________________
मृत्यूवेळी, आधी आणि नंतर
प्रश्नकर्ता: दादाजी, आता तर किती लोक ब्राम्हणांना सांगतात की, तुम्हीच सगळे आणा, आम्ही ठराविक पैसे देऊ.
17
दादाश्री : हे तर आज नाही, कितीतरी वर्षांपासून करत आहेत, ठराविक पैसे देऊ, तू घेऊन ये. आणि तो दुसऱ्याने दिलेली खाट घेऊन येतो! आता बोला! तरीही लोकांना हे चुकीचे आहे असे मानता येत नाही, आणि गाडी तर जशीच्या तशी चालतच राहते. जैन असे करत नाहीत. जैन फार पक्के असतात. म्हणून ते असे - तसे करत नाही. असे - तसे काही नाहीच. इथून आत्मा निघाला की सरळ त्याच्या गतीमध्ये जातो, योनी प्राप्त होऊनच जाते.
मारणाऱ्याला नाही काही घेणे-देणे
प्रश्नकर्ता : मरणाऱ्याच्या मागे भजन-कीर्तन करायचे की नाही ? त्याच्याने काय फायदा होतो ?
दादाश्री : मरणाऱ्या व्यक्तिला त्याच्याशी काहीच घेणे-देणे नाही.
प्रश्नकर्ता : मग या ज्या आमच्या धार्मिक विधी आहेत, मृत्यूनंतर ज्या काही विधी केल्या जातात, त्या बरोबर आहेत की नाही ?
दादाश्री : यामधील एक अक्षर देखील खरे नाही. गेले ते गेले. लोकं तर आपल्या आपणच करतात आणि समजा असे सांगितले की आपल्यासाठी करा ना, तर म्हणतात, 'नाही भाऊ, वेळच नाही मला. '... जर वडिलांसाठी करायला सांगितले, तर तेव्हाही करणार नाहीत अशी आहेत ही लोकं. परंतु शेजारी म्हणतात की, 'अरे मेल्या, तुझ्या वडिलांचे कर, तुझ्या वडिलांचे कर.' ते शेजारचे जबरदस्तीने करायला
लावतात.
प्रश्नकर्ता : मग हे गरुड पुराण बसवतात. ते काय आहे ?
दादाश्री : गरुड पुराण तर, जे रडत राहतात ना, ते गरुड पुराणमध्ये
जातात, म्हणजे फक्त शांती मिळविण्यासाठी हे सगळे मार्ग आहेत.