________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
ती चूक आहे. अरे मुर्खा, तुझे विचार तर गाढवाचे आहेत, मग तू मनुष्य होणार तरी कसा? तुला विचार येतात, कोणाचे उपभोगू, कोणाचे हिसकावून घेऊ, बिनहक्काचे भोगण्याचे विचार येतात, ते विचारच घेऊन जातात त्या त्या गतीमध्ये..
प्रश्नकर्ता : जीवाचा असा काही क्रम आहे का की मनुष्यात आल्यानंतर परत मनुष्यातच येईल की दुसरीकडे जाईल?
दादाश्री : हिंदुस्तानात मनुष्यजन्मात आल्यानंतर चारही गतीमध्ये भटकावे लागते. फॉरेनच्या माणसाचे असे नाही. त्यांच्यात दोन-पाच टक्के अपवाद असतात, दुसरे सगळे वर चढतच राहतात.
प्रश्नकर्ता : लोक ज्याला विधाता म्हणतात ते कोणाला म्हणतात?
दादाश्री : ते निसर्गाला विधाता म्हणतात. विधाता नावाची कोणी देवी नाही. सायन्टिफिक सरकमस्टॅन्शिअल एविडन्स (वैज्ञानिक संयोगिक पुरावे) तेच विधाता आहे. आपल्या लोकांनी ठरवले आहे की, सहाव्या दिवशी विधाता लेख लिहून जातो. विकल्पांनी हे सगळे ठीक आहे आणि जर वास्तविक जाणून घ्यायचे असेल तर हे खरे नाही.
येथे तर कायदा असा आहे की ज्याने बिनहक्काचे घेतले असेल त्याचे दोन पायातून चार पाय होऊन जातील. परंतु ते नेहमीसाठी नाही. जास्तीत जास्त दोनशे वर्ष आणि खूप झाले तर सात-आठ जन्म जनावर गतीत जातील. आणि कमीत कमी पाचच मिनिटात जनावरात जाऊन परत मनुष्यात येतो. कित्येक जीव असे आहेत की एका मिनिटात सतरा जन्म बदलतात. अर्थात असेही जीव आहेत. म्हणून जनावरात गेलेत, त्या सगळ्यांनाच शे-दोनशे वर्षाचे आयुष्य मिळेल असे नाही.
हे समजते लक्षणांवरून प्रश्नकर्ता : हे जनावर योनीत जाणार आहे, याचा काही पुरावा तर सांगा. त्याला वैज्ञानिक आधारावर कशाप्रकारे मानायचे?