________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
वियोगी स्वभावाचेच असतात. आपण शाळेत शिकायला गेलो तेव्हा सुरुवात केली होती की नाही, बिगिनिंग? मग एन्ड (अंत) आला की नाही? प्रत्येक गोष्ट बिगिनिंग आणि एन्डवालीच असते. इथे या सगळ्या गोष्टींचा बिगिनिंग आणि एन्ड होतोच. नाही समजले का तुला?
प्रश्नकर्ता : हो, समजले ना!
दादाश्री : या सगळ्या गोष्टी बिगिनिंग-एन्डवाल्या आहेत, परंतु बिगिनिंग-एन्ड यास जाणणारा कोण आहे ?
सगळ्या वस्तू बिगिनिंग-एन्डवाल्या आहेत त्या टेम्पररी (अस्थायीतात्पुरत्या) वस्तू आहेत. ज्याचे बिगिनिंग होते, त्याचा एन्ड होतो, सुरुवात आहे त्याचा अंत अवश्य आहेच. या सगळ्या वस्तू टेम्पररी आहेत, परंतु टेम्पररीला जाणणारा कोण आहे ? तू परमनन्ट आहे, कारण की तू या वस्तूंना टेम्पररी म्हणतोस, म्हणून तू परमनन्ट आहे, जर सगळ्या गोष्टी टेम्पररी असतील तर मग टेम्पररी म्हणण्याची गरजच नव्हती. टेम्पररी सापेक्ष शब्द आहे. परमनन्ट आहे तर टेम्पररी आहे.
मृत्यूचे कारण प्रश्नकर्ता : तर मृत्यू का येतो?
दादाश्री : ते तर असे आहे, जेव्हा जन्म होतो, तेव्हा हे मन-वचनकायेच्या तीन 'बॅटऱ्या' आहेत, ज्या गर्भामधून इफेक्ट (परिणाम) देत जातात. तो इफेक्ट पूर्ण होतो, 'बॅटरीचा' हिशोब पूर्ण होईपर्यंत त्या बॅटऱ्या राहतात आणि नंतर संपून जातात, त्याला मृत्यू म्हणतात. पण तेव्हा परत पुढच्या जन्मासाठी आतमध्ये नवीन बॅटऱ्या चार्ज झालेल्या असतात. पुढच्या जन्मासाठी आतमध्ये नवीन बॅटऱ्या चार्ज होत असतात आणि जुन्या 'बॅटऱ्या' 'डिस्चार्ज' होत राहतात. असे 'चार्ज-डिस्चार्ज' होतच राहते. कारण त्याला 'रोंग बिलीफ' (चुकीची मान्यता) आहे. म्हणून 'कॉजेस' उत्पन्न होत राहतात, जोपर्यंत ‘रोंग बिलीफ' आहे, तोपर्यंत राग-द्वेष आणि