________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
परत पूर्ण चौऱ्यांशी लक्ष भटकावे लागत नाही. त्याला जर पाशवतेचे विचार आले तर जास्तीत जास्त आठ जन्म त्याला पशूयोनीत जावे लागेल. ते ही केवळ शे-दोनशे वर्षासाठी. त्यानंतर परत इथल्या इथेच मनुष्यात येतो. एकदा मनुष्य झाल्यानंतर चौऱ्यांशी लाख फेऱ्यात भटकावे लागत नाही.
प्रश्नकर्ता : एकच आत्मा चौऱ्यांशी लाख फेऱ्यात फिरतो ना?
दादाश्री : हो. एकच आत्मा.
प्रश्नकर्ता : पण आत्मा तर पवित्र आहे ना?
दादाश्री : आत्मा पवित्र तर आता, यावेळीही आहे. चौऱ्यांशी लाख योनीमध्ये फिरूनही पवित्रच राहिला आहे. पवित्र होता आणि पवित्रच राहील!!
वासनेच्या अनुसार गती प्रश्नकर्ता : मरणाआधी जशी वासना असेल, त्याच रुपात जन्म होतो ना?
दादाश्री : हो, ती वासना, आपली लोकं म्हणतात ना की मरणाआधी अशी वासना होती. पण ती वासना काही अशीच आणू शकत नाही, तो तर हिशोब आहे, संपूर्ण जीवनाचा. आयुष्यभरात तुम्ही जे काही केले असेल, त्याचा मृत्यूवेळी शेवटचा जो तास असतो तेव्हा हिशोब समोर येतो आणि त्या हिशोबानुसार त्याची गती होते.
मनुष्यातून मनुष्यच बनतो का? प्रश्नकर्ता : मनुष्यातून मनुष्यातच जाणार आहेत ना?
दादाश्री : ही स्वत:ची चुकीची समज आहे. बाकी स्त्रीच्या पोटातून मनुष्यच जन्म घेतो. तेथे कोणी गाढव जन्माला येत नाही. मात्र तो असे समजतो की मी मेलो तरीपण परत मनुष्य म्हणूनच माझा जन्म होईल तर