________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
प्रेतयात्रा म्हणजे निसर्गाची जप्ती! कशी जप्ती? तेव्हा म्हणे, नावावर जो बँक बॅलन्स होता तो जप्त झाला, मुलं जप्त झाली, बंगला जप्त झाला, हे कपडे जे नावावर होते तेही जप्त झाले. सर्वकाही जप्तीत गेले. तेव्हा म्हणतो, 'साहेब, आता मला तिथे काय सोबत घेऊन जायचे?' तर म्हणे. 'लोकांबरोबर जेवढे गुंते निर्माण केले होते, तेवढेच सोबत घेऊन जा.' अर्थात् या नावावर जे आहे ते सगळे जप्तीमध्ये जाणार आहे, म्हणून आपल्याला स्वतःसाठी काही करायला पाहिजे ना? नको का करायला?
पाठवा, पुढच्या जन्माची गाठोडी जे आमचे नातेवाईक नाहीत, अशा परक्या लोकांना काही सुख दिले असेल, त्यांच्या कामासाठी फेऱ्या मारल्या असतील, त्यांना दुसरी काहीही मदत केली असेल, तर ती 'तिथे' पोहोचते. नातेवाईकांसाठी नाही, परंतु परक्यांसाठी. मग येथे लोकांना औषधासाठी पैसे दिले असतील, औषधदान मग दुसरे आहारदान दिले असेल, नंतर ज्ञानदान दिले असेल आणि अभयदान, हे सगळे दिले असेल तर ते सर्व तिथे सोबत येईल. यातील काही देता की मग असेच आहे सर्व? खाऊन टाकता?
जर सोबत घेऊन जाता आले असते तर हा तर असा आहे की तीन लाखांचे कर्ज करुन जाणार. धन्य आहे ना? हे जग असेच आहे, म्हणून सोबत घेऊन जाता येत नाही हेच चांगले आहे.
मायेची करामत जन्म माया निर्माण करते, लग्न माया निर्माण करते आणि मृत्यू हे सुद्धा मायाच निर्माण करते. पसंत असो वा नसो, पण सुटकाच नाही. परंतु अट एवढीच असते की मायेचे साम्राज्य नाही. मालक तुम्ही आहात. अर्थात तुमच्या इच्छेनुसार होत आहे. मागील जन्मी आपली जी इच्छा होती, त्याचा हिशोब निघाला आणि त्यानुसार माया चालवत आहे. तेव्हा मग आता आरडाओरड करुन चालणार नाही. तुम्हीच मायेला सांगितले होते की हा माझा ताळेबंधी हिशोब (लेखा-जोखा) आहे.