________________
संघर्ष टाळा आपली चुक काढली तर आपण असे सांगावे कि 'मी तर पहिल्यापासून वाकडा आहे.'
बुद्धिमुळे संसारात भांडणं होत असतात. अरे बायकोचे ऐकून वागाल तर पतन होईल आणि त्यामुळे वादविवाद होतील, ही तर बुद्धिबाई! तिचे ऐकाल तर कुठल्या कुठे फेकले जाल, रात्री दोन वाजता उठून ह्यांची बुद्धिबाई काही उलटच दाखवते. बायको तर काही कालासाठी भेटते, परंतु बुद्धि तर निरंतर बरोबरच असते. ही बुद्धि तर डिथ्रोन करणारी (पाडून टाकनारी) आहे.
जर तुम्हाला मोक्षाला जायचे असेल तर बुद्धिचे जरा सुद्धा ऐकू नका. बुद्धि ही तर अशी आहे कि ती ज्ञानी पुरुषांचे सुद्धा उलट दाखवते. अरे, ज्यांच्यामुळे मोक्ष प्राप्ति होऊ शकेल, त्यांचीच चुक पाहतोस? अशाने तर मोक्ष तुमच्यापासून अनंत अवतार लांबला जाईल.
संघर्ष हीच आपली अज्ञानता आहे. कुणाही बरोबर वादविवाद झाला तर ती आपल्या अज्ञानतेची निशाणी! खरे-खोटे परमेश्वर पहात नाही. परमेश्वर तर हेच पहात असतो कि, 'तो कसेही बोलला पण वादविवाद तर झाला नाही ना?' तेव्हा म्हणे, 'नाही.' 'बस, आम्हाला एवढेच पाहिजे.' अर्थात् परमेश्वरा जवळ खरे-खोटे काही नसते. हे सारे लोकां जवळ असते. परमेश्वरा जवळ द्वंद्व नसतो ना!
आपटतात, त्या सगळ्या भिंती भिंतीशी टक्कर झाली तर ती भिंतीची चुक कि आपली? भिंतीजवळ आपण न्याय मागतो का? भिंतीला आपण सांगतो का, कि तू येथून बाजूला बाजूला हो! आणि जर आपण म्हणाले कि 'मी येथूनच जाणार आहे?' तर कोणाचे डोके फुटेल?
प्रश्नकर्ता : आपले.