________________
संघर्ष टाळा
दादाश्री : संघर्ष टाळा याचा अर्थ सहन करणे नाही. सहन कराल तर ते किती कराल? सहन करणे आणि 'स्प्रिंग' दाबणे. हे दोन्ही सारखे आहे. 'स्प्रिंग' दाबून ठेवल्यावर ती किती दिवस राहिल? म्हणून सहन करायला तर शिकूच नका. उपाय करायला शिका. अज्ञानदशेत तर सहनच करावे लागते. पण मग एक दिवस स्प्रिंग उफाळली तर सर्व पाडून टाकते. हा तर निसर्गाचा असा नियमच आहे.
जगाचा असा कायदाच नाही कि, कोणामुळे आपणास सहन करावे लागते. दुसऱ्याच्या निमित्ताने जे काही सहन करावे लागते, तो आपलाच हिशोब असतो. परंतु ते आपल्याला कळत नाही कि, हा कोणत्या खात्यातला आणि कोणाचा माल आहे, त्यामुळे आपल्याला असे वाटते कि, तो हा नवाच माल देतो आहे. नवा माल कोणी देत च नाही. दिलेलाच परत देत आहे. आपल्याला हे समजत नाही, ज्ञानाने तपास करून घ्यावा कि समोरचा 'शुद्धात्मा' आहे. हे जे काही आले, ते माझ्याच कर्माच्या उदयामुळे आले आहे. समोरचा तर निमित्तमात्र आहे. त्यानंतर आपल्याला हे 'ज्ञान' स्वत:च पझल सॉल्व करुन देणार.
प्रश्नकर्ता : ह्याचा अर्थ असा झाला कि, मनाचे समाधान करून घ्यायचे कि, हा माल होता तो परत आला, असेच ना?
दादाश्री : तो स्वतः शुद्धात्मा आहे आणि ही त्याची प्रकृति आहे. प्रकृति हे फळ देते आहे. आपण शुद्धात्मा आहोत, तो पण शुद्धात्मा आहे. आता दोघेही समोरासमोर हिशोब पूर्ण करतात. त्यात ह्या प्रकृतिच्या कर्माचा उदयामुळे तो काही देत आहे. म्हणून आपण म्हणालो कि हा आपल्याच कर्माचा उदय आहे समोरचा निमित्त आहे, तो देऊन गेला म्हणजे आपला हिशोब पूर्ण झाला. असे उपाय केले, तर मग सहन करण्याचे राहिलेच नाही ना?
असा खुलासा नाही केला, तर सहन करीत राहिल्याने काय होईल?