Book Title: Sangharsh Tala
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 31
________________ संघर्ष टाळा तरी ते एकत्र राहतात ना पुन्हा? ते तर होत राहते. ह्यासाठी कोणावर कसला ही दबाव केलेला नाही कि तुम्ही संघर्षात पडू नका. प्रश्नकर्ता : पण दादा, संघर्ष होऊ नये असा सतत भाव ठेवायला पाहिजे ना? दादाश्री : हो, असायला पाहिजे. तेच करायचे ना! प्रतिक्रमण करायचे आणि त्यासाठी भाव ठेवायचा! परत तसे झाले तर परत प्रतिक्रमण करायचे. कारण कि (संचित कर्माचा) एक थर निघून जातो। मग दुसरा थर पण निघून जातो ना? असे थर आहेत ना! माझे जेव्हा जेव्हा संघर्ष होत होते, तेव्हा नोंद करत होतो, आज चांगले ज्ञान मिळाले! संघर्षामुळे अजागृति राहत नाही. जागृतिच जागृति राहते ना! ते आत्माचे व्हिटामिन आहे. त्यामुळे ह्या संघर्षात काहीच भानगड नाही. संघर्षा नंतर एकमेकाशी वेगळे व्हायचे नाही। हाच इथे पुरुषार्थ आहे. आपले मन समोरच्यासाठी वेगळे होत असेल तर प्रतिक्रमण करून सर्व सुरळीत करावे. आम्ही ह्या सर्वां बरोबर कशाप्रकारे मिळून-जुळून राहतो? तुमच्या बरोबर ही आमचे पटत आहे कि नाही पटत? असे आहे, शब्दाने संघर्ष ऊभा होतो. मला खूप बोलावे लागते, तरीसुद्धा संघर्ष होत नाही ना? संघर्ष तर होणारच, जशी ही भांडी एकमेकांवर आदळतील कि नाही आदळणार? पुद्गलचा स्वभाव आहे संघर्ष करणे ते. पण माल भरलेला असेल तर. भरलेला नसेल तर नाही. पूर्वी आमचा पण संघर्ष होत होता। पण ज्ञान झाल्यानंतर संघर्ष झाला नाही. कारण कि, आमचे ज्ञान अनुभवज्ञान आहे. आणि आम्ही निकाल करून आलेलो आहोत, ह्या ज्ञानाने! सर्व निकाल करून करून आलो आहोत आणि तुम्हाला निकाल करायचे बाकी आहे. दोष धुतले जातात, प्रतिक्रमणाने कोणाच्या ही बरोबर संघर्ष झाला म्हणजे मग दोष दिसायला लागतात आणि संघर्ष झालाच नाहीत, तर दोष झाकलेले रहातात. पाचशे,

Loading...

Page Navigation
1 ... 29 30 31 32 33 34 35 36 37 38