________________
संघर्ष टाळा
१५
तो आपला अपमान झाला असे वाटेल, त्याचे कारण आपला अहंकार आहे का?
दादाश्री : खरे पहाता समोरचा आपला अपमान करीत आहे, तो आपला अहंकार वितळून टाकतो, आणि ते ही नाटकीय अहंकाराला. जेवढा एक्सेस (अधिक) अहंकार असेल त्याला वितळून टाकतो. ह्यात आपले काय बिघडून जाणार आहे? ही आपली कर्म काही सुटू देत नाही. आपण तर लहान मूल पण समोर असेल तरी त्याला सांगावे कि आमची सुटका कर !
समावून घ्या सर्व, समुद्र सम पोटात
प्रश्नकर्ता : दादा, व्यवहारात व्यू पोईन्ट (दृष्टिकोण) वेगळा असल्यामुळे मोठा लहानांची चुक काढतो, लहान त्याच्यापेक्षा ही लहानांची चुक काढतो, असे का?
दादाश्री : हे तर असे आहे कि मोठा लहानांना खाऊन टाकतो, तो मोठा लहानांची चुक काढतो. त्यापेक्षा आपणच म्हणावे माझीच चुक आहे. चुक जर आपण मान्य केली तर त्याचे निवारण होते. आम्ही काय करतो? दुसरा जर सहन करू शकत नसेल, तर आम्ही ती चुक स्वीकारुन घेतो, दुसऱ्यांच्या चूका काढत नाही. आपण का दुसऱ्याला दोष द्यावा? आपल्या जवळ तर सागराएवढे पोट आहे ! पहा ना, ह्या संपूर्ण मुंबईतील साऱ्या गटारीचे पाणी सागर समावून घेतो ना? त्याचप्रमाणे आपणही पिऊन टाकावे ( समाऊन घ्यावे). त्यामुळे काय होईल कि, ह्या मुलांवर आणि सर्व लोकांवर त्याचा प्रभाव पडेल. ते ही शिकतील. मुले सुद्धा समजून जातील कि ह्यांचे सागरा इतके पोट आहे ! जितके येईल तेवढे जमा करून घ्या. व्यवहारात एक नियम आहे कि, अपमान करणारा आपली शक्ति देऊन जातो. म्हणून अपमान हसत मुखाने स्वीकारावे !