________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
11
दादाश्री : परमेश्वराला प्रार्थना करायला हवी की त्यांचे भले होवो.
नंतर कुठे गेले ते माहित पडत नाही
प्रश्नकर्ता : कोणाचे निधन झाले असेल, आणि आम्हाला जर हे जाणून घ्यायचे असेल की ती व्यक्ति आता कुठे आहे, तर ते कसे माहित पडेल ?
दादाश्री : ते तर ठराविक ज्ञानाशिवाय दिसणार नाही ना ! ठराविक ज्ञान हवे त्यासाठी आणि ते जाणून घेऊनही त्याचा काही अर्थ नाही, परंतु आपण भावना केली तर ती भावना मात्र पोहोचते. आपण आठवण काढली, भावना केली तर ती पोहोचते. ते तर, ज्ञानाशिवाय दुसरे काहीच माहित पडत नाही ना !
तुला कोणाची तरी माहिती काढायची आहे का ? तुझे कोणी नातेवाईक गेलेत का ?
प्रश्नकर्ता : माझा सख्खा भाऊ आत्ताच मृत्यू पावला.
दादाश्री : तो तुझी आठवण काढत नाही आणि तू त्याला आठवत राहतोस? हे मृत्यू होणे याचा अर्थ काय आहे, हे तू समजतो ? वहीखात्याचा हिशोब पूर्ण होणे, हा आहे. म्हणून आपण काय करायचे, की जर आम्हाला त्याची खूप आठवण येत असेल तर वीतराग भगवंतांना सांगायचे की त्याला शांती द्या. आठवण येते, म्हणून त्याला शांती मिळावी असे म्हणायचे. दुसरे आपण काय करु शकतो ?
अल्लाहची अमानत
तुम्हाला जे विचारायचे असेल ते विचारा. अल्लाजवळ जाण्यासाठी ज्या काही अडचणी येतात, त्या आम्हाला विचारा, आम्ही त्या दूर करून देऊ.
प्रश्नकर्ता : माझ्या मुलाचे अपघातात निधन झाले, तर त्या दुर्घटनेचे कारण काय असेल ?