________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
तोंडाला पाणी लावून, येऊन बसतो आरामात. हा अभिनय आहे. दी वर्ल्ड इज दी ड्रामा इटसेल्फ, (जग स्वयं एक नाटक आहे.) तुम्हाला नाटकच करायचे आहे, केवळ अभिनयच करायचा आहे, परंतु अभिनय 'सिन्सिअरली' करायचा.
जीव भटकतो तेरा दिवस? प्रश्नकर्ता : मृत्यूनंतर तेरा दिवसांचा रेस्ट हाऊस असतो, असे म्हटले जाते.
दादाश्री : तेरा दिवसांचे तर या ब्राम्हणांचे असते, मरणाऱ्याला त्याचे काय? हे ब्राम्हण असे म्हणतात की, रेस्ट हाउस आहे. घरावर बसून बघत राहील, अरे मुर्खा कशासाठी बघत राहिल? कसा हा गोंधळ ! अंगठ्याइतकाच आहे, आणि कौलावर बसून राहतो. असे म्हणतात! आणि आपले लोक हे खरे मानतात. आणि हे जर खरे मानले नसते तर तेरावं केले नसते या लोकांनी. तेरावं करण्याच्या फंद्यातच पडले नसते.
प्रश्नकर्ता : गरुड पुराणात लिहिले आहे की अंगठ्याइतकाच आत्मा
आहे.
दादाश्री : हो, त्याचे नावच गरुड पुराण आहे ना, पुराणे (जुने) म्हटले जाते. म्हणे अंगठ्या इतका आत्मा, म्हणून प्राप्तीच होत नाही ना, दिवसच फिरत नाही, प्रगति होत नाही! करायला गेले साईन्टिफिक, हेतू साईन्टिफिक होता परंतु थिंकिंग (विचारसरणी) सगळे बिगडून गेले. हे लोक त्याच्या नावावर क्रिया करतात आणि क्रिया करण्याआधी ब्राम्हणांना दान देतात. तेव्हा दान देण्यायोग्य ब्राम्हण होते, त्या ब्राम्हणांना दान दिल्यावर पुण्य घडत होते. आता तर सगळे जर्जरित झाले आहे. ब्राम्हण इथून पलंग घेऊन जातो, त्या पलंगाचा सौदा आधीच झालेला असतो. की हा पलंग दोनशे रुपयात तुला देईल, गोदडीचा सौदा केलेला असतो, चादरीचा सौदा केलेला असतो. आपण दुसरे सगळे देतो, कपडे, साधन वगैरे सर्व, ते सुद्धा विकून टाकतात. मग हे तिथे आत्म्यापर्यंत पोहोचेल, असे कसे मानून घेतले लोकांनी?