________________
34
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
गर्भात जीवाचा प्रवेश केव्हा? प्रश्नकर्ता : संचार होतो तेव्हा जीव प्रवेश करतो, प्राण येतो, असे वेदांमध्ये सांगितले आहे.
दादाश्री : नाही. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी अनुभवाच्या नाहीत. खऱ्या गोष्टी नाहीत. ती लौकिक भाषा झाली. जीवाशिवाय कधीही गर्भ धारण होत नाही, जीवाच्या उपस्थितीतच गर्भधारणा होते, नाहीतर धारण होत नाही.
त्या आधी तर तो अंड्यासारखा बेभान अवस्थेमध्ये राहत असतो. प्रश्नकर्ता : कोंबडीच्या अंड्यात छेद बनवून जीव आत शिरला का?
दादाश्री : नाही. ते तर लौकिकतेत असे आहे. लौकिकात तुम्ही म्हणता, असेच लिहिले आहे. कारण की गर्भधारण होणे तो काळ, सर्व सायन्टिफिक सरकमस्टेन्शिअल एविडेन्स, काळही मिळेल, तेव्हा धारणा होते.
नऊ महिने गर्भात जीव राहतो तेव्हा प्रकट होतो आणि सात महिन्यांचा जीव असेल, तेव्हा कमी महिन्यात जन्म झाला म्हणून कच्चा असतो. त्याचे डोके-बीके, (मेंदु) सगळे कच्चे असते. सगळे अंग कच्चे असतात. सातव्या महिन्यात जन्म झाला म्हणून आणि अठरा महिन्याने जन्म झाला तर ती गोष्टच वेगळी, खूप उच्च कोटी बुद्धिमता असते. अर्थात नऊ महिन्यापेक्षा जितके जास्त महिने होतात तितकी त्याची 'टॉप' हुशारी असते. माहिती आहे असे?
का बोलत नाही? आपण हे ऐकले नाही का, की हा अठरा महिन्यांचा आहे असे! ऐकले आहे? आधी ऐकण्यात आले नसेल, नाही का? की जाऊ द्या, त्याची आई तर, हा अठरा महिन्यांचा आहे, असे सांगते. तो तर खूप हुशार असतो. त्याच्या आईच्या पोटातून बाहेर निघतच नाही. अठरा महिन्यापर्यंत ऐटीत राहतो तिथे!