________________
२७
संघर्ष टाळा
दादाश्री : ते आपण पहायचे नाही. सूक्ष्म वेगळे असते आणि सूक्ष्मतर वेगळे असते. सूक्ष्मतम म्हणजे अगदी शेवटची गोष्ट.
प्रश्नकर्ता : एकदा सत्संगात अशी गोष्ट निघाली कि चंदुलाल बरोबर तन्मयाकार होणे हे सूक्ष्मतर संघर्ष म्हटले जाते.
दादाश्री : होय. सूक्ष्मतर संघर्ष! त्याला टाळावे. चूकून तन्मयाकार झाले, आणि मग लक्षात येते ना कि ही चुक होवून गेली?
प्रश्नकर्ता : तर तो संघर्ष टाळण्याचा उपाय फक्त प्रतिक्रमण हे एकच आहे, कि दुसरे काही आहे?
दादाश्री : दुसरे कोणते ही शस्त्र (साधन) नाही. ही आपली नऊ कलमे, ती पण प्रतिक्रमणच आहेत. दुसरे काही शस्त्र नाही. ह्या जगात प्रतिक्रमण शिवाय दुसरे कोणतेही साधन नाही. उत्कृष्टात उत्कृष्ट साधन प्रतिक्रमण. कारण कि, अतिक्रमणानी हे सारे जग ऊभे राहिले आहे.
प्रश्नकर्ता : हे तर सारेच खूपच विस्मयकारी आहे. एक एक वाक्य 'जे घडले तोच न्याय' 'भोगतो त्याची चुक' ही सगळी एक एक सूत्र आहेत, ती सगळी अद्भूत सूत्र आहेत आणि प्रतिक्रमण दादांच्या साक्षीने करतो म्हणून त्यांची स्पंदने पोहचतातच.
दादाश्री : हो, खरे आहे. स्पंदन लागलीच पोहचून जातात आणि त्याचे फळ मिळते. आपल्याला खात्री होते कि ह्याचा परिणाम झालेला दिसतो.
प्रश्नकर्ता : दादा, प्रतिक्रमण तर एवढ्या झपाट्याने होतात, अगदी त्याच क्षणी! हे तर आश्चर्यच आहे दादा!! ह्या दादांची कृपा अगाध आहे. दादाश्री : हो हे आश्चर्यच आहे, वस्तु सायन्टिफिक आहे.
- जय सच्चिदानंद