________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
सहज विचार बंद होतात, तेव्हा हे सगळे उलटे विचार येतात. विकल्प बंद झाले म्हणून जे सहज विचार येत होते, ते ही बंद होतात. अगदी अंधारच होतो. मग काहीच दिसत नाही. संकल्प अर्थात 'माझे' आणि विकल्प अर्थात 'मी.' हे दोन्ही बंद होतात, तेव्हाच मरण्याचे विचार येतात.
आत्महत्येचे कारण प्रश्नकर्ता : हा जो त्याला विचार आला, आत्महत्या करण्याचा त्याचे रुट(मूळ) काय आहे?
दादाश्री : आत्महत्येचे रुट असे असते की त्याने कोणत्याही जन्मात आत्महत्या केली असेल तर त्याचा प्रतिध्वनी सात जन्मांपर्यंत राहतो. जसे की आपण एखादा चेंडू तीन फुटावरून टाकला, तर तो आपल्या आपणच दुसऱ्यांदा अडीच फुट, नंतर एक फुट उडून खाली पडेल, असे होते की नाही? तीन फुट पूर्ण नाही उडत. पण स्वतःच्या स्वभावानुसार अडीच फुट उडून परत खाली पडतो, तिसऱ्यांदा दोन फुट उडून खाली पडतो, चौथ्यांदा दीड फुट उडून परत खाली पडतो, परत एक फुट उडून खाली पडतो. असा त्याच्या गतीचा नियम असतो. असेच निसर्गाचेही नियम आहेत. जर त्याने आत्महत्या केली ना, तर सातजन्मांपर्यंत आत्महत्या करावीच लागते. आता त्यात कमी जास्त परिणामाने आत्महत्या आपल्याला पूर्णच दिसते, परंतु परिणाम कमी तीव्रतेचे असतात आणि कमी होत-होत, परिणाम संपून जातात.
अंतिम क्षणी मरतेवेळी पूर्ण आयुष्यात जे केले होते, त्याचे सार येते. ते सार पाऊण तासापर्यंत वाचत राहिल्यानंतर देह बांधला जातो. शेवटी दोन पायातून चार पायांमध्ये जातो. येथे पोळी खाता खाता, तिथे गवत खातो. या कलियुगाचे माहात्म्य असेच आहे. हे मनुष्यत्व परत मिळणे अवघड आहे, असा हा कलियुगाचा काळ.....