ज्यामुळे गुंता चालूच राहतो ?
दादाश्री : मागील जन्मात अज्ञानतेने कर्म बांधले, त्या कर्मांचा हा इफेक्ट आहे. इफेक्ट भोगावेच लागतात. इफेक्ट भोगता भोगता जर ज्ञानी भेटले नाही, तर परत नवीन कॉजेस आणि परिणाम स्वरूप नवीन
Page #55
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
इफेक्ट उत्पन्न होतच राहतात. इफेक्टमधून परत कॉजेस उत्पन्न होणार आणि ते कॉजेस परत पुढच्या जन्मी इफेक्ट देतील. कॉजेस अॅन्ड इफेक्ट, इफेक्ट अॅन्ड कॉजेस, कॉजेस अॅन्ड इफेक्ट, इफेक्ट अॅन्ड कॉजेस, कॉजेस अॅन्ड इफेक्ट, हे चालूच राहते. म्हणून ज्ञानी पुरुष जेव्हा कॉजेस बंद करतात तेव्हा फक्त इफेक्टच भोगावे लागतात. म्हणून कर्मबंधन बंद होऊन गेले.
म्हणून सर्व 'ज्ञान' लक्षात राहते, एवढेच नाही, तर स्वतः ते स्वरुपच होऊन जातो. मग मरणाचीही भीती वाटत नाही. कशाचीच भीती वाटत नाही, निर्भयता राहते.
अंतिम वेळी जागृती
जिवंत आहोत, तोपर्यंत प्रश्नकर्ता : दादाश्री, ज्ञान घेण्याआधी या जीवनात जे पर्याय बांधले गेले आहेत, त्याचे निराकरण कसे होईल?
दादाश्री : आता जिवंत आहोत, तोपर्यंत पश्चाताप करुन त्यांना धुवून टाकायचे, परंतु ते ठराविकच, पूर्ण निराकरण होत नाही. परंतु सैल तर होतातच. सैल होतील म्हणून पुढील जन्मात हात लावताच लगेच गाठ सुटून जाते.
प्रश्नकर्ता : प्रायश्चित्ताने बंध सुटतात?
दादाश्री : हो, सुटतात? ठराविक प्रकारचे कर्म बंध आहेत, ते कर्म प्रायश्चित करण्याने मजबूत गाठीतून सैल होतात. आपल्या प्रतिक्रमणात खूप शक्ती आहे. दादांना साक्षी ठेवून कराल तर काम
होईल.
हे ज्ञान मिळाल्यानंतर हिशोब महाविदेहचा कर्माच्या धक्क्याने जे जन्म होणार असतील ते होतील. कदाचित
Page #56
--------------------------------------------------------------------------
________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
एक-दोन जन्म. पण त्यानंतर सीमंधर स्वामीं जवळच जावे लागेल. हा इथला धक्का, इथला हिशोब आधीच बांधला गेला आहे, थोडा चिकट झाला आहे, पण तो पूर्ण होऊन जाईल. त्यापासून सुटकाच नाही ना.
प्रश्नकर्ता : प्रतिक्रमण केल्याने कर्माचे धक्के कमी होतात ? दादाश्री : कमी होतात ना! आणि लवकर संपूष्टात येईल.
'आम्ही' असे केले निवारण विश्वासोबत
45
जितक्या चुका संपविल्या प्रतिक्रमण करता करता, तितका मोक्ष
जवळ आला.
प्रश्नकर्ता : त्या फाईली परत तर चिकटणार नाहीत ना, दुसऱ्या जन्मात ?
दादाश्री : कशासाठी ? आपल्याला दुसऱ्या जन्मात कशाला ? इथल्या इथेच इतके सारे प्रतिक्रमण करुन टाका. वेळ मिळाला की त्यासाठी प्रतिक्रमण करतच राहिले पाहिजे. 'चंदूभाऊ 'ला 'तुम्ही' एवढेच सांगायला पाहिजे की प्रतिक्रमण करतच रहा. तुमच्या घरातील सगळ्या सदस्यांना पूर्वी तुमच्याकडून काही ना काही दुःख झाले असे त्यासाठी तुम्ही प्रतिक्रमण करावे. संख्यात अथवा असंख्यात जन्मांपासून जे राग-द्वेष, विषय, कषायचे दोष केले असतील, त्याची क्षमा मागतो. असे रोज एकएक व्यक्तिचे, असेच घरातील प्रत्येक व्यक्तिला आठवून करायला पाहिजे. नंतर आसपासचे, शेजारी-पाजारी सगळ्यांना आठवून उपयोग ठेवून हे करायला पाहिजे. तुम्ही असे केल्यानंतर हे ओझे हलके होत जाईल. असेच काही हलके होणार नाही.
आम्ही पूर्ण विश्वासोबत अशा प्रकारे निवारण केले आहे. आधी असे निवारण केले होते तेव्हाच तर सुटका झाली. जोपर्यंत आमचा दोष तुमच्या मनात आहे तोपर्यंत मला चैन पडणार नाही. म्हणून आम्ही जेव्हा असे प्रतिक्रमण करतो तेव्हा तिथे पुसला जातो.
Page #57
--------------------------------------------------------------------------
________________
46
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
मृतकांचे प्रतिक्रमण प्रश्नकर्ता : ज्याची क्षमा मागायची आहे त्या व्यक्तिचा देहविलय झाला असेल, तर प्रतिक्रमण कसे करायचे?
दादाश्री : देहविलय झाला असेल, तरी पण जर त्याचा फोटो असेल, त्याचा चेहरा आठवत असेल, तर प्रतिक्रमण करू शकता. चेहरा जरी आठवत नसेल आणि नाव माहित असेल, तर नाव घेऊनही करू शकता, तरीही त्याला पोहोचेल सर्व.
प्रश्नकर्ता : म्हणजे मृतक व्यक्तिचे प्रतिक्रमण कशाप्रकारे करायचे?
दादाश्री : मन-वचन-काया, भावकर्म, द्रव्यकर्म, नोकर्म मृतकाचे नाव तसेच त्याच्या नावाची सर्व मायेपासून भिन्न अशा त्याच्या शुद्धात्म्याला आठवायचे. आणि नंतर 'अशी चूक झाली होती' ते आठवून (आलोचना) त्या चुकांसाठी मला पश्चाताप होत आहे आणि त्यासाठी मला क्षमा करा (प्रतिक्रमण). अशा चुका पुन्हा होणार नाहीत असा दृढ निश्चय करतो, असे नक्की करा. (प्रत्याख्यान). 'तुम्ही' स्वतः चंदूभाऊचे ज्ञाता-दृष्टा रहायचे आणि जाणायचे की चंदूभाऊने किती प्रतिक्रमण केले, किती सुंदर केले आणि किती वेळा केले.
Page #58
--------------------------------------------------------------------------
________________
अंतिम वेळेची प्रार्थना ज्याची अंतिम वेळ जवळ आली असेल, त्याने अशाप्रकारे प्रार्थना करायला पाहिजे.
'हे दादा भगवान, हे श्री सीमंधर स्वामी प्रभू, मी मन-वचन-काया ...* (ज्याची अंतिम वेळ आली असेल त्या व्यक्तीने स्वतःचे नाव घ्यावे) ' तथा ...*... नावाची सर्व माया, भावकर्म, द्रव्यकर्म, नोकर्म आपण प्रकट परमात्मा स्वरूप प्रभूच्या सुचरणी समर्पित करीत आहे.
हे दादा भगवान, हे श्री सीमंधर स्वामी प्रभू, मी आपले अनन्य शरण स्वीकारत आहे. मला आपले अनन्य शरण मिळो. अंतिम क्षणी हजर रहा. माझे बोट धरुन मोक्षास घेऊन जा. शेवटपर्यंत सोबत रहा.
हे प्रभू, मला मोक्षाशिवाय या जगातील दुसरी कोणतीही विनाशी वस्तू नको. माझा पुढील जन्म आपल्या चरणी आणि शरणीच होवो.
'दादा भगवानांचा असीम जय जयकार हो' बोलत रहावे. (अशाप्रकारे त्या व्यक्तिने वारंवार बोलायचे अथवा त्याच्याकडून कोणीही वारंवार बोलवून घ्यावे.)
Page #59
--------------------------------------------------------------------------
________________
मृत व्यक्तिसाठी प्रार्थना आपल्या कोणी मृत स्वजनासाठी किंवा मित्रासाठी अशा प्रकारे प्रार्थना केली पाहिजे.
'प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने, प्रत्यक्ष सीमंधर स्वामींच्या साक्षीने, देहधारी... *(मृत व्यक्तिचे नाव घ्यावे)च्या मन-वचन-कायेचा योग, भावकर्म-द्रव्यकर्म, नोकर्माने भिन्न असे हे शुद्धात्मा भगवान, आपण अशी कृपा करा की ..*.. जेथे असतील तेथे त्यांना सुख-शांती मिळो, मोक्ष मिळो.'
आज दिवसाच्या अद्यक्षणापर्यंत माझ्याकडून ..*.. च्यासाठी जे काही राग-द्वेष, कषाय झाले असतील, त्याबद्दल मी माफी मागतो. हृदयपूर्वक पश्चाताप करतो. मला क्षमा करा आणि पुन्हा असे दोष कधीच होणार नाहीत, अशी मला शक्ती दया.
(अशा प्रकारे वारंवार प्रार्थना केली पाहिजे. नंतर जेव्हा जेव्हा मृत व्यक्तिची आठवण येईल, तेव्हा ही प्रार्थना केली पाहिजे.)
Page #60
--------------------------------------------------------------------------
________________
शुद्धात्मा प्रति प्रार्थना
हे अंतर्यामी परमात्मा ! आपण प्रत्येक जीवमात्रांमध्ये विराजमान आहात, तसेच माझ्यामध्ये पण विराजमान आहात, आपले स्वरूप हेच माझे स्वरूप आहे, माझे स्वरूप शुद्धात्मा आहे.
हे शुद्धात्मा भगवान ! मी आपल्याला अभेदभावे अत्यंत भक्तीपूर्वक नमस्कार करीत आहे.
अज्ञानतेमुळे मी जे जे ★ ★ दोष केले आहेत, त्या सर्व दोषांना आपल्या समक्ष जाहीर करीत आहे. त्याचे हदयपूर्वक खूप पश्चाताप करीत आहे आणि आपल्याजवळ क्षमा प्रार्थित आहे. हे प्रभू! मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा आणि पुन्हा असे दोष करू नये अशी आपण मला शक्ति द्या, शक्ति द्या, शक्ति द्या.
हे शुद्धात्मा भगवान ! आपण अशी कृपा करा की आमचे भेदभाव मिटून जावे आणि अभेद स्वरूप प्राप्त व्हावे. आम्ही आपल्यात अभेद स्वरूपाने तन्मायाकार राहू.
★★ (जे जे दोष झाले असतील ते मनात जाहीर करावे. )
प्रतिक्रमण विधि
प्रत्यक्ष दादा भगवानांच्या साक्षीने देहधारी ...... (ज्याच्या प्रति दोष झाला असेल त्या व्यक्तिचे नाव) च्या मन-वचन-कायेचे योग, भावकर्म, द्रव्यकर्म, नोकर्माहून भिन्न असे हे शुद्धात्मा भगवान ! आपल्या साक्षीने, आजच्या दिवसापर्यंत जे जे ★ ★ दोष झाले आहेत, त्यांची क्षमा मागत आहे, हृदयपूर्वक खूप पश्चाताप करीत आहे. मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा. आणि पुन्हा असे दोष कधीही करणार नाही, असा दृढ निश्चय करीत आहे, त्यासाठी मला परम शक्तिद्या.
** क्रोध-मान-माया-लोभ, विषय-विकार, कषाय इत्यादीपासून त्या व्यक्तिला दुःख दिले गेले असेल त्या सर्व दोषांना मनात आठवायचे.
Page #61
--------------------------------------------------------------------------
________________
संपर्क सूत्र
दादा भगवान परिवार
अडालज : त्रिमंदिर, सीमंधर सिटी, अहमदाबाद - कलोल हाईवे, पोस्ट : अडालज, जि.- गांधीनगर, गुजरात - 382421, फोन : (079) 39830100 अहमदाबाद: दादा दर्शन, ५, ममतापार्क सोसाइटी, नवगुजरात कॉलेजच्या मागे उस्मानपुरा, अहमदाबाद- 380014. फोन : (079) 27540408 वडोदरा : दादा मंदिर, १७, मामाची पोल - मुहल्ला, रावपुरा पुलिस स्टेशन समोर, सलाटवाड़ा, वडोदरा. फोन : 9924343335
गोधरा
राजकोट : त्रिमंदिर, अहमदाबाद - राजकोट हाईवे, तरघड़िया चोकड़ी ( सर्कल), पोस्ट : मालियासण, जि. राजकोट. फोन : 9924343478
सुरेन्द्रनगर : त्रिमंदिर, लोकविद्यालय जवळ, सुरेन्द्रनगर - राजकोट हाईवे, मुळी रोड. फोन : 9737048322
अमरेली
मोरबी
भुज
अंजार
: त्रिमंदिर, भामैया गाँव, एफसीआई गोडाउन समोर, गोधरा जि. - पंचमहाल. फोन : 9723707738
मुंबई कोलकता
जयपुर
इन्दौर
रायपुर
पटना
बेंगलूर पूणे
: त्रिमंदिर, लीलीया बायपास चोकडी, खारावाडी. फोन : 9924344460 : त्रिमंदिर, पो- जेपुर ( मोरबी), नवलखी रोड, जि. - मोरबी, फोन : 9924341188
: त्रिमंदिर, हिल गार्डनच्या मागे, एयरपोर्ट रोड. फोन : 9924345588 : त्रिमंदिर, अंजार - मुंद्रा रोड, सीनोग्रा पाटीया जवळ,
सीनोग्रा गाँव,
ता. - अंजार. फोन : 9924346622
: 9323528901
: 9830093230
: 8290333699
: 9039936173
: 9329644433
: 7352723132
: 9590979099
: 7218473468
दिल्ली
: 9810098564
चेन्नई
: 9380159957
: 9425024405
भोपाल जबलपुर : 9425160428 भिलाई : 9827481336 अमरावती : 9422915064
हैदराबाद : 9885058771 जालंधर : 9814063043
U.S.A.: +1 877-505-DADA (3232) U.K. : +44 330-111-DADA (3232) Kenya : +254 722 722 063
: +971 557316937 +65 81129229
: +61 421127947
New Zealand : +64210376434 Website : www.dadabhagwan.org
UAE Singapore Australia
Page #62
--------------------------------------------------------------------------
________________ अंतिम दिवसात ऑक्सिजनवर, तरीही मुक्तहास्य.... पोहोचतात मात्र भावनांचे स्पंदन मुलाचा (किंवा कोणत्याही नातेवाईकाचा) मृत्यू झाल्यांनतर त्याच्या मागे चिंता केल्यामुळे त्याला दुःख होते. आपले लोक अज्ञानतेमुळे हे सर्व करतात. म्हणून तुम्हाला जसे आहे तसे समजून घेऊन शांततापूर्वक राहिले पाहिजे. व्यर्थ डोकेफोडी करण्यात काय अर्थ आहे? हे तर संसाराचे ऋणानुबंध आहेत, घेण्या-देण्याचा हिशोब आहे. मृत्यू होणे म्हणजे काय? वहीखात्यातील हिशोब पूर्ण होणे. आपल्याला जर त्याची खूप आठवण येत असेल तर काय करावे? वीतराग भगवंतांना सांगावे की, त्याला शांति द्या. आपण भावना केली तर ती भावना त्याच्यापर्यंत पोहोचतेच! -दादाश्री Printed in India dadabhagwan.org Price 10