________________
संपादकीय
मृत्यू मनुष्याला अतिशय भयभीत करतो, कितीतरी शोक उत्पन्न करतो आणि केवळ दुःखातच बुडवून ठेवतो. प्रत्येक मनुष्याला जीवनात कोणाच्यातरी मृत्यूचे साक्षी बनावेच लागते. त्यावेळी मृत्यूसंबंधी शेकडो विचार मनात येतात, की मृत्यूच्या स्वरूपाची वास्तविकता काय असेल ? परंतु त्याचे रहस्य न उलगडल्यामुळे तेथेच तो अडकून पडतो. मृत्यूचे रहस्य जाणण्यासाठी प्रत्येक व्यक्ति उत्सुक असतेच. त्या बाबतीत बरेच काही ऐकण्यात किंवा वाचण्यात येते. लोकांकडूनही काही माहिती मिळते परंतु ते मात्र बुद्धीचे तर्कच असतात.
मृत्यू काय असेल ? मृत्यूच्या आधी काय होत असेल ? मृत्यूच्या वेळी काय होत असेल ? मृत्यूनंतर काय होत असेल ? मृत्यूचा अनुभव सांगणारा कोण ? ज्याचा मृत्यू होतो तो आपला अनुभव सांगू शकत नाही. ज्याचा जन्म होतो, तो आपली पूर्वीची अवस्था, स्थिती जाणत नाही. अशाप्रकारे जन्माआधीची आणि मृत्यूनंतरची अवस्था कोणी जाणत नाही. म्हणून मृत्यू आधी, मृत्यूवेळी आणि मृत्यूनंतर कोणत्या दशेतून जावे लागेल, याचे रहस्य, हे रहस्यच राहते. दादाश्रींनी आपल्या ज्ञानात पाहून हे सगळे रहस्य, जसेच्या तसे, यथार्थ रूपाने उघडले आहे, जे येथे संकलित केलेले आहेत.
मृत्यूचे रहस्य समजले की मृत्यूचे भय निघून जाते.
आपल्या प्रिय व्यक्तिच्या मृत्यूसमयी आपण काय करायला पाहिजे ? आपले खरे कर्तव्य काय आहे ? त्याची गती कशाप्रकारे सुधारायला हवी ? प्रिय व्यक्तिच्या मृत्यूनंतर आपण काय करायला हवे ? आपण कशाप्रकारे समता ठेवली पाहिजे ?
आणि ज्या लोकमान्यता आहेत, जसे की श्राद्ध, तेरावं, ब्राह्मण भोजन, दान, गरुड पुराण इत्यादीची सत्यता किती ? मरणाऱ्या व्यक्तिपर्यंत