Book Title: Sangharsh Tala
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 23
________________ १४ संघर्ष टाळा अर्थात् तेथे दोन पायाऐवजी चार पाय मिळेल आणि शेपूट जास्तीचे? तेथे काही असे तसे आहे? तेथे काय दुःख नाही? भयंकर दु:ख आहे. जरा समजून घ्यायला हवे, असे कसे चालेल? संघर्ष, वादविवाद ही अज्ञानताच आपली प्रश्नकर्ता : जीवनात स्वभाव जुळून येत नाही त्यामुळे भांडणं (संघर्ष) होतात ना? दादाश्री : संघर्ष होते त्याचेच नांव संसार. प्रश्नकर्ता : संघर्ष होण्याचे कारण काय? दादाश्री : अज्ञानता. जो पर्यंत कोणा ही बरोबर मतभेद होतात, ते तुमची निर्बलताची निशाणी आहे. लोक खोटे नाहीत. मतभेदमध्ये चुक तुमचीच आहे. लोकांची चुक नसतेच तो जाणून-बूजुन करीत असेल तर आपण तिथे माफी मागून घ्यावी कि 'भाऊ मला हे कळत नाही.' तसे लोकं चूका करतच नाही, लोकं मतभेद करतील असे नाहीच. जेथे संघर्ष होते तेथे आपलीच चुक आहे. प्रश्नकर्ता : संघर्ष टाळायचा असेल आणि जर मध्येच खांब आला असेल तर आपण बाजूला सरकून जावे. परंतु तो खांबच आपल्यावर पडला तर आपण काय करायचे? दादाश्री : पडला तर आपण सरकून जायचे. प्रश्नकर्ता : आपण किती ही बाजूला झालो तरी तो खांब आपल्याला लागल्याशिवाय राहणार नाही. उदाहरणार्थ माझी पत्नी संघर्ष करते. दादाश्री : संघर्ष होतो त्यावेळेला आपण काय करायला पाहिजे ते शोधून काढायचे. प्रश्नकर्ता : समोरची व्यक्ति आपला अपमान करेल आणि आपल्याला

Loading...

Page Navigation
1 ... 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38