________________
संघर्ष टाळा
११
खूप संतापली असेल आणि आपण त्याच वेळेला बाहेरुन घरी आलो आणि ती त्या रागाच्या भरात बोलली तर आपण काय करायला पाहिजे? आपण सुद्धा चिडून जायला पाहिजे का? अशी परिस्थिती जेव्हा निर्माण होते, तेव्हा आपण अॅडजेस्ट होऊन वागायला पाहिजे. ती आज का चीडली आहे ? आज ती कुठल्या परिस्थितीमुळे संतापली आहे कोणा बरोबर भांडली आहे. हे आपल्याला कसे समजणार? आपण पुरुष आहोत, मतभेद नाही पडू घ्यायचे. मतभेद झाले तर लगेच त्याचे समाधान करून टाकावे. मतभेद म्हणजेच संघर्ष.
सायन्स, समजण्यासारखे
प्रश्नकर्ता : आपल्याला भांडायचे नसेल परंतु एखादी व्यक्ति समोर येऊन भांडायला लागली तर काय करावे?
दादाश्री : जर ह्या भिंती बरोबर भांडलात तर कितीवेळ भांडू शकता? ह्या भिंती बरोबर एक दिवशी डोकं आपटले, तर आपण त्याच्या बरोबर काय करावे? डोकं आपटले म्हणजे भिंती बरोबर भांडण झाले म्हणून आपण भिंती बरोबर मारामारी करावी का? त्याच प्रमाणे जे खूप क्लेश देतात त्या सर्व भिंती आहेत ! ह्यात आपण समोरच्यात काय बघायचे? आपण स्वत:च समजून घ्यावयाचे कि ते भिंतीसारखेच आहेत. मग काहीच प्रश्न उरत नाही.
प्रश्नकर्ता : आपण जर मौन पाळले तर समोरच्या व्यक्तिला उलट वाटेल हा बोलत नाही, म्हणजे ह्याचाच दोष आहे असे समजून तो जास्त क्लेश करतो.
दादाश्री : हे तर आपण समजून घेतले कि मी मौन राहिलो, त्यामुळे असे झाले, परंतु रात्री एखादा माणूस उठला व बाथरुममध्ये जाताना अंधारात भिंतीवर तो आपटला तर तेथे आपण मौन राहिलो म्हणून का भिंत आपटली?