________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
आयुष्य एक तुरुंग प्रश्नकर्ता : आपल्या हिशोबाने आयुष्य काय आहे?
दादाश्री : माझ्या हिशोबाने आयुष्य, हा एक तुरुंग आहे तुरुंग! ती चार प्रकारची तुरंगे आहेत.
एक नजरकैद आहे. देवलोक नजरकैदेत आहेत. हे मनुष्य साध्या कैदेत आहेत. जनावरे कडक मजूरीवाल्या कैदेत आहेत आणि नरकातील जीव जन्मठेपेच्या कैदेत आहेत.
जन्मापासून चालूच आहे करवत हे शरीर शुद्धा प्रत्येक क्षणी मरत आहे, पण लोकांना काय त्याची जाणीव आहे ? आपले लोक तर, लाकडाचे दोन तुकडे झाले आणि खाली पडले, तेव्हा म्हणतील, 'कापले गेले' अरे, हे तर कापलेच जात होते. करवत चालूच होती.
मृत्यूचे भय हे निरंतर भय वाटेल असे जग आहे. एका क्षणासाठी देखील निर्भयता या जगात नाही, आणि जितकी निर्भयता वाटते, तितका त्याच्या मूर्चीत अवस्थेत आहे तो जीव. उघड्या डोळ्यांनी झोपलेले आहेत, म्हणून हे सगळे चालले आहे.
प्रश्नकर्ता : असे म्हटले जाते की आत्मा मरत नाही, तो तर जिवंतच असतो.
दादाश्री : आत्मा मरतच नाही, परंतु जोपर्यंत तुम्ही आत्मस्वरूप झाले नाहीत, तोपर्यंत तुम्हाला भीती वाटत राहते ना? मरणाची भीती वाटते ना? आता जर शरीरात काही आजारपण आले तर 'जावे लागेल, मरावे लागेल' अशी भीती वाटते. देहदृष्टी नसेल, तर स्वतः मरत नाही. परंतु हे तर 'मीच आहे, हाच मी आहे,' असे तुम्हाला शंभर टक्के पक्के वाटते. तुम्हाला हा चंदूलाल तो मीच आहे, अशी शंभर टक्के खात्री आहे ना?