Book Title: Sangharsh Tala
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 32
________________ २३ संघर्ष टाळा पाचशे दोष रोजचे दिसायला लागले, म्हणजे समजावे कि पूर्णाहुति जवळ येत आहे. ___ म्हणून जेथे असाल तेथून संघर्ष टाळा. संघर्ष करून ह्या लोकचा मनुष्य अवतार तर बिघडतोच परंतु परलोक सुद्धा बिघडतो! जे हे लोक बिघडवतात ते परलोक सुद्धा बिघडवल्या शिवाय राहणार नाही! हे लोक सुधारतील, त्याचा परलोक सुधरतो. ह्या जन्मी आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही तर समजावे कि परलोकात सुद्धा अडचण येणार नाही आणि येथेच जर अडचणी ऊभी कराल तर सर्व अडचणी तेथे येणारच. तीन अवताराची गॅरंटी संघर्ष, वादविवाद झाला नाही तर त्याचा तीन अवतारानंतर मोक्ष होईल. ह्याची मी गॅरंटी देतो. संघर्ष झाला तर प्रतिक्रमण करावे. संघर्ष पुद्गलचा आहे आणि पुद्गल, पुद्गलचा संघर्ष प्रतिक्रमणाने नाश पावतात. तो भागाकार करत असेल तर आपण गुणाकार करावा, म्हणजे रक्कम उडून जाईल. समोरच्या व्यक्तिसाठी अशा विचार करावा कि, 'त्यानी मला असे म्हटले, तसे म्हटले.' हाच गुन्हा आहे. रस्त्याने जाताना भिंतीला आपण आपटलो तर आपण त्या भिंतीला का ओरडत नाही? झाडाला जड का म्हणतात? जे आपटतात ती सर्व हिरवी झाडेच आहेत! गाईचा पाय आपल्यावर पडला तर आपण काही म्हणतो का? तसेच ह्या सर्व लोकांचे आहे. ज्ञानी पुरुष सर्वांनाच कशाप्रकारे माफ करतात? ते समजतात कि, हे बिचारे समजत नाही, झाडासारखे आहेत. आणि ज्यांना समजते त्यांना सांगावे लागतच नाही, ते तर लागलीच प्रतिक्रमण करतात. आसक्ति तेथे 'रिएक्शन'च प्रश्नकर्ता : परंतु पुष्कळ वेळा आपल्याला द्वेष करायचा नसेल तरी पण द्वेष होऊन जातो. ह्याचे कारण काय?

Loading...

Page Navigation
1 ... 30 31 32 33 34 35 36 37 38