Book Title: Death Before During and After Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 46
________________ मृत्यूवेळी, आधी आणि नंतर मध्ये वेळ किती ? प्रश्नकर्ता : हा देह सोडणे आणि दुसरा देह धारण करणे, या दोन्हींमध्ये असा किती वेळ लागतो ? 35 दादाश्री : काहीच वेळ लागत नाही. इथून या देहातून अजून निघत आहे आणि तिथे योनीमध्ये हजर होतो, कारण हे टाईमिंग आहे. वीर्य आणि रज यांचा संयोग होतो त्या वेळेला. इथून देहापासून सुटणार आहे आणि तिथे तो संयोग जुळून येतो, हे सर्व एकत्र होते तेव्हा इथून जातो. नाहीतर तो इथून जातच नाही. अर्थात मनुष्याच्या मृत्यूनंतर तो आत्मा इथून सरळ दुसऱ्या योनीमध्ये जातो. म्हणून पुढे काय होईल याची काहीही चिंता करण्यासारखे नाही. कारण की मेल्यानंतर दुसरी योनी प्राप्त होऊनच जाते. आणि त्या योनीमध्ये प्रवेश करताच लगेचच तिथे जेवण वगैरे सर्व मिळते. त्यापासून सर्जन होते कारण देहाचे जग भ्रांतीचे आहे, ते क्रियानां बघते. ध्यानाला बघत नाही. ध्यान पुढच्या जन्माचा पुरुषार्थ आहे आणि क्रिया मागील जन्माचा पुरुषार्थ आहे. ध्यान हे पुढच्या जन्मात फळ देणार आहे. ध्यान झाले की त्यावेळी परमाणु बाहेरून ओढले जातात आणि ते ध्यान स्वरूप होऊन आत सूक्ष्मपणे संग्रहित होतात आणि कारण - देहाचे सर्जन होते. जेव्हा ऋणानुबंधाने मातेच्या गर्भात जातो, तेव्हा कार्य - देहाची रचना होते. मनुष्य मरतो तेव्हा आत्मा, सूक्ष्म शरीर तसेच कारण - शरीर सोबत जातात. सूक्ष्म शरीर प्रत्येकाचे कॉमन असते परंतु कारण - शरीर प्रत्येकाचे त्याच्याद्वारे केलेल्या कॉजेस अनुसार . वेगवेगळे असते. सूक्ष्म - शरीर हे इलेक्ट्रिकल बॉडी (तेजसशरीर) आहे. कारण- कार्याची श्रृंखला मृत्यूनंतर जन्म आणि जन्मानंतर मृत्यू आहे, बस. हे निरंतर चालूच

Loading...

Page Navigation
1 ... 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62