Book Title: Sangharsh Tala
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 21
________________ संघर्ष टाळा मौन रहा किंवा बोला त्याला काही फरक पडत नाही, काहीच संबंध नाही. आपण मौन पाळल्याने समोरच्या व्यक्तिवर परिणाम होतो असे काही नाही, किंवा आपल्या बोलण्याने परिणाम होतो असे ही नाही. ऑन्ली सायन्टिफिक सरकमस्टेन्शियल एविडन्स (मात्र वैज्ञानिक संयोगिक पुरावा म्हणजे 'व्यवस्थित शक्ति') आहे. कोणाजवळ सत्ताच नाही, थोडी पण सत्ता नाही असे हे जग, ह्यात कोण काय करणार आहे? जर ह्या भिंतीला सत्ता असेल तर त्याला पण सत्ता आहे! ह्या भिंतीला, आपल्याला ओरडण्याची सत्ता आहे? तसेच त्या समोरच्या व्यक्तिचे पण आहे. आणि त्याच्या निमित्ताने जे संघर्ष आहे, ते तर सोडणार नाही. तर मग विनाकारण आरडाओरड करण्यात काय अर्थ? त्याच्या हातात सत्ताच नाही! त्यामुळे तुम्ही भिंतीसारखे होवून जा ना! तुम्ही बायकोला सारखे दटवत राहिलात तर तिच्यात पण परमेश्वर बसलेला आहे तो नोंद करेल कि हा मला दटवट आहे. आणि तिने जर तुम्हाला दटवले तेव्हा तुम्ही त्या भिंतीसारखे होऊन जा, तर तुमच्यात असलेला परमेश्वर तो तुम्हाला मदत करेल. म्हणजे जर आपली चुक असेल तरच भिंत आपटते. त्यात त्या भिंतीची चक नाही. तेव्हा लोक मला म्हणतात ही सारी माणसे काही भिंती आहेत? तेव्हा मी म्हणतो 'हो, लोक पण भिंती च आहेत.' हे मी पाहून बोलत आहे, ह्या काही गप्पा नाही. एखाद्या बरोबर मतभेद होणे आणि भिंतीला आपटणे ह्या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत ह्या दोन्हीत फरक नाही. हा भिंतीला आदळतो ते त्याला न दिसण्यामुळे. आणि मतभेद होतो ते सुद्धा न दिसल्यामुळे च होतो, पुढचे त्याला दिसत नाही. पुढील उपाय त्याला दिसत नाहीत त्यामुळे मतभेद निर्माण होतात. हे क्रोध-मान-माया-लोभ जे करतात ते न दिसल्यानेच सारे करतात! तर अशी ही गोष्ट समजायला पाहिजे ना. ज्याला लागले त्याचा दोष, भिंतीचा त्यात काय दोष? असे ह्या जगात सर्व भिंतीच आहेत. भिंतीला आदळले तेव्हा आपण तिच्याशी खरे-खोटे करायला जात नाही

Loading...

Page Navigation
1 ... 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38