________________
संघर्ष टाळा ना? कि 'हे माझे खरे आहे' असे ठरवायला आपण वादविवाद करत नाही ना? असे हे सारे भिंतीसारखेच आहे. त्यांचाशी खरे-खोटे करण्याची आवश्यकता नाही.
जे आदळतात त्या भिंती च आहेत, असे आपण समजून घेणे, मग दरवाजा कुठे आहे ह्याचा तपास करायचा, तर अंधारात ही दरवाजा सापडेल. असे हात चाचपडत चाचपडत गेलात तर दार सापडेल कि नाही सापडणार? आणि मग तेथून आपण बाहेर निघून जावे. संघर्ष करू नये हा नियम पाळला पाहिजे. अर्थात् कोणाच्या वादविवादात आपण पडायचे नाही.
असे जीवन जगा बाकी, हे असे जीवन जगताच येत नाही. लग्न करता येत नव्हते ते महा मुश्किलीनी लग्न केले! बाप होता येत नव्हते तरी पण बाप झाला. आतातरी मुले खुश होतील असे जीवन जगायला पाहिजे. सकाळी सगळ्यांनी नक्की करायला पाहिजे कि, 'भाऊ, आज कोणाशीही संघर्ष करू नये, असा आपण विचार करावा.' संघर्षामुळे काही फायदा होत असेल तर तसे मला दाखवा. काय फायदा होतो?
प्रश्नकर्ता : दुःख होते.
दादाश्री : दुःख होते एवढेच नाही, तर ह्या वादविवादामुळे आता तर दुःख होते च पण त्यामुळे संपूर्ण दिवस ही बिघडतो. आणि पुढील जन्मात मनुष्यपण रहात नाही, मनुष्यपण कधी रहाते, जेव्हा सज्जनता असेल तेव्हाच मनुष्यपण रहाते. परंतु पशुता असेल तर पुन्हा ठोसे मारीत राहिल, शिंग मारत राहिल तर मग पुन्हा तेथे मनुष्यपण येईल का? गाई-म्हशी शिंग मारतात कि माणूस मारतो?
प्रश्नकर्ता : माणूस जास्त मारतो. दादाश्री : जर माणूस मारतो तर त्याला जनावराची गती मिळेल.