________________
10
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
नाही. पण जो मरतो त्याला शिव्या खाणे लिहिलेले होते, भरपूर शिव्या देतात!
म्हणून खाल्ल्या.
आमचे जे लोक स्मशानात जातात, ते परत येत नाही ना, की सगळे परत येतात? अर्थात ही तर एक प्रकारची फजिती आहे ! रडले तरी दुःख आणि नाही रडले तरी दुःख खूप रडले तर लोक म्हणणार की, 'इतरांकडे कोणी मरत नाहीत का, की तुम्ही इतके रडत आहात ? घनचक्कर आहात की काय ?' आणि नाही रडले तर म्हणणार की, 'तुम्ही दगड आहात. ' हृदय दगडासारखे आहे तुमचे.' अर्थात कुठे जायचे हीच समस्या आहे. सर्वकाही पद्धतशीर असायला हवे, असे म्हणतील.
तिथे स्मशानात जाळणारही आणि सोबत जवळच्या हॉटेलमध्ये बसून चहा-नाश्टाही करतील, नाश्टा करतात ना लोकं ?
प्रश्नकर्ता : नाश्टा सोबतच घेऊन जातात ना !
दादाश्री : असे होय, काय सांगता? म्हणजे, असे आहे हे सारे जग. अशा जगात कसे रहावे ?
येण्या-ज - जाण्याचा संबंध ठेवतात, पण डोक्यावर काही घेत नाहीत. तुम्ही घेता का डोक्यावर आता ? डोक्यावर घेता ? पत्नी किंवा अन्य कोणाचेच नाही ?
प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : काय सांगता? आणि तो तर अजून बायकोला शेजारी बसवून ठेवतो. म्हणतो की, तुझ्याशिवाय मला करमत नाही. परंतु स्मशानात सोबत मात्र कोणीच जात नाही. जातो का कोणी ?
मृत्यूतिथीच्या वेळी
प्रश्नकर्ता : कुटुंबात कोणाची तिथी आली की त्या दिवशी कुटुंबीयांनी काय करायला हवे.