________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
हे सर्व वाह-वाह साठी प्रश्नकर्ता : मृत्यूनंतर बारवं-तेरावं करतात, भांडी वाटतात, भोजन ठेवतात, त्याचे महत्व किती आहे?
दादाश्री : ती अनिवार्य वस्तू नाही. ते तर मागे वाह-वाह मिळवण्यासाठी करतात. आणि समजा खर्च केला नाहीतर लोभी बनतो. दोन हजार रुपये दिले असतील तर खात-पित नाही आणि दोन हजारामागे पैसे जोडत राहतो. म्हणून असा खर्च केला की मन शुद्ध होते आणि लोभही वाढत नाही. परंतु ती अनिवार्य वस्तू नाही. जवळ असेल तर करा, नाही तर काही हरकत नाही.
श्राद्धाची खरी समज प्रश्नकर्ता : या श्राद्धामध्ये पितूंचे जे आह्वान केले जाते, ते योग्य आहे? श्राद्ध पक्षाच्यावेळी पितृ येतात? आणि कावळ्याला भोजन(घास) देतात, ते काय आहे?
दादाश्री : असे आहे ना, मुलासोबत संबंध असेल तर तो येईल ना. सर्व संबंध पूर्ण होतो तेव्हा तर देह सुटतो. घरच्यांशी कोणत्याही प्रकारचा संबंध उरला नाही, म्हणून हा देह सुटतो. नंतर कोणी भेटत नाही. नंतर पुन्हा जर नवीन संबंध बांधला गेला असेल तर परत तिथे जन्म होतो. बाकी कोणी येत नाही. पितृ कोणाला म्हणणार? मुलाला म्हणणार की बापाला म्हणणार? मुलगाही पितृ होणार आहे आणि बापही पितृ होणार आहे, आजोबाही पितृ होणार आहेत, मग पितृ कोणाला म्हणणार?
प्रश्नकर्ता : आठवण काढण्यासाठीच या क्रिया केल्या जातात, असेच ना?
दादाश्री : नाही, आठवण काढण्यासाठीही नाही. हे तर आपले लोक मृतकाच्या मागे धर्माच्या नावावर चार आणे सुद्धा खर्च करतील