________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
यमराज की नियमराज? या हिंदुस्तानातील सर्व गैरसमजा मला काढून टाकायच्या आहेत. संपूर्ण देश बिचारा या संभ्रमातच बेहाल झाला आहे. म्हणूनच यमराज नावाचा कोणीच जंतू नाही, असे मी पूर्ण गॅरंटीने सांगत आहे. तेव्हा कोणी विचारेल, 'पण काय असेल? काहीतरी असेलच ना?' तेव्हा मी सांगितले, 'नियमराज आहे !' हे मी पाहून सांगतो. मी काही वाचलेले बोलत नाही. हे मी माझ्या दर्शनाने पाहून, या डोळ्यांनी नाही, माझे जे दर्शन आहे, त्याने पाहून मी हे सर्व सांगत आहे.
मृत्यूनंतर काय? प्रश्नकर्ता : मृत्यूनंतर कोणती गती होणार?
दादाश्री : संपूर्ण आयुष्यात जी कार्ये केली असतील. आयुष्यभर जे धंदे चालवले असतील, केले असतील, त्याचा ताळेबंदी हिशोब मरणाच्या वेळी निघतो. मरण्याच्या एक तास आधी ताळेबंदी हिशोब समोर येतो. येथे जे जे बिनहक्काचे हिसकावले असेल, पैसे हिसकावले असतील, बायका पळविल्या असतील, सर्वकाही बिनहक्काचे हिसकावतात बुद्धीने, वाटेल त्याप्रकारे बळकावतात. त्या सगळ्यांना जनावर गती प्राप्त होते आणि जर आयुष्यभर सज्जनता ठेवली असेल तर मनुष्यगती प्राप्त होते. मरणोपरांत चार प्रकारच्या गती असतात. जो साऱ्या गावाचे पीक जाळून टाकतो, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, असे असतात ना इथे? त्यांना शेवटी नरकगती मिळते. अपकारा समोर देखील उपकार करतात, असे लोक सुपर ह्युमन असतात. ते मग देवगतीत जातात.
योग उपयोग परोपकाराय मन-वचन-काया आणि आत्म्याचा उपयोग लोकांसाठी कर. तुझ्या स्वतःसाठी करशील तर रायणी(झाडाचे नाव) चा जन्म मिळेल. मग पाचशे वर्ष भोगतच रहा. मग तुझी फळे लोकं खातील. लाकडे जाळतील.