________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
38
दादाश्री : हा देह आहे, तो आत्म्याच्या अज्ञान दशेचा परिणाम आहे. जे जे 'कॉजेस' केले, त्याचा हा 'इफेक्ट' आहे. कोणी तुम्हाला फलं वाहीली तर तुम्ही खुश होऊन जाता आणि कोणी तुम्हाला शिव्या दिल्या तर तुम्ही चिडता. या चिडण्यात आणि खुश होण्यात बाह्य दर्शनाची किंमत नाही, अंतरभावामुळे कर्म चार्ज होतात, त्याचा मग पुढच्या जन्मात 'डिस्चार्ज' होतो. त्यावेळी ते 'इफेक्टिव' आहे. हे मन-वचन-काया तिन्ही 'इफेक्टिव' आहेत. 'इफेक्ट' भोगतेवेळी दुसरे नवीन कॉजेस' उत्पन्न होतात, जे पुढील जन्मात परत 'इफेक्टिव' होतात. या प्रकारे 'कॉजेस अॅन्ड इफेक्ट, इफेक्ट अॅन्ड कॉजेस' हा क्रम निरंतर चालूच राहतो.
केवळ मनुष्यजन्मातच कॉजेस बंद होऊ शकतील असे आहे. अन्य सगळ्या गतींमध्ये केवळ 'इफेक्ट' च आहेत. इथे 'कॉजेस अॅन्ड इफेक्ट' दोन्ही आहेत. आम्ही ज्ञान देतो तेव्हा 'कॉजेस' बंद करतो. मग नवीन 'इफेक्ट' होत नाही.
तोपर्यंत भटकायचे आहे.... 'इफेक्टिव बॉडी' अर्थात मन-वचन-कायेच्या तीन बॅटऱ्या तयार होऊन जातात आणि त्यातून परत नवीन 'कॉजेस' उत्पन्न होत राहतात. अर्थात या जन्मामध्ये मन-वचन-काया डिस्चार्ज होत राहतात. आणि दुसऱ्या बाजूने आतमध्ये नवीन चार्ज होत राहतो. मन-वचन-कायेच्या ज्या बॅटऱ्या चार्ज होत राहतात, त्या पुढच्या जन्मासाठी आहेत आणि ह्या मागील जन्माच्या ज्या आहेत, त्या आज डिस्चार्ज होत आहेत. 'ज्ञानी पुरुष' नवीन 'चार्ज' बंद करून देतात म्हणून जुने 'डिस्चार्ज' होत राहते.
मृत्यूनंतर आत्मा दुसऱ्या योनीत जातो. जोपर्यंत स्वत:चे 'सेल्फ' चे रियलाइज (आत्म्याची ओळख) होत नाही तोपर्यंत सगळ्या योनीमध्ये भटकत राहतो. जोपर्यंत मनात तन्मयाकार होतो, बुद्धीत तन्मयाकार होतो तोपर्यंत संसार उभा राहतो. कारण तन्मयाकार होणे अर्थात योनीमध्ये बीज