________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
जायचे? आपल्यालाही जायचे आहे तिथे, मग हे काय चालवले आहे ? त्यापेक्षा जे जिवंत आहेत त्यांना शांती द्या. गेले ते गेले, त्यांना आठवायचे सोडून द्या. येथे जिवंत आहेत, आश्रित आहेत त्यांना शांती द्या, इतकेच आपले कर्तव्य. हे तर गेलेल्यांना आठवत राहतात आणि जे आहेत त्यांना शांती देऊ शकत नाही, असे कसे? याचा अर्थ, तुम्ही तुमचे कर्तव्य चुकत आहात. असे तुम्हाला वाटते का? गेले ते गेले. खिशातून लाख रूपये खाली पडले आणि परत सापडले नाही तर आपण काय करायला हवे? डोके फोडायला हवे?
हा आपल्या हातचा खेळ नाही आणि त्या बिचाऱ्याला तिथे दुःख होते. आपण इथे दुःखी होतो, याची असर त्याला तिथे पोहचते. त्याला ही सुखी होऊ देत नाही आणि आपणही सुखी होत नाही. म्हणून शास्त्रकारांनी सांगितले आहे की, 'गेल्यानंतर उपाधी करु नका' म्हणून आपल्या लोकांनी काय केले की, 'गरुड पुराण करा, अमके करा, पूजा करा आणि मनातून काढून टाका.' आपण असे काही केले होते? तरीही विसरलात, नाही का?
प्रश्नकर्ता : परंतु त्याला विसरू शकत नाही, वडिलांचा व मुलाचा व्यवहार खूप चांगला होता. म्हणून त्याला विसरू शकत नाही.
दादाश्री : हो. विसरु शकू असे नाही. परंतु आपण जर विसरलो नाही, तर आपल्याला दु:ख होते आणि त्यालाही तिथे दु:ख होते. आपल्या मनात त्याच्यासाठी दु:ख बाळगणे, ते वडील या नात्याने आपल्या कामाचे नाही.
प्रश्नकर्ता : त्याला कशाप्रकारे दुःख होते?
दादाश्री : आपण इथे दुःखी आहोत, त्याचा परिणाम तिथे झाल्याशिवाय राहत नाही. या जगात तर सर्व फोनसारखे आहे, टेलीविजनसारखे आहे हे जग. आणि आपण इथे उपाधी केली तर तो परत येणार आहे का?