Book Title: Sangharsh Tala
Author(s): Dada Bhagwan
Publisher: Dada Bhagwan Aradhana Trust

View full book text
Previous | Next

Page 13
________________ संघर्ष टाळा 'दादाजी हे आपण सगळ्यांना जे ज्ञान सांगता ते मलाही शिकवा.' मी म्हणालो 'तुला शिकवून काय करायचे? तू तर रोज गाडीत मारमारी, घोटाळे करून येतोस.' सरकारात दहा रुपये भरण्या एवढे सामान असेल तरीही तो पैसे भरल्याशिवाय आणयचा आणि लोकांना वीस रुपायाचे चहापाणी पाजायचा! त्यामुळे तर दहा रुपये वाचत नाहीत, उलट दहा रुपये जास्त वापरले जातात असा तो नोबल (!) माणूस. पुन्हा तो मला म्हणाला कि तुम्ही मला काही ज्ञान शिकवा, मी म्हणालो, 'तू तर रोज भांडण करून येत असतो, आणि रोज मला ते ऐकावे लागते.' 'तरीही काका, काहीतरी द्या, काहीतरी द्या मला' असे तो म्हणाला. तेव्हा मी म्हणालो 'एक वाक्य मी तुला देतो. तू पाळशील का?' तेव्हा तो म्हणाला 'नक्कीच पाळीन.' मी म्हणालो 'कोणाच्याही बरोबर संघर्ष करू नकोस' तेव्हा तो म्हणाला, 'संघर्ष म्हणजे काय, दादाजी? मला सांगा, मला नीट समजवून सांगा.' मी म्हणालो, 'आपण अगदी सरळ चालत आहोत, मध्येच रस्त्यावर खांब आला तर आपण बाजूला सरकायला पाहिजे कि आपण त्या खांबाला आदळायचे?' तेव्हा तो म्हणाला, 'नाही, आदळले तर डोके फूटेल.' मी म्हणालो, 'समोरुन म्हैस येत असेल तर बाजूने जायला पाहिजे कि तिला टक्कर द्यायाची?' तेव्हा तो म्हणाला, 'जर टक्कर झाली तर ती म्हैस, मला मारेल त्यामुळे मी बाजूला जायला हवे.' मग मी विचारले 'साप येत असेल तर? मोठा दगड पडला असेल तर?' तर तो म्हणाला 'बाजूनेच जावे लागेल' मी विचारले, 'कोणाला बाजूने जायला पाहिजे?' तेव्हा तो म्हणाला 'आपणच बाजूने जायला पाहिजे.' मी विचारले, 'कशासाठी?' तेव्हा तो म्हणाला, 'आपल्या सुखासाठी, जर आपण त्यांना टक्कर दिली तर आपल्याला लागेल.' मी म्हणालो, 'या जगात कित्येक जण दगडासारखे आहेत, काही जण म्हशीसारखे आहेत, काहीजण गाईसारखे आहेत, काही जण मनुष्यासारखे आहेत, काहीजण सापासारखे आहेत, काहीजण खांबासारखे आहेत, सर्व

Loading...

Page Navigation
1 ... 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38