________________
२४
संघर्ष टाळा दादाश्री : कोणा बरोबर? प्रश्नकर्ता : कधी नवऱ्या बरोबर असे घडले तर?
दादाश्री : त्याला द्वेष नाही म्हणता येणार. नेहमी जे आसाक्तिचे प्रेम असते, ते रिएक्शनरी आहे. जेव्हा चिडतात तेव्हा वाकडे चालतात. वाकडे चालतात तेव्हा मग थोडे दिवस वेगळे राहतात म्हणजे प्रेम चढतो. प्रेम वाढले कि पुन्हा भांडण होते, मग पुन्हा प्रेम वाढतो. जेव्हा, जेव्हा प्रेम अति प्रमाणात वाढतो तेव्हा भांडण होते. आणि जिथे कुठे पण दखलगिरी चालत रहाते ना, तिथे त्या लोकांत आतून प्रेम असते. हे प्रेम असेल तर च दखल होते. पूर्व जन्माचे प्रेम आहे, तर दखलगिरी होते. जास्त प्रमाणात प्रेम आहे. नाहीतर दखल होणारच नाही ना? हे दखलचेच स्वरूप आहे.
ह्याला लोक काय म्हणतात? 'संघर्षामुळे तर आमचे प्रेम उत्पन्न होते.' तेव्हा ही गोष्ट पण खरी आहे. ही आसक्ति, संघर्षामुळे झालेली आहे. जेथे वादविवाद कमी तेथे आसक्ति नसते. ज्या घरात स्त्री-पुरुषात संघर्ष कमी होतो तिथे आसक्ति कमी आहे असे समजावे. समजण्यासारखी गोष्ट आहे ना?
प्रश्नकर्ता : संसारव्यवहारात जो अहम् असतो त्यामुळे खूप ठिणग्या
पडतात.
दादाश्री : ती अहम्ची ठिणगी नाही पडत. दिसतात अहम्च्या ठिणग्या, पण विषयविकाराच्या आधीन होऊन असतात. विषयविकार नसेल तेव्हा असे होणार नाही. विषयविकार बंद झाला, नंतर हा इतिहास पण बंद होईल. म्हणजे ज्यांनी ब्रह्मचर्यव्रत घेतले आहे, वर्षभरासाठी, त्यांना मी विचारतो, तेव्हा ते म्हणतात, 'आता ठिणगी एकही नाही, कटकट नाही, खटपट नाही, काहीच नाही, स्टेन्ड स्टील (सर्व शांत)!' मला माहित आहे कि ब्रह्मचर्यव्रत घेतल्या नंतर असेच होत असते. म्हणून मुद्दाम विचारतो त्यांना.