Book Title: Sangharsh Tala Author(s): Dada Bhagwan Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust View full book textPage 9
________________ संपादकीय 'संघर्ष टाळा' एवढे वाक्य जर जीवनात सहजासहजी उतरले, तर त्याचा संसार सुंदर होईलच व मोक्ष सहज, सरळ समोरुन येवून भेटेल! हे निर्विवाद वाक्य आहे! अक्रम विज्ञानी पूज्य दादाश्रींनी दिलेल्या ह्या सूत्राला आत्मसात करून कितीतरी लोकं तरुन पार उतरुन गेले. त्यांचे जीवन सुख-शांतिमय झाले आणि मोक्षमार्गाला लागले! ह्यासाठी मात्र प्रत्येकाने एक दृढ निश्चय करायचा आहे की मला कोणा ही बरोबर संघर्ष (वादविवाद) करायचा नाही. समोरच्या व्यक्तिने जरी वाद केला तरी मला वाद करायचा नाही. बस, एवढाच जर कोणी निश्चय केला तर, त्याला नैसर्गिक रितीने आतूनच सूझ (समज) पडेल व संघर्ष टळेल! रात्री अंधारात खोलीतून बाहेर जायचे असेल आणि समोर भिंत आली तर आपण काय करतो? भिंतीला लाथ मारुन, असे म्हणू कि 'तु मध्ये का म्हणून आलीस? सरकून जा, हे माझे घर आहे?' तेव्हा तर तुम्ही कसे शहाणे होऊन आंधळ्या माणसा प्रमाणे हाताने दार शोधत शोधत बाहेर पडतात, हो कि नाही? येथे लक्षात येते कि येथे आपण आडमुढेपणा केला तर त्या भिंतीवर आपले डोके आपटेल व फुटेल! लहानशा गल्लीतून राजा जात असेल आणि समोरुन सांड धावत येत असेल, तेव्हा राजा त्या बैलाला असे म्हणेल कि 'तू बाजूला सरक, हे माझे राज्य आहे, ही माझी गल्ली आहे, मला रस्ता दे?!' तर अशा वेळेला बैल समोरुन काय म्हणेल, 'तू राजा तर मी महाराजा! येऊन जा!' तर अशा वेळेस भलभल्या राजाला सुद्धा सावकाश हळू हळू तेथून निघून जावे लागेल, आणि ओट्यावर सुद्धा चढून जावे लागेल. का? संघर्ष टाळण्यासाठी. ह्या साध्या साध्या गोष्टीवरुन असे लक्षात येते कि जर कोणी आपल्याशी वादविवाद करायला येतील तर ते त्या भिंतीसारखे आणि बैलासारखेच आहेत. म्हणून आपण वादविवाद टाळा व शहाण्यासारखे बाजूला सरकून जा. जर संघर्ष समोर आला तर कसे ही करुन टाळा. त्याने आपले जीवन क्लेशविरहीत होणार आणि मोक्ष प्राप्त होईल. ___ - डॉ. नीरूबेन अमीन ह्यांचे जय सच्चिदानंदPage Navigation
1 ... 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38