________________
संघर्ष टाळा एखादा माणूस भांडायला आला, त्याचे शब्द बॉम्बगोळ्यासारखे येत असतील तेव्हा आपण समजायला पाहिजे कि संघर्ष टाळायचा आहे. आपल्या मनावर कुठलाही परिणाम नसेल तरी ही अचानक काही परिणाम होऊ लागला, तेव्हा आपल्या लक्षात येते कि समोरच्या व्यक्तिचा प्रभाव आपल्यावर होत आहे, अशा वेळेला आपण थोडे बाजूला व्हावे. हे सर्व संघर्ष आहे. हे जसे जसे तुम्हाला कळत जाईल तसे तसे तुम्ही हे संघर्ष टाळत जाल. संघर्ष टाळल्याने मोक्ष मिळतो!
हे सारे जग संघर्षाचे आहे, स्पंदन स्वरूपी आहे, म्हणून संघर्ष टाळा. संघर्ष, वादविवादाने हे जग निर्माण झाले आहे. भगवंताने त्याला वैरामुळे निर्माण झाले आहे असे म्हटले आहे. प्रत्येक माणूस, प्राणीमात्र वैर ठेवतो. जास्त प्रमाणात वाद वाढला असेल तर वैर ठेवल्याशिवाय राहत नाही. मग तो साप असो, विंचू असो, सांड असो किंवा पाडा असो. कोणीही असेल ते वैर ठेवतात. सगळ्यांच्यात आत्मा आहे. आत्मशक्ति सर्वांमध्ये सारखी आहे. कारण पुद्गलच्या कमजोरीमुळे सहन करावे लागत असते. पण सहन करण्याबरोबर वैर ठेवल्याशिवाय राहात नाही. आणि पुढच्या जन्मी ते परत वैराचा बदला घेतात!
एखादा माणूस खूप बोलतो तर त्याचा बोलण्याने आपल्याला संघर्ष व्हायला नको, हा धर्म आहे. हो, बोलणे तर कसेही असू शकते. त्याची बोलण्याची पद्धत कशी ही असली तरी आपण वाद, संघर्ष करावाच असे नियम आहे का? ही तर सकाळपर्यंत वादविवाद करणारी अशी माणस, पण आपल्यामुळे समोरच्याला वाईट वाटेल असे बोलणे हा फार मोठा गुन्हा
आहे उलट असे कोणी बोलत असेल तर त्यांना लागलीच थांबविले पाहिजे, त्याचेच नांव माणूस होय!
सहन करु नका, सोल्युशन शोधा प्रश्नकर्ता : दादा संघर्ष टाळावे असे जे आपण म्हणता, म्हणजे सहन करावे असाच अर्थ होतो ना?