________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
जायचे नाही. आणि मग खायला द्यायचे कावळ्याला.' हे असे शोधून काढले. त्याने पित्त सारे शमते. म्हणून या लोकांनी ही व्यवस्था केली होती. म्हणून आमचे लोक त्यावेळी काय सांगत असत की सोळा दिवसांच्या श्राद्धानंतर जर जगला तर नवरात्रीत आला !
21
सही केल्याशिवाय मरण सुद्धा नाही
निसर्गाचा नियम असा आहे की तो कोणत्याही मनुष्याला इथून घेऊन जाऊ शकत नाही. मरण्याऱ्याने सही केल्याशिवाय त्याला इथून घेऊन जाता येत नाही. लोक सही करीत असतील काय ? असे म्हणतात ना की, 'हे भगवंता, इथून जायला मिळाले तर चांगले.' आता असे का बरे बोलतात ? ते आपण जाणता का ? कधी असे आतून दुःख होते, तेव्हा मग दुःखामुळे त्रासलेला माणूस असे बोलतो की, 'हा देह सुटला तर बरे.' त्यावेळी सही घेतली जाते.
त्याआधी करा 'माझी' आठवण
प्रश्नकर्ता: दादाजी, असे ऐकले आहे की आत्महत्येनंतर असे सात जन्म होतात, हे खरे आहे ?
दादाश्री : जे संस्कार पडतात, ते सात - आठ जन्मानंतर जातात. म्हणूनच असे काही वाईट संस्कार पडू देऊ नका. वाईट संस्कारांपासून दूर पळा. हो, इथे वाटेल तेवढे दुःख असेल ते सहन करा, पण गोळी मारु नका, आत्महत्या करु नका. म्हणून बडोदा शहरात आजपासून काही वर्षांपूर्वी सगळ्यांना मी सांगितले होते की, आत्महत्येचा विचार आला तर माझी आठवण काढा आणि माझ्याकडे या. अशी माणसं असतात ना, जोखीमवाली माणसं, त्यांना मी असे सांगून ठेवतो ते मग माझ्याकडे येतात तेव्हा त्यांना समजावतो. त्यामुळे त्या दिवसापासून त्याचे आत्महत्या करणे बंद होऊन जाते. १९५१ नंतर सगळ्यांना कळवले होते की ज्यांना आत्महत्या करायची असेल तर त्याने आधी मला भेटावे आणि नंतर आत्महत्या करावी. असे कोणी आले की मला आत्महत्या करायची आहे