________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
दादाश्री : इथे कोणी भुंकत राहतो असा मनुष्य भेटला आहे तुम्हाला ? 'का भुंकत राहतोस?' असे तुम्ही त्याला बोलले होते ? तो तिथून, कुत्र्याच्या योनीतून आला आहे. कोणी माकडासारख्या हालचाली करेल, असे असतात ! ते तिथूनच आलेले असतात. कोणी मांजरी सारखे एकटक बघत असतात, आपले काही घेण्यासाठी, हिसकावण्यासाठी, ते तिथून आलेले असतात. अर्थात, ते इथे कुठून आले आहेत तेही ओळखू शकतो आणि कुठे जाणार आहेत हे ही ओळखू शकतो, आणि ते सुद्धा कायमसाठी नाही. हे लोक तर कसे आहेत, यांना पाप करता देखील येत नाही.
41
या कलियुगात लोकांना पाप करणे येत नाही आणि करतात ही पापच! म्हणून त्यांच्या पापाचे फळ कसे असते ? खूप झाले तर पन्नासशंभर वर्ष जनावरात जाऊन परत इथल्या इथेच येतात. हजारो वर्ष किंवा लाखो वर्ष नाही. आणि कित्येक तर पाच वर्षातच जनावरात जाऊन परत येतात, म्हणून जनावरात जाणे हा गुन्हा समजू नका. कारण की ते लगेचच परत येतात बिचारे. कारण की असे पापच करत नाहीत ना ! त्यांच्यात शक्तिच नाही असे पाप करण्याची.
नियम, हानी - वृद्धीचा
प्रश्नकर्ता : या मनुष्यांची संख्या वाढतच चालली आहे, याचा अर्थ असा की जनावरे कमी झाली आहेत ?
दादाश्री : हो. खरे आहे. जेवढे आत्मा आहेत तेवढेच आत्मा राहतात. पण ‘कन्वर्जन' (रुपांतर) होत राहते. कधी मनुष्य वाढतात तेव्हा जनावर कमी होतात, आणि कधी जनावर वाढतात तेव्हा मनुष्य कमी होतात. असे कन्वर्जन होत राहते. आता परत मनुष्य कमी होतील. आता सन १९९३ पासून सुरुवात होईल कमी व्हायला.
तेव्हा लोकं कॅल्क्युलेशन (मोजणी ) करतील की सन २००० मध्ये असे होईल आणि तसे होईल. हिंदुस्तानातील जनसंख्या वाढेल, मग आम्ही काय खाणार? असे कॅल्क्युलेशन करतात, नाही का ? ते कशासारखे आहे ? 'सिमिली' (उपमा) सांगू ?