Book Title: The Flawless Vision Marathi Author(s): Dada Bhagwan Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust View full book textPage 4
________________ समर्पण निजदोष दर्शन विना, बंधन भवोभवाचे अंती; खुलते दृष्टी स्वदोष दर्शनाची, तरतो भवसागर किती. मी 'चंदु' मानले तेव्हापासून, मूळ चुकांचा झाला उदय; 'मी शुद्धात्म्या' चे भान होता, होऊ लागतो चुकांचा अस्त, भगवंत वरिष्ठ, कर्ता जगाचा, मग चिकटले अनंत गैरसमज, वाजते रेकॉर्ड पण मानतो मी बोललो, म्हणून वाणी लागते जिव्हाळी. चुका चिकटून राहिल्या कशाने ? केले सदा त्यांचे रक्षण, चुकांना मिळून जाते जेवण, कषायांचे झाले पोट भरण. जोपर्यंत राहतील निज चुका, तोपर्यंतच आहे भोगणे, दिसतात स्वदोष तेव्हा स्वतः होतो पूर्णपणे निष्पक्ष. देह आत्म्याच्या भेदांकनाविना, पक्ष घेतो स्वत:चाच, 'ज्ञानी' भेदज्ञानाद्वारे, रेखांकित करतात स्व- पर याचा. मग दोषाला पाहताच ठार, करतो मशीनगनची आत मांडणी, दोष धुण्याची गुरुकिल्ली, दिसल्याबरोबर कर 'प्रतिक्रमण' चुका मिटवतो तो भगवंत, मग नाही कुणाचा वरिष्ठपणा, 'ज्ञानी' चे अद्भुत ज्ञान, प्रकट होत निज परमात्मपणा. शुद्धात्मा होऊन पाहतो, अंतःकरणातील प्रत्येक अणू; 'बावा'चे दोष धुतल्याने, सूक्ष्मत्वपर्यंतचे शुद्धिकरण. 4 निजदोष दर्शन दृष्टीचे, 'दादावाणी' आहे आज प्रमाण; निजदोष छेदण्यासाठी अर्पण केला ग्रंथ जग चरणी.Page Navigation
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 ... 176