________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
तेव्हा त्याला आठवते. कारण की मातेच्या गर्भात तर अपार दुःख होते. पण या दुःखासोबत दुसरेही दुःख असते, मृत्यू झाला आहे त्याचेही दुःख, हे दोन्ही असतात. त्यामुळे तो बेभान होऊन जातो दु:खामुळे. म्हणून त्याला आठवत नाही.
6
अंतिम समयी गाठोडी गोळा कर ना....
एक ऐंशी वर्षांचे काका होते, त्यांना दवाखान्यात दाखल केले होते. मला जाणवले की हे दोन-चार दिवसात जाणार आहेत येथून. तरी सुद्धा मला म्हणतात, ‘ते चंदुलाल तर मला येथे भेटायलाही येत नाही.' आम्ही सांगितले की, 'चंदुलाल तर आले होते.' तेव्हा म्हणतात, मग 'त्या नगीनदासचे काय ?' अंथरुणावर पडल्या पडल्या नोंद करत राहतो की कोण-कोण भेटायला आले होते. अरे, स्वतःच्या तब्येतीची काळजी घे ना! दोन-चार दिवसात तर जाणार आहेस. आधी तू आपली गाठोडी सांभाळ. इथून सोबत घेऊन जायची तुझी गाठोडी तर गोळा कर. नगीनदास नाही आले त्याचे तुला काय करायचे आहे ?
ताप आला आणि टप्प
म्हातारे काका आजारी असतील आणि तुम्ही डॉक्टरांना बोलावले, सगळे इलाज केले पण तरीसुद्धा मृत्यू पावले. नंतर शोक प्रदर्शित करणारे असतात ना, ते आश्वासन द्यायला येतात. मग ते विचारतात, 'काय झाले होते काकांना ?' तेव्हा तुम्ही सांगता की, 'खरे तर मलेरियासारखे वाटत होते, पण नंतर डॉक्टरांनी सांगितले की हे तर जरा फ्लूसारखे आहे. ' तेव्हा ते विचारतील की, 'कोणत्या डॉक्टरला बोलावले होते ? ' तुम्ही सांगाल, की अमक्याला, त्यावर ते म्हणतील, 'तुम्हाला अक्कल नाही. ह्या नाही, त्या डॉक्टरला बोलावण्याची गरज होती. ' नंतर परत दुसरा कोणी येऊन तुम्हाला रागवेल, ' असे करायला हवे होते ना ! अशी मुर्खासारखी गोष्ट करायची असते का?' याचा अर्थ पूर्ण दिवस लोकं येऊन तुम्हाला दटावतच राहतील. लोक उलट आपल्यावरच चढून बसतात. आपल्या