Book Title: Swayambhu Stotra Chaturvinshati Jinstuti
Author(s): Samantbhadracharya, Prabhachandracharya, Jindas Parshwanath Phadkule
Publisher: Sakharam Nemchand Doshi

View full book text
Previous | Next

Page 10
________________ (४) आचार्यांना अन्यमतांतील तत्वांचे ज्ञान अत्युत्कृष्ट होते हे दिसून येईल. ____ याचप्रमाणे वसुनंदि, अकलंकदेव, विद्यानंद व शुभचंद यांनी ही अशाच रीतीचे प्रशंसोद्गार काढले आहेत. त्या सर्वांचा उतारा येथे दिल्याने भगवान् समंतभद्राचार्यांची मान्यता दिगम्बर जैनधर्मामध्ये केवढी मोठी होती हे दिसून येईल. ___लक्ष्मीभृत्परमं निरुक्तिनिरतं निर्वाणसौख्यप्रद । । कुज्ञानातपवारणाय विधृतं छत्रं यथा भासुरम् ॥ सज्ज्ञानर्नवयुक्तिमौक्तिकफलैः संशोभमानं यथा । • वन्दे तद्धतकालदोषममलं सामभद्रं मतम् ॥ अर्थः ---अतिशय शोभणारे, निर्वाण सौख्याची भव्यांना प्राप्ति करून देणारे, कलिकालाच्या दोषांचा नाश करणारे, पवित्र असें समतभद्राचार्यांचे मत मी वन्दितो. आपण आपल्या मस्तकावर छत्र धारण केलें ह्मणजे आपण उन्हाच्या त्रासांतून सुटतो, छत्र जसे उन्हापासून आपला बचाव करिते त्याचप्रमाणे समंतभद्राचार्यांचे मतरूपी छत्र अज्ञानरूपी उन्हापासून भव्यजनांचे संरक्षण करिते. विद्वज्जनांनी हें. आपल्या मस्तकावर धारण केले आहे, याच्या सभोवती प्रमाण व नय रूपी मोती बसविली आहेत. व हे अतिशय सुंदर दिसते. याप्रमाणे वसुनन्द्याचार्यांनी समंतभद्राच्या मताची स्तुति केली आहे व ते त्यांनी वन्द्य मानिलें आहे. भट्टाकलंकदेवांनी समन्तभद्राचार्यांच्या देवागमस्तोत्रावर अष्टशती नावाचा टीकाग्रंथ लिहिला आहे. ग्रंथारंभी भट्टाकलंक देवांनी समते भवाचार्यांची जी स्तुति केली आहे ती अशी: तीर्थ सर्वपदार्थतत्वविषयस्याद्वादपुण्योदधे-। मध्यानामकलङ्कभावकृतये प्रामावि काले कलौ ॥ मेनाचार्यसमन्तभद्रगतिना तस्मै नमः संततम् । कसा पिनियते इतको भगाता देवागमस्तकृतिः ॥ Jain Educationa International For Personal and Private Use Only www.jainelibrary.org

Loading...

Page Navigation
1 ... 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 ... 314