________________
14
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
प्रश्नकर्ता : नाही. दादाश्री : कोणत्याही मार्गाने येणार नाही? प्रश्नकर्ता : नाही.
दादाश्री : उपाधी कराल तर त्याला पोहोचते आणि त्याच्या नावावर आपण धर्म-भक्ती करु, तरीही आपली भावना त्याच्यापर्यंत पोहोचते. आणि त्याला शांती राहते. त्याला शांती देण्याची गोष्ट आपल्याला कशी वाटते? त्याला शांती मिळावी हे आपले कर्तव्य आहे ना? म्हणून असे काही करा की त्याला चांगले वाटेल. एखाद्या दिवशी शाळेतील मुलांना पेढे खाऊ घाला, असे काहीतरी करा.
म्हणजे जेव्हा तुम्हाला मुलाची आठवण येईल, तेव्हा त्याच्या आत्म्याचे कल्याण होवो, असे बोला. 'कृपाळूदेवाचे' नाव घ्याल, 'दादा भगवान' बोलाल तरीही काम होईल. कारण ‘दादा भगवान' आणि 'कृपाळू देव' आत्मस्वरुपाने एकच आहेत! देहाने वेगळे दिसतात. डोळ्यांनी वेगळे दिसतात परंतु वस्तुतः एकच आहेत, मग महावीर भगवानांचे नाव घेतले तरी एकच गोष्ट आहे. त्यांच्या आत्म्याचे कल्याण होवो, हीच निरंतर भावना तुम्हाला करायची आहे. तुम्ही निरंतर सोबत राहिले, सोबत खाणेपिणे केले, म्हणून कल्याण कसे होईल, अशीच भावना करायला हवी. आपण परक्या लोकांसाठी चांगली भावना करतो, मग हा तर आपला स्वजन आहे, त्याच्यासाठी का नाही करावी?
रडणे, स्वतःसाठी की जाणाऱ्यासाठी? प्रश्नकर्ता : आपल्याला पूर्वजन्माची कल्पना आहे, तरीही घरात कोणाचे निधन झाल्यावर लोकं का रडतात?
दादाश्री : ते तर आपल्या स्वार्थासाठी रडतात. खूपच जवळचे नातेवाईक असतील तर ते खरंच रडतात, पण दुसरे सगळे जे रडतात ना, ते स्वत:च्या नातेवाईकांना आठवून रडतात, हे ही आश्चर्यच आहे ना? हे लोक