Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi
View full book text
________________
झालेले लोक सोनकिड्याप्रमाणे हास्यास्पद अवस्थेला प्राप्त होत नाहीत काय ? हस्तिमल्ल कवि आचार्याबद्दल असें ह्मणतो--
श्रीमूलसंबव्योमेन्दुर्भारते भाविःर्थकृत् । देशे समंतभद्रारव्यो मुनि यात्पदर्धिकः ॥ तत्वार्थसूत्रव्याख्यानगंधहस्तिप्रर्वतकः । स्वामी समंतभद्रोऽभूदेवागमनिदेशकः ॥ अवटुतटमटति झटिति स्फुटपटुवाचाटधूर्जटेर्जिह्वा । वादिनि समंतभद्रे स्थितवति सति का कथान्येषां ॥ अर्थः----स्वामी समंतभद्राचार्य मूलसंघरूपी आकाशामध्ये सूर्याप्रमाणे होते. ते भरतक्षेत्रांत भविष्यकाली तीर्थकर होणार आहेत. त्यांना पदर्धि होती अर्थात् ते चारण ऋद्धीच्या प्रभावाने आकाशांत गमन करीत असत.
स्वामी समंतभद्रांनी देवागमस्तोत्र रचिले व तत्वार्थसूत्रावर गन्ध हस्ति नावाचे महाभाष्य लिहिले. निपुण व बोलण्यांत चतुर अशा महादेवाची देखील जीभ वादीन्द्र समंतभद्रांना पाहिल्याबरोबर लागलीच खान्यांत जाऊन पडते. अर्थात् तिच्याने एक शब्दही बोलवत नाही. मग भगवान समन्तभद्राचार्यापुढे इतर तुच्छ विद्वानांचे काय चालणार भाहे. यावरून भाषायांची असामान्य विद्वत्ता प्रकट होते. प्रचंड वि. द्वान देखील अ.चार्यापुढे फिके पडत असत. एका कवीने आचार्याविषयी असें झटले आहे.
कुवादिना स्वकान्तानां निकटे परुषोक्तयः।
समन्तभद्रयत्यग्रे पाहि पाहीति सूक्तयः ।। अर्थात्-- कुवादी आपल्या स्त्रियापुढे कठोर भाषणे करितात. परंतु भाचार्य समंतभद्रांना पाहिल्याबरोबर मुनिराज माता आपणच भामचे रक्षक माहात असे मधुर शब्द बोलतात, यावरून त्यांनी भनेक कि.
Jain Educationa International
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org