________________
१६
संघर्ष टाळा
'न्यायस्वरूप', तेथे उपाय तप !
प्रश्नकर्ता : संघर्ष टाळण्याची, 'समभावे निकाल' करण्याची आपली वृत्ति असेल तरीपण समोरील व्यक्ति आपल्याला त्रास देईल, अपमान करेल, तर आपण काय करायचे?
दादाश्री : काहीच नाही. तो आपला हिशोब आहे, आणि आपण त्याचा ‘समभावानी निकाल' करायचा आहे असेच नक्की करायचे. आपण आपल्याच कायद्यात रहायचे आणि आपले पझल सॉल्व करीत रहायचे. प्रश्नकर्ता : हे संघर्ष होतात ते 'व्यवस्थित शक्तिच्या' आधाराने असेल ना?
दादाश्री : हो. संघर्ष आहे तो 'व्यवस्थित शक्ति'च्या आधाराने आहे, हे खरे, परंतु तसे केव्हा म्हणता येईल ? संघर्ष होऊन गेल्यानंतर 'आपल्याला तर वादविवाद करायचा नाही' असा आपला निश्चय असावा. समोर खांब दिसला म्हणजे आपण समजतो कि पुढे खांब आहे, फिरुन जावे लागेल, आपटायचे तर नाहीच. पण तरीसुद्धा आपटलो गेलो तर आपण म्हणायचे ‘व्यवस्थित आहे' पहिल्यापासूनच 'व्यवस्थित आहे' असे समजून पुढे चालू लागलो तर त्या ‘व्यवस्थित'चा ज्ञानाच्या दुरुपयोग झाला असे म्हणावे लागेल. घर्षणाने शक्ति कमी होते
सर्व आत्मशक्ति जर कधी संपत असेल तर ती संघर्षाने, संघर्षाने सहज पण आपटलो तरी खलास ! समोरचा आपटला तरी पण आपण संयमपूर्वक राहिले पाहिजे ! संघर्ष तर व्हायलाच नको. मग हा देह जायचा असेल तर जाऊ द्या, परंतु कुठल्या ही परिस्थितीत संघर्ष व्हायला नकोच. जर केवळ संघर्ष नसेल तर मनुष्य मोक्षाला जाईल. जर कुणी शिकला असेल कि मला संघर्षात पडायचेच नाही. तर मग अशा माणसाला गुरुची किंवा कोणाच्याही कृपेची आवश्यकता नाही, एक-दोन अवतारातच तो सरळ मोक्षाला जाईल. 'घर्षणात यायचेच नाही' अशी जर श्रद्धा त्याच्यात