Book Title: Aradhana Kathakosha
Author(s): Bhattarak Chandrakirti, Shantikumar Jaykumar Killedar
Publisher: Jain Sanskruti Samrakshak Sangh Solapur
View full book text
________________
४८ : आराधना-कथाकोष
पुण्यमार्गे काल गमाविति । परि पूर्वकर्म उदयागत । भस्मक व्याधिरोगमहंत । मुनिश्वरात उद्भविला ||९|| अहो या जीवाकारण । पुण्यपापास्तव जान । साता असाता दुःखदान । निसिदिन देत असे ||१०|| तदा ते व्याधि येके सरी । प्रगट होताचि शरीरि । क्षुधा उद्भवती थोरि । प्रचुर आहारि तृप्ति नव्हे || ११|| स्वच्यारित रक्षायासि । असमर्थ होता झाला ऋषि । महाच्चिता व्यापिलि मानसि । क्षुद्वेदनासी सोसवेना ||१२|| जैसी प्रचुर इंधनि । शांत नव्हे हुताशनि । अथवा सिंध्वापगाजीवनि । तथा क्षुधाग्रि नव्हे शांति || १३|| त्या नगरिचे श्रावकजन । नित्य करोनि पक्वान्न । पुष्कल घृत दुग्ध व्यंजन । देति भोजन मुनिप्रति ॥ १४ ॥ तरी ते दुर्द्धर भस्मव्याधि । दिन दिन करिति वृद्धि ! तव तव वाढे दुःखवाद्धि | चारित्रशुद्धि भंगकारी ॥ १५ ॥ तदा कांचिपुराभीतरि । श्रावक जनाचे मंदिरि । आहार न लभे लौकरि । कपाटे सत्वरि लाविति ॥ १६ ॥ ऐसे पाहोनि म्हणे मुनि । आता न राहावे या स्थानि । या जिनलिंगे करोनि । क्षुधा अग्नि शांत नव्हे ॥ १७ ॥ ऐसा विचार करोनि चित्ति । गमन केले देशाप्रति ॥ पुंड्रोड़ा नगरा जावोनि युक्ति । जिनवेशाप्रति सोडिले ||१८|| तेथे पाहोनि दानशाला । वंदकजनाचा जिव्हाळा । शीघ्र जावोनि त्या स्थळा । शरीरि धरला बौद्ध वेश || १९ ॥ तेथे करी पुष्टभोजन । नाना परीचे पक्वान्न | घृत दुग्ध दधि व्यंजन । तम्ही उदर पुर्ण होयेचि ना ॥ २० ॥
1
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org