________________
संघर्ष टाळा तर त्या धोतराला सोडवत बसू नकोस! धोतराला सोडून पळून जावे. अरे! एक क्षण सुद्धा एकाच अवस्थेत चिटकून राहण्यासारखे नाही. तर मग इतरांची गोष्टच कशाला करायची? जर तू चिकटलास तर तू स्वरूपाला विसरलास.
जर चूकुन सुद्धा तू कोणाच्या संघर्षात अडकलास, तर त्याचा निकाल करून टाक. अगदी सहज रीतीने त्या वादविवादाची (घर्षणाची) ठिणगी उडविल्या शिवाय निघून जावे.
ट्राफिकच्या नियमामूळे संघर्ष टळतात जसे आपण रस्त्यावरुन काळजीपूर्वक चालत असतो ना! मग समोरचा माणूस किती ही वाईट असो, तो आपल्याला टक्कर मारुन जाईल आणि नुकसान करेल तर ती गोष्ट वेगळी, परंतु कोणाचे नुकसान करायचा आपला हेतु नसावा. आपण त्याचे जर नुकसान करायला गेलो तर आपले ही नुकसान होईलच. म्हणून नेहमी प्रत्येक संघर्षात दोघांचेही नुकसान होते. तुम्ही समोरच्या व्यक्तिला दुःख दिले, तर त्याच क्षणी आपोआप तुम्हाला सुद्धा दुःख झाल्याशिवाय रहाणारच नाही. ही टक्कर (संघर्ष) आहे म्हणून मी हे उदाहरण दिले आहे कि रस्त्यावरील वाहनव्यवहाराचा काय धर्म आहे कि टक्कर झाली तर तुम्ही मरुन जाल. टक्करमध्ये धोका आहे म्हणून कोणाशीही टक्कर (संघर्ष) करू नका. अशाच प्रकारे ह्या व्यवहारिक कार्यात सुद्धा संघर्ष नको. संघर्ष करण्यात धोका आहे नेहमीच. संघर्ष कधी तरी होतो. महिन्यात दोनशे वेळा असे थोडेच होते? महिन्यात असे प्रसंग किती वेळा होतात?
प्रश्नकर्ता : काही वेळा! दोन-चार वेळा.
दादाश्री : हं, म्हणजे तितके सावरुन घ्यावे आपण. माझे असे म्हणणे आहे कि, आपण कशासाठी बिघडवायचे, प्रसंग बिघडवणे हे आपल्याला शोभत नाही. तेथे रस्त्या वर सर्व वाहतुकीच्या नियमा प्रमाणे चालतात, तेथे