Book Title: Death Before During and After Marathi
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 43
________________ 32 मृत्यूवेळी, आधी आणि नंतर दादाश्री : खूपच संबंध, पूर्वजन्मात बीज पडते आणि दुसऱ्या जन्मात फळ येते. तर त्या बीजात आणि फळात फरक नाही का? संबंध आला की नाही? आपण बाजरीचे दाणे पेरु, तो पूर्वजन्म आणि कणीस आले, तो हा जन्म, परत या कणसातून बीजरुपात दाणा पडेल तो पूर्वजन्म आणि त्याच्यातून कणीस आले, तो नवीन जन्म, समजले की नाही? प्रश्नकर्ता : एक माणूस रस्त्यावरुन चालत जात आहे आणि दुसरी सुद्धा कितीतरी माणसं रस्त्यावरुन चालत आहेत, पण एखादा साप ठराविक माणसालाच चावतो, त्याचे कारण पुर्नजन्मच? दादाश्री : हो. आम्ही हेच सांगू इच्छितो की पुर्नजन्म आहे. म्हणून तो साप तुम्हाला चावतो. पुर्नजन्म नसता तर तुम्हाला साप चावला नसता. पुर्नजन्म आहे, तो तुम्हाला तुमच्या हिशोबाची परतफेड करतो. हे सगळे हिशोब फेडले जात आहेत. जसे वहीखात्यातले हिशोब फेडले जातात तसेच सर्व हिशोब फेडले जातात. आणि 'डेव्हलपमेन्ट' मुळे हे सर्व हिशोब आपल्याला समजतात सुद्धा. म्हणूनच आपल्या इथे कित्येक लोकांना पुर्नजन्म आहेच अशी मान्यताही बसलेली आहे ना! परंतु ते पुर्नजन्म आहेच असे सांगू शकत नाही. 'आहेच' असे पुरावे देऊ शकत नाही. परंतु अशा सगळ्या उदाहरणांमुळे त्यांच्या श्रद्धेत पक्के बसलेले आहे की पुर्नजन्म आहे हे नक्की. या ताई म्हणतील, तिला सासू चांगली का मिळाली आणि मला का अशी मिळाली? म्हणजे संयोग सगळे वेगवेगळे मिळतील. सोबत आणखी काय जाते? प्रश्नकर्ता : एक जीव दुसऱ्या देहात जातो. तिथे सोबत पंचेन्द्रिये आणि मन हे सर्व प्रत्येक जीव घेऊन जातो? दादाश्री : नाही, नाही. काहीही नाही. सगळी इन्द्रिये तर एक्झोस्ट(रिकामी) होऊन संपून जातात. इन्द्रिय तर मरुन गेली. म्हणून

Loading...

Page Navigation
1 ... 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62