________________
46
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
मृतकांचे प्रतिक्रमण प्रश्नकर्ता : ज्याची क्षमा मागायची आहे त्या व्यक्तिचा देहविलय झाला असेल, तर प्रतिक्रमण कसे करायचे?
दादाश्री : देहविलय झाला असेल, तरी पण जर त्याचा फोटो असेल, त्याचा चेहरा आठवत असेल, तर प्रतिक्रमण करू शकता. चेहरा जरी आठवत नसेल आणि नाव माहित असेल, तर नाव घेऊनही करू शकता, तरीही त्याला पोहोचेल सर्व.
प्रश्नकर्ता : म्हणजे मृतक व्यक्तिचे प्रतिक्रमण कशाप्रकारे करायचे?
दादाश्री : मन-वचन-काया, भावकर्म, द्रव्यकर्म, नोकर्म मृतकाचे नाव तसेच त्याच्या नावाची सर्व मायेपासून भिन्न अशा त्याच्या शुद्धात्म्याला आठवायचे. आणि नंतर 'अशी चूक झाली होती' ते आठवून (आलोचना) त्या चुकांसाठी मला पश्चाताप होत आहे आणि त्यासाठी मला क्षमा करा (प्रतिक्रमण). अशा चुका पुन्हा होणार नाहीत असा दृढ निश्चय करतो, असे नक्की करा. (प्रत्याख्यान). 'तुम्ही' स्वतः चंदूभाऊचे ज्ञाता-दृष्टा रहायचे आणि जाणायचे की चंदूभाऊने किती प्रतिक्रमण केले, किती सुंदर केले आणि किती वेळा केले.