________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
अंतिम क्षणी धर्मध्यान प्रश्नकर्ता : अंतिम तासांमध्ये ठराविक लामांकडून काही क्रिया करुन घेतात. मनुष्य जेव्हा मृत्यू शय्येवर असतो, तेव्हा तिबेटीयन लोकांमध्ये असे म्हटले जाते की ते लोक त्याच्या आत्म्याला म्हणतात की, तू अशाप्रकारे जा अथवा आपल्यात जो गीतापाठ केला जातो किंवा जे चांगले शब्द ऐकवतात त्यामुळे त्यांच्यावर अंतिम तासांमध्ये काही परिणाम होतो का?
___दादाश्री : काही सुद्धा होत नाही. बारा महिन्यांचे वहीखाते तुम्ही लिहिता, तेव्हा धनत्रयोदशीपासून तुम्ही फक्त नफा जमा करत राहाल आणि तोटा मांडणार नाही तर चालेल काय?
प्रश्नकर्ता : नाही चालणार. दादाश्री : असे का? प्रश्नकर्ता : ते तर पूर्ण वर्षाचेच येते ना.
दादाश्री : त्याचप्रमाणे हा देखील संपूर्ण आयुष्याचा ताळेबंदी हिशोब समोर येतो. हे तर लोक फसवतात. लोकांना मूर्ख बनवतात.
प्रश्नकर्ता : दादाश्री, मनुष्याची अंतिम अवस्था असेल, जागृत अवस्था असेल, अशावेळेस त्याला कोणी गीतेचा पाठ ऐकवेल किंवा दुसऱ्या शास्त्रातील काही ऐकवेल, त्याच्या कानात काही सांगेल....
दादाश्री : तो स्वतः सांगत असेल तर, त्याच्या इच्छेनुसार असेल तर म्हणायला पाहिजे.
मर्सी किलिंग प्रश्नकर्ता : ज्याला अतिशय वेदना होत असेल त्याला वेदना सहन करु द्यायचे, आणि समजा जर त्याला मारून टाकले तर त्याला पुढच्या जन्मात वेदना सहन करण्याचे बाकी राहील, ही गोष्ट योग्य वाटत नाही.