________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
कॉजेस उत्पन्न होत राहतात आणि जेव्हा ती 'रोंग बिलीफ' बदलते आणि 'राईट बिलीफ' बसते तेव्हा मग राग-द्वेष आणि कॉजेस उत्पन्न होत नाहीत.
पुर्नजन्म प्रश्नकर्ता : जीवात्मा मेल्यानंतर परत येतो ना?
दादाश्री : त्याचे असे आहे की, फॉरेनवाल्यांचा परत येत नाही, मुस्लिमांचा परत येत नाही. परंतु तुमचा परत येतो. तुमच्या भगवंताची इतकी कृपा आहे की तुमचा परत येतो. इथून मेला की तिथे दुसऱ्या योनीत प्रवेश करतो. आणि त्यांचा तर परत येत नाही.
आता खरोखर परत येत नाही असे नाही. त्यांची मान्यता अशी आहे की येथून मेला म्हणजे मेला, परंतु वास्तवात परत येतोच. पण हे त्यांना समजत नाही. पुर्नजन्मच समजत नाहीत. तुम्हाला पुर्नजन्म समजतो ना?
शरीराचा मृत्यू झाला की ते जड होऊन जाते. त्यावरून सिद्ध होते की त्याच्यात जीव होता तो निघून दुसऱ्या ठिकाणी गेला. फॉरेनवाले तर म्हणतात की हा तोच जीव होता आणि तोच जीव मेला. आपण सर्व हे कबूल करत नाही. आपण पुर्नजन्मात मानतो. आपण 'डेव्हलप' (विकसित) झालेलो आहोत. आपण वीतराग विज्ञानाला जाणतो. वीतराग विज्ञान सांगते की, पुर्नजन्माच्या आधारावर सर्व एकत्र आलो आहोत, असे हिंदुस्तानात समजतात. त्या आधारावर आपण आत्म्याला मानायला लागलो. जर पुर्नजन्माचा आधार नसता तर आत्म्याला कसे काय मानले असते?
पुर्नजन्म कोणाचा होतो? तेव्हा सांगतात, आत्मा आहे तर पुर्नजन्म होतो, कारण की देह तर मेला, त्याला जाळले गेले, असे आपण बघत
असतो.
अर्थात आत्मा समजला तर निराकरण होईल ना! परंतु ते समजेल असे नाही ना! म्हणून तमाम शास्त्रकारांनी सांगितले की, 'आत्मा जाणा.'