________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
___27
जीव तर मरण, शिव तर अमर कधी ना कधी तर सोल्यूशन काढावे लागेल ना? जीवन-मृत्यूचे सोल्यूशन नाही का काढावे लागणार? खरोखर स्वतः मरतही नाही आणि जगतही नाही. ही मान्यताच चुकीची आहे की स्वत:ला जीव मानून बसला आहे. स्वत:चे स्वरुप शिव आहे. स्वतः शिव आहे परंतु हे स्वत:ला समजत नाही आणि स्वत:ला जीव स्वरूप मानून बसला आहे!
प्रश्नकर्ता : असे प्रत्येक जीवाला समजायला लागले तर जग चालणार नाही ना?
दादाश्री : हो, नाहीच चालणार ना, परंतु हे प्रत्येक व्यक्तिला समजेलच असे नाही ना! हे तर पझल (कोडे) आहे सगळे, अत्यंत गुह्य, अतिशय गुह्यतम. गुह्यतमच्या कारणामुळे तर हे सर्व असे पोलम्पोल जग चालत राहते.
जगतो-मरतो, तो कोण? हा जन्म-मृत्यू आत्म्याला नाही. आत्मा परमनेन्ट वस्तू आहे. जन्ममृत्यू इगोइजमला (अहंकाराला) आहे. इगोइजम जन्म घेतो आणि इगोइजम मरतो. वास्तवात आत्मा स्वतः मरतच नाही. अहंकारच जन्म घेतो आणि अहंकारच मरतो.