________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
मुक्ती, जन्म-मरणापासून प्रश्नकर्ता : जन्म-मरणाच्या झंझटीतून कसे सुटायचे? दादाश्री : खूप छान विचारले. काय नाव आहे तुमचे? प्रश्नकर्ता : चंदूभाऊ. दादाश्री : खरोखर चंदूभाऊ आहात? प्रश्नकर्ता : हो. दादाश्री : चंदूभाऊ तर तुमचे नाव आहे, नाही का? प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : तेव्हा तुम्ही कोण? तुमचे नाव चंदूभाऊ आहे, हे तर आम्हा सगळ्यांना कबूल आहे, परंतु तुम्ही कोण?
प्रश्नकर्ता : म्हणनूच मी आलो आहे.
दादाश्री : ते जाणून घ्याल, तेव्हा जन्म-मरणाच्या झंझटीतून सुटका होईल.
आता तर मूळ त्या चंदूभाऊच्या नावावरच हे सर्व चालले आहे ना? सर्वच चंदूभाऊच्या नावावर?! अरे, हा तर धोका होईल? थोडे तरी तुमच्यावर ठेवायला पाहिजे होते ना?