________________
मृत्यूवेळी, मृत्यू आधी आणि मृत्यूनंतर
आत्म्याची स्थिती
जन्म-मरण काय आहे? प्रश्नकर्ता : जन्म-मरण काय आहे ?
दादाश्री : जन्म-मरण तर होतात, आपण बघतो की त्यात काय आहे, त्यात विचारण्यासारखे काही नाही. जन्म-मरण अर्थात त्याच्या कर्माचा हिशोब पूर्ण झाला. एका जन्माचा जो हिशोब बांधला होता, तो पूर्ण झाला, म्हणून मरण येते.
मृत्यू म्हणजे काय? प्रश्नकर्ता : मृत्यू म्हणजे काय?
दादाश्री : मृत्यू तर, असे आहे ना, हा शर्ट शिवला अर्थात शर्टाचा जन्म झाला ना, आणि जन्म झाला म्हणून मृत्यू झाल्याशिवाय राहत नाही! कोणत्याही वस्तूचा जन्म होतो, त्याचा मृत्यू अवश्य होतो. आणि आत्मा अजन्म-अमर आहे, त्याचा मृत्यू होतच नाही. म्हणजे जितक्या वस्तू जन्मतात, त्यांचा मृत्यू अवश्य होतो आणि मृत्यू आहे म्हणून जन्म होणार. जन्माबरोबर मरण जोइंट झाले आहे. जन्म आहे तिथे मृत्यू अवश्य होतोच.
प्रश्नकर्ता : मृत्यू कशा करता आहे?
दादाश्री : मृत्यू तर, असे आहे ना, या देहाचा जन्म झाला तो एक संयोग आहे, त्याचा वियोग झाल्याशिवाय राहत नाही ना! संयोग नेहमीच