________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
दादाश्री : या जगात जे काही डोळ्यांनी दिसते, कानांनी ऐकायला येते, ते सारे 'रिलेटीव करेक्ट' ( व्यवहार सत्य) आहे. अगदी खरी गोष्ट नाही ही. हे शरीरही आपले नाही, तर मुलगा आपला कसा असू शकतो ? हे तर व्यवहाराने, लोक - व्यवहाराने आपला मुलगा मानतात. वास्तवात तो आपला मुलगा नसतोच, खरे तर हे शरीर सुद्धा आपले नाही. म्हणजे, जे आपल्या जवळ आहे तेवढेच आपले आणि दुसरे सारे परके आहे! म्हणून मुलाला आपला मुलगा मानत रहाल, तर उपाधी होईल आणि अशांती राहील. तो मुलगा आता गेला. खुदाची अशीच मर्जी आहे, तर त्याला आता 'लेट गो' करा.
12
प्रश्नकर्ता : ते तर ठीक आहे, अल्लाहची अमानत आमच्याजवळ होती, ती घेतली.
दादाश्री : हो, बस. हा सारा बाग अल्लाहचाच आहे.
प्रश्नकर्ता : त्याचा जो अशा प्रकारे मृत्यू झाला, तर ते आमचे कुकर्म असेल ?
दादाश्री : हो. मुलाचेही कुकर्म आणि तुमचेही कुकर्म. चांगले कर्म असते तर चांगलेच झाले असते.
पोहोचतात मात्र भावस्पंदन
मुलांचा जर मृत्यू झाला असेल तर त्यांच्या मागे चिंता केल्याने त्यांना दुःख होते. आपले लोक अज्ञानतेमुळे असे सर्व करतात, म्हणून आपल्याला जसे आहे तसे समजून, शांत राहिले पाहिजे. विनाकारण डोकेफोडी कराल, त्याला काय अर्थ आहे ? सगळ्या ठिकाणी, कोणीही असे नाही की ज्यांच्या मुलांनी या जगाचा निरोप घेतलेला नाही. हे तर केवळ संसारिक ऋणानुबंध आहेत, देण्या-घेण्याचा हिशोब आहे. आम्हांला सुद्धा मुलगा-मुलगी होते. परंतु ते ही वारले. पाहुणे आले होते, ते पाहुणे निघून गेले. ते आपले सामानच कुठे आहे ? आपल्याला सुद्धा नाही का